ETV Bharat / bharat

world photography day 2023 : जाणून घ्या आजच्या दिवशीच का साजरा केला जातो जागतिक छायाचित्रण दिन... - जागतिक छायाचित्रण दिनाची सुरुवात

१९ ऑगस्ट हा जागतिक छायाचित्रण दिन म्हणून साजरा केला जातो. छायाचित्रणाच्या क्षेत्रात आपले अमूल्य योगदान देणाऱ्या छायाचित्रकारांचे कौतुक करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. पण तुम्हाला माहीत आहे का, हाच दिवस का निवडला. तर मग ही माहित वाचाच...

world photography day 2023
जागतिक छायाचित्रण दिवस
author img

By

Published : Aug 19, 2023, 12:17 PM IST

मुंबई : आजकाल बहुतेक लोकांना त्यांच्या आयुष्याशी संबंधित प्रत्येक अपडेट सोशल मीडियावर शेअर करायला आवडते. तुम्हाला प्रवास करताना वेगवेगळ्या ठिकाणांची सुंदर छायाचित्रे क्लिक करायला आवडत असतील. प्रत्येकाच्या आयुष्यात फोटो खूप महत्त्वाचे असतात. लोक आपला इतिहास केवळ छायाचित्रांमधूनच पाहत आले आहेत. फोटो प्रत्येकासाठी खास असतात. दरवर्षी १९ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय छायाचित्रण दिन साजरा केला जातो. हा दिवस प्रत्येकासाठीच महत्वाचा आहे.

जागतिक छायाचित्रण दिनाचा इतिहास : वर्ल्ड फोटोग्राफी डे साजरा करण्याची सुरुवात फ्रान्समध्ये १८३७ मध्ये झाली. फ्रान्सचे जोसेफ निसेफोर आणि लुई डग्युरे यांनी त्यावर्षी १९ ऑगस्ट रोजी याची सुरुवात केली. त्यानंतर तेथील सरकारने हा दिवस साजरा करण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून दरवर्षी १९ ऑगस्ट रोजी जागतिक छायाचित्रण दिन साजरा केला जातो.

जागतिक छायाचित्रण दिनाची सुरुवात : आजच्या युगात फोटोग्राफर फोटो काढण्यासाठी एकापेक्षा एक अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या कॅमेऱ्यांचा वापर करतात. याशिवाय फोटो काढण्यासाठी आता प्रत्येकाकडे स्मार्ट फोन आहेत. त्यामुळे आज फोटो काढणे ही गोष्ट खूप सोपी झाली आहे. मात्र पूर्वी फोटो काढणे खूप कठीण काम होते. १८३९ मध्ये रॉबर्ट कॉर्नेलियसने आपल्या वडिलांच्या दुकानाचा फोटो काढण्यासाठी कॅमेरा लावला होता. त्यानंतर दुकानाचा फोटो त्यांनी क्लिक केला आणि ३ मिनिटांनी एक फोटो बाहेर आला. त्यानंतर हळूहळू फोटो काढण्याची सुरुवात होऊ लागली.

जागतिक छायाचित्रण दिनाचा उद्देश : जागतिक छायाचित्रण दिन साजरा करण्यामागचा उद्देश छायाचित्रण कलेला प्रोत्साहन देणे हा आहे. त्यानिमित्त या दिवशी अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात आणि छायाचित्रण प्रदर्शनही आयोजित केले जाते, ज्याद्वारे देशातील प्रसिद्ध छायाचित्रकारांनी क्लिक केलेले दुर्मीळ फोटो या कार्यक्रमात प्रदर्शित केले जातात.

जागतिक छायाचित्रण दिनाची थीम : जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त देशभरात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्यासाठी दरवर्षी एक थीम ठरवली जाते. यावर्षी जागतिक छायाचित्रण दिन २०२३ साठी 'लँडस्केप' ही थीम निश्चित करण्यात आली आहे. तसेच आज जागतिक छायाचित्रण दिनाच्या या विशेष प्रसंगी, अनेकजण सोशल मीडियावर फोटो शेअर करतात. आज तुम्हीही तुमच्या कॅमेरा किंवा मोबाईल फोनने उत्तम फोटो काढून सोशल मीडियावर शेअर करू शकता आणि जागतिक छायाचित्रण दिन साजरा करू शकता. हा दिवस प्रत्येक छायाचित्रकारासाठी खूप विशेष आहे.

हेही वाचा :

  1. Mushroom Side Effects : पचनाच्या समस्यांपासून ते लठ्ठपणापर्यंत, जाणून घ्या मशरूम खाण्याचे दुष्परिणाम
  2. Fasting Benefits : वजन कमी करण्यापासून ते रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यापर्यंत, उपवासाचे आश्चर्यकारक फायदे
  3. Walking Benefits : दररोज किती चालल्यानं मृत्यूचा धोका कमी होतो? वाचा या प्रश्नाचं उत्तर...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.