ETV Bharat / bharat

Wrestlers Protest : आंदोलक कुस्तीपटू आणि योगेश्वर दत्त पुन्हा आमनेसामने, फेसबुक लाईव्ह करत एकमेकांवर गंभीर आरोप

ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधातील आंदोलनादरम्यान कुस्तीपटू एकमेकांशीच भिडले आहेत. ऑलिम्पिक पदक विजेता योगेश्वर दत्त आणि बजरंग पुनिया यांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले आहेत.

Wrestlers Protest
कुस्तीपटूंचे आंदोलन
author img

By

Published : Jun 25, 2023, 7:58 PM IST

फरीदाबाद : भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात आंदोलन करणारे कुस्तीपटू आणि योगेश्वर दत्त यांच्यातील शाब्दिक युद्ध तीव्र होत आहे. आधी कुस्तीपटू बजरंग पुनिया, विनेश फोगट आणि साक्षी मलिक यांनी फेसबुकवर लाईव्ह येऊन योगेश्वर दत्तवर गंभीर आरोप केले होते. यानंतर योगेश्वर दत्तनेही फेसबुकवर लाईव्ह होऊन कुस्तीपटूंच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले.

'कुस्तीपटू ब्रिजभूषण वगळता मला लक्ष्य करत आहेत' : योगेश्वर दत्त म्हणाला की, सर्वात चांगली गोष्ट म्हणजे भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण वगळता कुस्तीपटू मला लक्ष्य करत आहेत. ते पैलवान कोणालाही स्वतःहून मोठे मानत नाहीत आणि ते चांगले खेळाडू आहेत हेही खरे. कुस्तीपटूंनी माझ्यावर अनेक आरोप केले, त्यामुळे लाईव्ह यावे लागले. बजरंग पुनियाने माझ्यावर आरोप करत म्हटले की, मी त्याला सांगितले होते की, 'तुम्ही आशियाई क्रीडा स्पर्धेत जाणार आहात आणि मी राष्ट्रकुलमध्ये जाणार आहे', यावर मला उत्तर द्यायचे आहे.

'मी कुस्तीतून निवृत्ती घेतली आहे' : योगेश्वर म्हणाला की, आम्ही हिंदू आहोत आणि गायीला माता मानतो. मी गायीची शेपटी धरून म्हणू शकतो की मी हे बोललो नाही. 2016 च्या ऑलिम्पिकनंतर मी कुस्ती सोडली आणि कुस्तीतून निवृत्ती घेतली. बजरंग पुनिया एक गोष्ट सांगायला विसरला की 2016 च्या वर्ल्ड चॅम्पियनशिप दरम्यान बजरंगचा फोन आला होता. त्यावेळीही मी चॅम्पियनशिप खेळण्यास नकार दिला होता.

'बजरंग पुनियाला भाऊ मानायचो' : योगेश्वर दत्त पुढे म्हणाला की, मी परदेशात कुठेही खेळायला जायचो, त्यावेळी मी माझ्या भावाच्या जागी बजरंग पुनियाचे नाव लिहायचो. गुरूंबद्दल सांगायचे तर ब्रिजभूषण सिंह हे माझे गुरू नाहीत. मी पण गावातूनच कुस्तीला सुरुवात केली आहे. माझ्या गुरूंचे नाव सतबीर डब्बास आहे. मला त्यांच्याकडूनच शिकायला मिळाले. राजकारणात येण्याची इच्छा होती, म्हणून मी नोकरी सोडून राजकारणात माझे नशीब आजमावले.

बजरंग पुनियाने केले होते हे आरोप : याआधी कुस्तीपटू बजरंग पुनिया, विनेश फोगट आणि साक्षी मलिक शनिवारी सोशल मीडियावर लाइव्ह आले आणि त्यांनी कुस्तीपटू योगेश्वर दत्तवर जोरदार हल्ला केला. बजरंग पुनियाने योगेश्वर दत्तचे नाव घेत म्हटले की, योगेश्वर दत्त समाजात विष मिसळत आहे. योगेश्वर दत्तला बहुधा लिहिता वाचता येत नाही. आमची लढाई महिला कुस्तीपटूंवर अन्याय करणाऱ्यांशी आहे, असे बजरंग पुनियाने म्हटले होते. त्यांच्यासोबत नाही, पण तरीही योगेश्वर दत्त आमच्याविरुद्ध अपशब्द बोलत आहे.

