ETV Bharat / bharat

Wrestlers Protest : विनेश शस्त्र उचलण्याबद्दल का बोलली? कोणाला म्हणाली आंधळा, मुका आणि बहिरा राजा?, जाणून घ्या - विनेश फोगटचे ट्विट

लैंगिक शोषणाविरोधात आंदोलन करणारी कुस्तीपटू विनेश फोगट हिने एक ट्विट करत न्यायाची मागणी केली आहे. विनेशच्या या ट्विटमध्ये न्याय न मिळाल्याची भावना असून सरकारविरोधात क्रांतीचा संदेशही आहे. विनेशने महाभारताच्या संदर्भाशी संबंधित एक कविता ट्विट केली आहे, ज्यामध्ये द्रौपदीला शस्त्र उचलण्यास सांगितले आहे.

Wrestlers Protest
कुस्तीपटूंचे आंदोलन
author img

By

Published : Jun 17, 2023, 9:54 PM IST

Updated : Jun 17, 2023, 10:02 PM IST

चंदीगड : महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणी दिल्ली पोलिसांनी 15 जून रोजी आरोपपत्र दाखल केले. कुस्तीपटूनी तक्रार दाखल केल्याच्या दिवसापासून आरोपी खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांना अटक करण्याची मागणी करत आहेत. परंतु त्यांना अद्यापही अटक करण्यात आलेली नाही. 15 जूनपर्यंत ब्रिजभूषण यांना अटक न केल्यास पुन्हा आंदोलन करण्यात येईल, असा अल्टिमेटम पैलवानांनी दिला होता. कुस्तीपटूंनी अद्याप पुन्हा आंदोलनाची घोषणा केलेली नाही. मात्र 16 जूनच्या रात्री कुस्तीपटू विनेश फोगटने एक ट्विट केले होते, जे आता चर्चेत आले आहे. या ट्विटमध्ये ती पैलवानांच्या वेदनांविषयी बोलली आहे. तसेच तिने 'वी वॉन्ट जस्टिस' असे हॅशटॅग ट्विट मध्ये वापरले आहे.

कवितेचे तीन भाग ट्विट केले : विनेश फोगट हिने कवी पुष्यमित्र उपाध्याय यांच्या कवितेचे तीन भाग ट्विट केले आहेत. या तिन्ही भागांचा संदेश अतिशय मार्मिक आहे. कवितेचे शीर्षक आहे, उठ द्रौपदी, शस्त्र उचल, आता गोविंद येणार नाही. या कवितेतून विनेशने सरकार व मीडियाला आरसा दाखवला आहे. विनेशच्या ट्विटमध्ये द्रौपदीच्या दु:खाचा, शकुनीच्या फसवणुकीचा उल्लेख आहे. तसेच आंधळा, मुका आणि बहिऱ्या राजाचाही उल्लेख आहे. विनेशची ही कविता कोणाकडे बोट दाखवत आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

Wrestlers Protest
कवितेचा पहिला भाग

कवितेचा पहिला भाग : विनेशने ट्विट केलेल्या कवितेच्या पहिल्या भागात शकुनीच्या फसवणुकीचा उल्लेख आहे. हे कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाचे प्रकरण कमजोर करण्याचा प्रयत्न, त्यांना विकत घेण्याचा किंवा बळाच्या सहाय्याने त्यांना तोडण्याचा प्रयत्न, याला जोडले जात आहे. या चळवळीचे नेतृत्व करणारे तीन कुस्तीपटू, बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगट यांनी अनेकवेळा आरोप केला आहे की, आरोपी ब्रिजभूषण सिंह आपल्या राजकीय ताकदीचा वापर करून त्यांना तोडण्याचा प्रयत्न करत आहे.

  • बृजभूषण की यही ताक़त है. वह अपने बाहुबल, राजनीतिक ताक़त और झूठे नैरेटिव चलवाकर महिला पहलवानों को परेशान करने में लगा हुआ है, इसलिए उसकी गिरफ़्तारी ज़रूरी है. पुलिस हमें तोड़ने की बजाए उसको गिरफ़्तार कर ले तो इंसाफ़ की उम्मीद हैं वरना नहीं।

    महिला पहलवान पुलिस इन्वेस्टीगेशन के…

    — Vinesh Phogat (@Phogat_Vinesh) June 9, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

विनेशचे ट्विट : या सर्व प्रकरणाबाबत विनेश फोगट हिने 9 जून रोजी एक ट्विट केले होते. यामध्ये तिने ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या राजकीय ताकदीचा आणि प्रभावाचा स्पष्ट उल्लेख केला आहे. विनेशने लिहिले होते - हीच ब्रिजभूषणची ताकद आहे. तो आपली मसल पॉवर, राजकीय ताकद वापरून महिला कुस्तीगीरांचा छळ करतो आहे. त्यामुळे त्याला अटक करणे आवश्यक आहे. पोलिसांनी आम्हाला तोडण्याऐवजी त्याला अटक केली तर न्याय मिळण्याची आशा आहे, अन्यथा नाही. महिला कुस्तीपटू पोलीस तपासासाठी गुन्ह्याच्या ठिकाणी गेल्या होत्या, मात्र त्या तडजोडीसाठी गेल्याची चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये रंगली होती. कदाचित विनेशच्या कवितेचा पहिला भाग ही वेदना व्यक्त करत असेल.

