ETV Bharat / bharat

World Heart Day : आज जागतिक हृदय दिन, तरुणांनो ह्रदय सांभाळा - जागतिक हृदय दिन साजरा

हृदयाच्या समस्यांबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी याकरिता दरवर्षी 29 सप्टेंबर (World Heart Day is celebrated on September 29) हा दिवस ‘जागितक हृदय दिन’ (World Heart Day) म्हणून साजरा केला जातो. हृदयामुळे अनेक तरुणांचा जीव जातो. त्यामुळे खास करून तरुणांनी हृदयाची काळजी घेण्याची सध्या नितांत गरज आहे.

World Heart Day
आज जागतिक हृदय दिन
author img

By

Published : Sep 23, 2022, 7:23 PM IST

Updated : Sep 29, 2022, 9:19 AM IST

सप्टेंबर २९ ला ' जागतिक हृदय दिन' जगभरात साजरा (World Heart Day is celebrated on September 29) केला जातो. जागतिक हृदय दिन (World Heart Day) हा कौटुंबिक, शासकीय, सामाजिक पातळीवर हृदयांच्या आरोग्यासंबंधी जनजागृती पसरवण्यासाठी साजरा केला जातो. वर्ल्ड हार्ट फेडरेशनच्यामते (CVD) धुम्रपान, डायबिटीस, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, प्रदुषण यांमुळे हृदयासंबंधी आजार वाढत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू हृदयासंबंधी आजारांमुळे होतो.

हृदयाची काळजी घेण्याची तरुणांना गरज - मागील काही काळात तरुणांमध्ये हृदयांचे आजार जास्त वाढताना दिसत आहेत. त्यामुळे अनेक तरुणांचा यामध्ये मृत्यू देखील झाला आहे. टीव्ही आणि चित्रपट जगतातील प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता राजू श्रीवास्तव यांना देखील हृदयविकाराचा झटका आला होता. तो व्यायाम करताना ट्रेडमिलवरून पडला होता. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. पुनीत राजकुमार, भानअभिनेता दीपेश भान, शुक्लाफिटनेस फ्रिक सिद्धार्थ शुक्ला, कपाडियासेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर कैझाद कपाडिया या तरुण सेलिब्रिटींचा हृदयविकाराने मृत्यू झाला होता. त्यामुळे तरुणांनी आता हृदयाची काळजी घेण्याची सध्या नितांत गरज आहे.

हृदय विकारांची लक्षणं : जागतिक आरोग्य संघटनेनं २०१३ मध्ये नॉन कम्युनेकेबल डिसीज नियंत्रणात आणण्यासाठी मोहीम सुरू केली होती. (CVD) कार्डीओ वॅस्क्युलर डिसीज त्यातील महत्वाचा भाग होता. २०२५ पर्यंत (CVD) मुळे वाढणारा मृत्यूदर २५ टक्क्यांनी कमी करणं हे त्या मागचं उद्दिष्ट होतं. हृदयाच्या आजारांमुळे वाढणारा मृत्यूदर कमी करण्यासाठी आणि लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. आज आम्ही तुम्हाला हार्ट अटॅक येण्याच्या महिनाभर आधी कोणती लक्षणं दिसतात. याबाबत सांगणार आहोत. कोणताही अटॅक मेंदूचा असो किंवा हार्टचा अचानक येत असतो. काही आठवडे आधी शरीरात बदल दिसून येतात. चालताना छाती खूप जास्त हेवी झाल्यासारखी वाटते. त्याला 'एंजायना पेन' असं सुद्धा म्हणतात. छाती जड झाल्यासारखी वाटणं हे हृदयाच्या आजारांचे मोठं लक्षण आहे. कोणताही अटॅक मेंदूचा असो किंवा हार्टचा अचानक येत असतो. काही आठवडे आधी शरीरात बदल दिसून येतात. चालताना छाती खूप जास्त हेवी झाल्यासारखी वाटते. त्याला एंजायना पेन असं सुद्धा म्हणतात. छाती जड झाल्यासारखी वाटणं हे हृदयाच्या आजारांचे मोठं लक्षण आहे.

हृदयाशी संबंधित आजार : अचानक श्वास घ्यायला त्रास होतो. चालताना, जिने चढताना- उतरताना दम लागतो. या समस्येकडे तुम्ही अजिबात दुर्लक्ष करता कामा नये. अनेकदा घश्यात जळजळ सुद्धा होत असते. काहीही खाताना जळजळीचा सामना करावा लागतो. काहीही खाल्यानंतर अशी समस्या जाणवत असेल तर हार्ट अटॅकचं लक्षण असू शकतं. याशिवाय काहीही खाल्यानंतर चालण्या फिरण्यास त्रास होणं, छातीत जळजळणं यामुळे हार्टचे इतर आजार उद्भवण्याची शक्यता असते. चक्कर, उलटी, पोटाच्या समस्या उद्भवतात. सगळ्यात महत्वाचं लक्षणं म्हणजे विकनेस, थकवा खूप जाणवतो. या लक्षणांव्यतिरिक्त काही लोकांना डावा हात दुखण्याची समस्या उद्भवते. साधारणपणे चालताना ही समस्या वाढते. जर एखाद्या व्यक्तीला खूप जास्त खोकला कफची समस्या असून हाता-पायांना सूज येत असेल तर गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं.

अनेकांना कोणतेही शारीरिक श्रमाचे काम न करता घाम येण्याची समस्या जाणवते. महिलांमध्ये आणि पुरूषांमध्ये हार्ट अटॅकची कारणं वेगवेगळी असतात. मादक पदार्थांचे सेवन, लठ्ठपणा, आनुवांशिकता ही कारणं हार्ट अटॅकची असू शकतात. अशी लक्षणं दिसत असल्यास वेळीच तज्ञांशी संपर्क करून तपासणी करून घ्या.

Last Updated : Sep 29, 2022, 9:19 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.