  • हम आंदोलित पहलवानों ने ट्रायल्स को सिर्फ़ आगे बढ़ाने के लिए चिट्ठी लिखी थी,क्योंकि पिछले 6 महीने से आंदोलन में शामिल होने के कारण प्रैक्टिस नहीं कर पाए.
    इस मामले की गंभीरता को हम समझते हैं इसलिए यह चिट्ठी आपसे साझा कर रहे. दुश्मन पहलवानों की एकता में सेंध लगाना चाहता है.🙏🏽 pic.twitter.com/FE5Tfim9DT

    — Bajrang Punia 🇮🇳 (@BajrangPunia) June 25, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'योगेश्वर दत्तने महिला खेळाडूंसाठी आवाज उठवला नाही' : बजरंग म्हणाला की योगेश्वर दत्तने कधीही महिला खेळाडूंसाठी आवाज उठवला नाही, उलट तो नेहमी ज्युनियर खेळाडूंची खिल्ली उडवतो. बजरंग पुनिया म्हणाला होता की योगेश्वर दत्त 2010 मध्ये आशियाई खेळादरम्यान दुखापतग्रस्त झाला होता, पण तरीही तो खेळू असे म्हणत राहिला. पण जेव्हा 10 दिवस बाकी होते. त्यानंतर त्याने खेळण्यास नकार दिला. अशा प्रकारे त्याने क्रीडा जगतासह देशाचीही फसवणूक केली. 2014 च्या राष्ट्रकुल खेळांबद्दल बोलताना बजरंग पुनिया म्हणाला की, जो संघ चाचणीशिवाय गेला होता. त्यात योगेश्वर दत्तही होता. त्याच्यासोबत आणखी एक पैलवान होता. मी त्याचे नाव घेणार नाही.

  • हम आंदोलित पहलवानों ने ट्रायल्स को सिर्फ़ आगे बढ़ाने के लिए चिट्ठी लिखी थी, क्योंकि पिछले 6 महीने से आंदोलन में शामिल होने के कारण हम प्रैक्टिस नहीं कर पाए.

    इस मामले की गंभीरता को हम समझते हैं इसलिए यह चिट्ठी आपसे साझा कर रहे. दुश्मन पहलवानों की एकता में सेंध लगाना चाहता है.… pic.twitter.com/Otvhhu1Z75

    — Vinesh Phogat (@Phogat_Vinesh) June 25, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

साक्षी मलिक काय म्हणाली? : कुस्तीपटू साक्षी मलिकनेही योगेश्वर दत्तवर जोरदार हल्ला चढवला. साक्षी मलिक म्हणाली होती की, 'महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण यांच्या विरोधात समितीसमोर आपली वक्तव्ये नोंदवली आहेत. अशा स्थितीत तुम्ही (योगेश्वर) ब्रिजभूषण सिंह दोषी नाही असे कसे म्हणू शकता. तुम्ही म्हणता की आम्हाला खटला द्यायचा नाही. तुम्ही बरोबर असता तर तुम्ही आमची बाजू घेऊन ब्रिजभूषण सिंह दोषी असल्याचे सांगितले असते. तुम्ही आमच्यासाठी म्हणत आहात की आम्हाला ट्रायल द्यायची नाही, म्हणून मी तुम्हाला सांगते की आम्ही ट्रायल द्यायची नाही असे म्हटले नाही, उलट आम्ही वेळ मागितला आहे. आम्हाला थोडा वेळ द्या आणि नंतर ट्रायल घ्या, असे आम्ही म्हटले आहे'.

'शिक्षा होईपर्यंत लढा सुरु राहणार' : लाइव्ह दरम्यान विनेश फोगट म्हणाली होती की, आमचा जीव गेला तरी चालेल, पण जोपर्यंत ब्रिजभूषण सिंहला शिक्षा होत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार आहे. योगेश्वर दत्तवर निशाणा साधत विनेश फोगट म्हणाली होती की, तुम्ही जे पुरावे मागत आहात, त्या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले असले तरी त्याची प्रत अद्याप आम्हाला मिळालेली नाही. त्यामुळे आम्ही आता गप्प बसलो आहोत. मात्र आमचा लढा सुरू आहे.

हेही वाचा :

  1. VINESH PHOGAT : कुस्तीपटू योगेश्वर दत्तवर संतापली विनेश फोगट, म्हणाली योगेश्वर कुस्तीचा 'जयचंद आणि 'विषारी साप'
  2. Wrestlers Protest : विनेश शस्त्र उचलण्याबद्दल का बोलली? कोणाला म्हणाली आंधळा, मुका आणि बहिरा राजा?, जाणून घ्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.