ETV Bharat / bharat

Wrestlers Protest : ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात खेळाडू का करत आहेत आंदोलन? जाणून घ्या संपूर्ण विवाद

महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक आणि मानसिक शोषणाच्या आरोपांनी घेरलेले ब्रिजभूषण शरण सिंह यांनी राजीनामा देण्यास नकार दिला आहे. दुसरीकडे, जंतरमंतरवर सिंह यांचा राजीनामा आणि भारतीय कुस्ती महासंघ विसर्जित करण्याच्या मागणीवर कुस्तीपटू ठाम आहेत. सध्या ब्रिजभूषण सिंह यांना शनिवारी सायंकाळपर्यंत उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. क्रीडामंत्र्यांनी याप्रकरणी पुन्हा एकदा कुस्तीपटूंची भेट घेतली आहे. काय आहे संपूर्ण वाद, जाणून घ्या.

Wrestlers Protest
कुस्तीपटूंचे आंदोलन
author img

By

Published : Jan 21, 2023, 8:55 AM IST

ब्रिजभूषण सिंह यांच्या राजीनाम्यावर कुस्तीपटू ठाम

नवी दिल्ली : दिल्लीचे जंतरमंतर सध्या देशभरातील स्टार कुस्तीपटूंचा आखाडा बनले आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर मानसिक आणि शारीरिक शोषणाचा आरोप करत त्यांच्या राजीनाम्यावर कुस्तीपटू ठाम आहेत. दुसरीकडे, ब्रिजभूषण यांनी राजीनामा देण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. ब्रिजभूषण शरण सिंह हे गेल्या 11 वर्षांपासून WFI चे अध्यक्षपद भूषवत आहेत. कुस्तीपटूंना दिल्ली महिला आयोग तसेच अभाविपच्या अनेक बड्या व्यक्तींचा पाठिंबा मिळाला आहे.

काय आहे वाद? : 18 जानेवारी रोजी जंतरमंतरवर सकाळी 11 वाजताच्या सुमारास साक्षी मलिक, विनेश फोगट, संगीता फोगट, अंशू मलिक, बजरंग पुनिया आणि सत्यव्रत कडयन यांच्यासह अनेक कुस्तीपटूंनी धरणे धरल्याने हा वाद सुरू झाला. कुस्तीपटूंनी महासंघाच्या अध्यक्षांवर लैंगिक छळाचा आणि मनमानी वृत्तीचा अवलंब केल्याचा आरोप केला. यानंतर या प्रकरणाने पेट घेतला. आंदोलन करणाऱ्या या खेळाडूंना सर्वत्र पाठिंबा मिळतो आहे. गीता फोगट, बबिता फोगट यांच्यासह इतर खेळाडूंनी या प्रकरणाबद्दल ट्विट केले आणि कुस्तीपटूंना पाठिंबा दिला. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी विनेश फोगट यांची भेट घेतली आणि त्यांना पाठिंबा दिला. तसेच याप्रकरणी दिल्ली पोलिसांना नोटीसही पाठवली आहे.

कुस्तीपटूंचे आरोप : विनेश फोगट, बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांच्यासह देशातील काही आघाडीच्या कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती संघटनेचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह आणि प्रशिक्षकांवर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. जागतिक चॅम्पियनशिप पदक विजेती आणि ऑलिम्पियन विनेश फोगटने दावा केला आहे की अनेक प्रशिक्षकांनी महिला कुस्तीपटूंचेही शोषण केले आहे. या प्रकरणी अद्याप समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचे या पैलवानांचे म्हणणे आहे. आतापर्यंत केवळ आश्वासने मिळाली आहेत, कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. महासंघाचे प्रमुख जोपर्यंत तुरुंगात जात नाहीत तोपर्यंत आम्ही हे प्रकरण सोडणार नाही. सरकारने कारवाई न केल्यास पोलिसांकडे जाऊ, अशी भूमिका कुस्तीपटूंनी घेतली आहे.

कुस्तीपटूंना वाढते समर्थन : हळूहळू चळवळ करणाऱ्या कुस्तीपटूंना बाहेरूनही पाठिंबा मिळू लागला. हरियाणातील खाप पंचायतींनी त्यांना पाठिंबा देत दिल्लीकडे मोर्चाची तयारी सुरू केली आहे. खाप पंचायतींनी कुस्ती महासंघाच्या अध्यक्षाविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर या प्रकरणात राजकीय पक्षांची देखील एन्ट्री झाली. भाजपचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री संजीव बाल्यान यांनी कुस्तीपटूंना पाठिंबा दिला आहे. त्यांनी बजरंग पुनियाशी फोनवर बोलून खेळाडूंचा सन्मान कमी होणार नाही, अशी ग्वाही दिली. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ ट्विट केले आहे. ते म्हणाले की, देशातील महिला खेळाडूंच्या सुरक्षेच्या प्रश्नावर सरकार आपल्या नेत्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचवेळी अभाविपनेही आंदोलनस्थळी कुस्तीपटूंना पाठिंबा दिला.

