जैसलमेर (राजस्थान) - स्वातंत्र्याच्या अमृतमहोसत्वी वर्षांच्या निमित्ताने आणि 15 जानेवारी रोजी असलेल्या भारतीय सेना दिवसाच्या निमित्ताने जैसलमेर येथील युद्ध संग्रहालयात सगळ्यात मोठा खादीचा तिरंगा झेंडा ( World largest Khadi tricolor hoisted in Jaisalmer War Museum ) साकारला आहे. हा तिरंगा खादी पासून बनवलेला जगातील सर्वात मोठा राष्ट्रीय ध्वज ( World largest Khadi tricolor ) आहे. यावेळी येथे भारतीय सेनेचे उच्च अधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते.
लेह मुंबईतही आहे खादीचा तिरंगा -
लेह आणि मुंबई नंतर जैसलमेर हे तिसरे ठिकाण आहे जेथे खादीपासून बनवलेला तिरंगा लावण्यात आला. यापूर्वी जगातील सर्वात मोठा खादीपासून बनलेला राष्ट्रीय ध्वज हा लद्दाख येथील लेह येथे होता. त्याची 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी यांच्या 152 व्या जयंती निमित्त स्थापना करण्यात आली होती.
-
#WATCH | On the occasion of Army Day today, the Southern Command unveiled a Monumental National Flag of size 225 feet by 150 feet at Jaisalmer Military Station, Jaipur.
— ANI (@ANI) January 15, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
(Source: Indian Army) pic.twitter.com/Lk5jTsOY5I
">#WATCH | On the occasion of Army Day today, the Southern Command unveiled a Monumental National Flag of size 225 feet by 150 feet at Jaisalmer Military Station, Jaipur.
— ANI (@ANI) January 15, 2022
(Source: Indian Army) pic.twitter.com/Lk5jTsOY5I#WATCH | On the occasion of Army Day today, the Southern Command unveiled a Monumental National Flag of size 225 feet by 150 feet at Jaisalmer Military Station, Jaipur.
— ANI (@ANI) January 15, 2022
(Source: Indian Army) pic.twitter.com/Lk5jTsOY5I
225 फूट लांब आणि 150 फूट रुंद तिरंगा -
माहितीनुसार खादी ग्रामोद्योग कडून 225 फूट लांब आणि 150 फूट रुंद तिरंगा लावण्यात आला आहे. त्याचे वजन जवळपास 1 हजार किलोग्रम आहे. हा तिरंगा जवळपास 37 हजार 500 चौरस मीटर मध्ये पसरलेला आहे.
हेही वाचा - Army Day Parade : लष्कराच्या संयमाची चाचणी घेण्याची चूक कोणीही करू नये - लष्करप्रमुखांचा इशारा