Wrestlers Protest
कवितेचा दुसरा भाग

कवितेचा दुसरा भाग : कवितेच्या दुसऱ्या भागात विकले गेलेले वृत्तपत्रे आणि माध्यमांच्या फेक न्यूजचा उल्लेख आहे. कुस्तीपटूंनी अनेकदा आरोप केले आहेत की, मीडिया त्यांच्या विरोधात बातम्या चालवून त्यांचे आंदोलन मोडू इच्छित आहे. या खोट्या बातम्या जाणूनबुजून पसरवल्या जात असल्याचे पैलवानांनी म्हटले आहे. यानंतर विनेश फोगटने ट्विट केले आणि म्हटले की, खोट्या बातम्या पसरवणाऱ्या लोकांना महिला कुस्तीपटू कोणत्या त्रासातून जात आहेत याची जाणीव नाही. माध्यमांचे पाय दुबळे आहेत जे गुंडांसमोर थरथर कापायला लागतात, महिला पैलवान दुबळ्या नाही..

  • ये खबर बिलकुल ग़लत है। इंसाफ़ की लड़ाई में ना हम में से कोई पीछे हटा है, ना हटेगा। सत्याग्रह के साथ साथ रेलवे में अपनी ज़िम्मेदारी को साथ निभा रही हूँ। इंसाफ़ मिलने तक हमारी लड़ाई जारी है। कृपया कोई ग़लत खबर ना चलाई जाए। pic.twitter.com/FWYhnqlinC

    — Sakshee Malikkh (@SakshiMalik) June 5, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

साक्षी मलिकचे ट्विट : या अनुषंगाने 5 जून रोजी एक बातमी आली होती की, साक्षी मलिक रेल्वेत नोकरीवर रुजू झाली आहे. अनेक मीडिया हाऊसने दावा केला होता की साक्षीने आंदोलनातूनही तिचे नाव काढून घेतले आहे. मात्र ही बातमी समोर येताच साक्षी मलिकने ट्विट करत या बातम्या फेक असल्याचे म्हटले. साक्षी म्हणाली की, आमच्यापैकी कोणीही न्यायाच्या लढाईत मागे हटले नाही आणि हटणारही नाही.

  • हमारे मेडलों को 15-15 रुपए के बताने वाले अब हमारी नौकरी के पीछे पड़ गये हैं.

    हमारी ज़िंदगी दांव पर लगी हुई है, उसके आगे नौकरी तो बहुत छोटी चीज़ है.

    अगर नौकरी इंसाफ़ के रास्ते में बाधा बनती दिखी तो उसको त्यागने में हम दस सेकेंड का वक्त भी नहीं लगाएँगे. नौकरी का डर मत दिखाइए.

    — Bajrang Punia 🇮🇳 (@BajrangPunia) June 5, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

बजरंग पुनियाचा मीडियावर निशाणा : या मीडिया रिपोर्ट्सने संतप्त झालेल्या कुस्तीपटू बजरंग पुनियाने व्हिडिओ जारी करून निशाणा साधला. बजरंग म्हणाला की, ज्यांनी आमच्या पदकांची किंमत प्रत्येकी 15 रुपये असल्याचे म्हटले ते आता आमच्या नोकरीच्या मागे लागले आहेत. आमचा जीव धोक्यात आहे. त्यासमोर नोकरी ही फार छोटी गोष्ट आहे. नोकरी न्यायाच्या मार्गात अडथळा ठरत असेल, तर ती सोडायला दहा सेकंदही लागणार नाहीत. नोकरीची भीती दाखवू नका. विनेशच्या कवितेचा दुसरा भाग अशा बातम्यांच्या विरोधात असल्याचे मानले जात आहे.

Wrestlers Protest
कवितेचा तिसरा भाग

कवितेचा तिसरा भाग : विनेशच्या कवितेच्या तिसऱ्या भागात महाभारतातील अंध राजा धृतराष्ट्राचा उल्लेख आहे. कवितेचा भाग असा - कालपर्यंत राजा फक्त आंधळा होता. आता तो मुका-बहिराही आहे. विनेशचा हा इशारा सरकार आणि दिल्ली पोलिसांकडे असावा. कुस्तीपटूंनी प्रथम गृहमंत्री अमित शहा आणि त्यानंतर क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांची भेट घेतली. परंतु या बैठकींचा काही परिणाम झाला नाही. यानंतर 7 जून रोजी बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांनी केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांचीही भेट घेतली. 15 जूनपर्यंत तपास पूर्ण करून आरोपपत्र दाखल केले जाईल, असे अनुराग ठाकूर यांनी सांगितले. पण कुस्तीपटू ब्रिजभूषण सिंहच्या अटकेवर ठाम राहिले. 15 जून रोजी दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले पण त्यांना अद्याप अटक करण्यात आली नाही.

  • जंतर मंतर पर सरेआम लोकतंत्र की हत्या हो रही

    एक तरफ़ लोकतंत्र के नये भवन का उद्घाटन किया है प्रधानमंत्री जी ने

    दूसरी तरफ़ हमारे लोगों की गिरफ़्तारियाँ चालू हैं. pic.twitter.com/ry5Wv9xn5A

    — Vinesh Phogat (@Phogat_Vinesh) May 28, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा :

  1. Wrestlers Protest : आंदोलन मागे घेतल्याच्या अफवाबाबत बजरंग पुनियाने केला मोठा आरोप
  2. Wrestlers Protest : कुस्तीपटूंचे आंदोलन, भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्याविरुद्ध दिल्ली पोलीस आज दाखल करणार चार्जशीट

Last Updated : Jun 17, 2023, 10:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.