कुस्तीपटूंनी क्रीडामंत्र्यांची भेट घेतली : गुरुवारी जंतरमंतरवर आंदोलन सुरूच होते. सायंकाळी उशिरा क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर चंदीगडहून दिल्लीला पोहोचले. रात्री १० वाजता त्यांनी आंदोलक पैलवानांना त्यांच्या दिल्लीतील शासकीय निवासस्थानी जेवायला बोलावले. त्यांच्या निमंत्रणावरून कुस्तीपटू बजरंग पुनिया, विनेश फोगट, साक्षी मलिक, बबिता फोगट, सत्यव्रत आणि अंशू मलिक यांनी क्रीडामंत्र्यांची भेट घेतली. बैठकीपूर्वी माध्यमांशी बोलताना क्रीडामंत्र्यांनी खेळाडूंचे आरोप गंभीर असल्याचे सांगितले. तसेच आरोपांची चौकशी केली जाईल, असे ते म्हणाले.

ब्रिजभूषण सिंह यांना शनिवारपर्यंत मुदत : कुस्तीपटूंसोबतच्या बैठकीदरम्यान क्रीडा मंत्रालयाने ब्रिजभूषण सिंह यांना 24 तासांच्या आत राजीनामा देण्यास सांगितले असल्याची बातमी मीडियामध्ये आली. मंत्री ठाकूर यांच्या घरातून बाहेर पडलेल्या पैलवानांनी माध्यमांशी संवाद साधला नाही. पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, क्रीडा मंत्रालयाने ब्रिजभूषण सिंह यांना बोलण्याची संधी दिल्याचे स्पष्ट झाले. त्यांना बाजू मांडण्यासाठी शनिवारी सायंकाळपर्यंत मुदत देण्यात आली आहे. क्रीडामंत्र्यांनी खेळाडूंना कुस्ती संघटनेच्या उत्तराची वाट पाहण्यास सांगितले आहे. क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनीही खेळाडूंवर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

'राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही' : शुक्रवारी या संपूर्ण प्रकरणावर ब्रिजभूषण सिंह यांचे वक्तव्य आले आहे. राजीनाम्यावर बोलताना ते म्हणाले की, मी राजीनामा देणार नाही. मी कुठल्याही चौकशीसाठी तयार आहे. ब्रिजभूषण यांनी 22 जानेवारीला कुस्ती संघटनेची बैठक बोलावण्याची घोषणा केली आहे. कुस्तीपटूंना पाठिंबा देत गोंडा येथील नंदिनी नगर कुस्ती स्टेडियमवर राष्ट्रीय स्पर्धा खेळण्यासाठी गेलेले हरियाणा आणि हिमाचल प्रदेशातील अनेक खेळाडू सामना न खेळताच परतले. दुसरीकडे, जंतरमंतरवर आंदोलक कुस्तीपटूंनी सांगितले की, गरज पडल्यास आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कायदेशीर मार्गाचा अवलंब करू. महासंघ बरखास्त करण्याची त्यांची मागणी आहे. तसेच त्यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या तर आंदोलक कुस्तीपटू आपापल्या घरी जातील, असेही सांगितले.

ताजे अपडेट : शुक्रवारी सकाळी ब्रिजभूषण सिंह यांनी ट्विट करून दुपारी 12 वाजता या प्रकरणावर पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती दिली. यानंतर दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद होणार असल्याची माहिती आली. पण ती परिषद देखील रद्द झाली. संध्याकाळी 5.45 वाजता भारतीय ऑलिम्पिक संघटनेची एक आभासी बैठक झाली ज्यामध्ये कुस्तीपटूंच्या तक्रारींवर चर्चा करण्यात आली. क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी संपावर बसलेल्या कुस्तीपटूंची पुन्हा भेट घेतली. बैठकीपूर्वी विनेश फोगट यांनी आपल्या काही मागण्या आतापर्यंत मान्य झाल्या नसल्याचं मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या मते त्यांच्या सर्व मागण्या मान्य न झाल्यास सर्व पैलवान जंतरमंतरवरच कार्यक्रम करतील.

कोण आहेत ब्रिजभूषण सिंह? : बाहुबली इमेज असणारे ब्रिजभूषण शरण सिंह 1991 मध्ये पहिल्यांदा भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवून खासदार झाले आणि संसदेत पोहोचले. यानंतर 1999 आणि 2004 च्या लोकसभा निवडणुकीतही ते भाजपच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आले. पण 2009 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी पक्ष बदलला आणि समाजवादी पक्षाच्या तिकीटावर लोकसभेत पोहोचले. 2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ब्रिजभूषण पुन्हा भाजपमध्ये दाखल झाले आणि विजयी झाले. यानंतर त्यांनी भाजपच्या तिकिटावर 2019 ची निवडणूकही जिंकली. ब्रिजभूषण सिंह यांची गणना बाहुबली आणि दबंग खासदारांमध्ये केली जाते. अलीकडेच रांची येथे झालेल्या 15 वर्षांखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत मंचावर एका कुस्तीपटूला थप्पड मारल्याने ते चर्चेत आले होते. ब्रिजभूषण हे त्यांच्या स्पष्ट वक्तृत्वासाठी देखील ओळखले जातात. यामुळे ते वादातही सापडले आहेत. 1992 मध्ये बाबरी मशीद विध्वंस प्रकरणातही ते आरोपी होते.

हेही वाचा : Ram Rahim Parole : राम रहीमला पुन्हा पॅरोल मंजूर, आज तुरुंगातून बाहेर येण्याची शक्यता

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.