नवी दिल्ली : भारतीय कुस्तीपटू आणि कुस्ती परिषदेचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. त्यामुळे कुस्तीपटूंनी दिल्लीच्या जंतरमंतरवर कुस्तीपटूंचे सलग तिसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच ठेवले आहे. गेल्या 2 दिवसापासून कुस्तीपटूंना जंतरमंतरवरच रात्र काढावी लागत आहे. आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर कुस्तीपटूंनी गंभीर आरोप केला आहे.
-
बड़े खेद का विषय है कि देश का नाम रोशन करने वाले अंतर्राष्ट्रीय स्तर के खिलाड़ियों को धरने पर बैठना पड़ रहा है, उनको न्याय मिलना चाहिए।
— Bhupinder S Hooda (@BhupinderShooda) April 24, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
मैं स्वयं कल दिल्ली के जंतर-मंतर के धरनास्थल पर जाऊंगा। pic.twitter.com/CDcgPUvEEV
">बड़े खेद का विषय है कि देश का नाम रोशन करने वाले अंतर्राष्ट्रीय स्तर के खिलाड़ियों को धरने पर बैठना पड़ रहा है, उनको न्याय मिलना चाहिए।
— Bhupinder S Hooda (@BhupinderShooda) April 24, 2023
मैं स्वयं कल दिल्ली के जंतर-मंतर के धरनास्थल पर जाऊंगा। pic.twitter.com/CDcgPUvEEVबड़े खेद का विषय है कि देश का नाम रोशन करने वाले अंतर्राष्ट्रीय स्तर के खिलाड़ियों को धरने पर बैठना पड़ रहा है, उनको न्याय मिलना चाहिए।
— Bhupinder S Hooda (@BhupinderShooda) April 24, 2023
मैं स्वयं कल दिल्ली के जंतर-मंतर के धरनास्थल पर जाऊंगा। pic.twitter.com/CDcgPUvEEV
आंदोलनस्थळी झोपले कुस्तीपटू : सोमवारी रात्रीही बजरंग पुनिया, साक्षी, संगीता आणि विनेश फोगट यांच्यासह अनेक कुस्तीपटू जंतरमंतरच्या आंदोलनाच्या ठिकाणी झोपले होते. आंदोलन करणाऱ्या पैलवानांना आजही राजकीय पक्ष आणि नेत्यांचा पाठिंबा मिळत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दुपारपर्यंत काँग्रेस नेते भूपेंद्र सिंह हुड्डा कुस्तीपटूंना भेटण्यासाठी आंदोलनस्थळी पोहोचणार आहेत. सोमवारी भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा नेट्टा डिसोझा, आपचे राज्यसभा खासदार सुशील गुप्ता आणि एआयडीडब्ल्यूएच्या AIDWA च्या महिला सदस्यांनी कुस्तीपटूंची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला.
खेळाडूंच्या समर्थनार्थ सरसावले हुड्डा : केंद्र सरकारच्या क्रीडा धोरणाविरोधात जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या खेळाडूंच्या समर्थनार्थ माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा पुढे आले आहेत. भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी यावेळी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले "देशाचे नाव कमावणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना धरणे धरून बसावे लागत आहे, ही खेदाची बाब आहे. त्यांना न्याय मिळाला पाहिजे. मी स्वत: दिल्लीतील जंतरमंतर येथील आंदोलनस्थळी उद्या दुपारी जाणार असल्याचे त्यांनी ट्विट करुन कळवले आहे. त्यामुळे दुपारी 2:00 वाजेपर्यंत हुड्डा हे जंतरमंतरवर पोहोचू शकतील, असे सांगण्यात येत आहे. यासोबतच आणखी अनेक बडे नेते येण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
कुस्ती परिषदेच्या विरोधात खेळाडू एकवटले : मागील महिन्यात जानेवारीमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटूंनी कुस्ती संघाविरोधात आंदोलन केले होते. रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WFI) चे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचे आरोप केले होते. कुस्तीपटूंनी दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलनही केले होते. आता पुन्हा एकदा बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगट यांच्यासह अनेक पैलवान जंतरमंतरवर आंदोलन करत आहेत. जंतरमंतरवर कुस्तीपटूंचे आंदोलन आज तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे.
हेही वाचा - Namo Medical Collage : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दादरा नगर हवेलीत करणार पाच हजार कोटींच्या विकास कामांचे लोकार्पण