ETV Bharat / bharat

WHO on Monkeypox: मंकीपॉक्स ही जागतिक आरोग्य आणीबाणी-जागतिक आरोग्य संघटनेची घोषणा - सामुदायिक औषध

जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सबाबत सतर्कतेचा इशारा दिला आहे. WHO ने मंकीपॉक्स संदर्भात जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केली. भारतात १४ जुलै रोजी मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण सापडला होता. हा रुग्ण दुबईतून भारतात आला होता. त्यानंतर या रुग्णाची चाचणी केल्यानंतर तो मंकीपॉ़क्स पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. आता सध्या या सगळ्या रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Monkey pox
Monkey pox
author img

By

Published : Jul 24, 2022, 7:21 AM IST

नवी दिल्ली - जगभरात मंकीपॉक्स विषाणूचा वाढता संसर्ग बघता जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपाक्सला सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित करण्यात आले आहे. भारतासह ( India ) जगभरात मंकीपॉक्सची ( Monkey pox ) प्रकरणे वाढताना दिसत आहेत. देशात आत्तापर्यंत मंकीपॉक्सची 3 प्रकरणे समोर आली आहेत. तर अमेरिकेत पहिल्यांदा मंकीपॉक्सची लक्षणे लहान मुलांमध्ये दिसून आले आहेत. मंकीपॉक्सचा वाढत असलेला प्रभाव बघता जागतिक आरोग्य संघटनेने ( World Health organization ) मंकीपॉक्सला जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणून जाहीर केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार की, ७० हून अधिक देशांत मंकिपॉक्सचा वाढत असलेला प्रसार पाहता ही जागतिक आपातकालिन स्थिती आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस घेब्रेयसस यांनी बैठकीमध्ये सदस्यात एकमत झाले नसतानाही ही घोषणा केली आहे. पहिल्यांदा जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखाने अशा प्रकारची घोषणा सर्वसहमीला गृहित न धरता केली आहे.

रोगाची अत्यंत कमी माहिती - जागतिक आरोग्य संघटनेचे टेड्रोस यांनी दिलेल्या माहितीनुसार की, आपण अशा एका महामारीचा सामना करत आहोत, जी महामारी संक्रमणाच्या नव्या माध्यम वेगाने जगभरात फैलाव करत आहे. या रोगाविषयी अत्यंत कमी माहिती असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने यावेळी सांगितले आहे. त्यामुळे ही महामारी आणीबाणी घोषित करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

कोरोनानंतर आता मंकीपॉक्सचे संकट - कोरोना संक्रमणातून जग आत्ता कुठे सावरत होते. मंकीपॉक्स या नव्या आजाराचा जगात प्रसार होताना दिसत आहे. मंकीपॉक्सचे रुग्ण गतीने जगभरात सगळ्या देशात पाहायला मिळत आहेत. आपल्या देशात मंकीपॉक्सचे आत्तापर्यंत 3 रुग्ण सापडले आहेत. हे 3 रुग्ण केरळ राज्यात सापडले असल्याचे सांगण्यात येते आहे. एकाच राज्यात 8 दिवसांत 3 रुग्ण सापडल्याने राज्य आणि केंद्र सरकारने सतर्कता बाळगण्यास सुरुवात केली आहे. केरळ राज्यात या आजाराचा प्रसार होऊ नये, यासाठी आता पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे. केरळ सरकारच्या मदतीसाठी केंद्र सरकारने मल्टी डिसिप्लिनरी टीम पाठवण्याची घोषणा केली आहे. भारतात १४ जुलै रोजी मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण सापडला होता. हा रुग्ण दुबईतून भारतात आला होता. त्यानंतर या रुग्णाची चाचणी केल्यानंतर तो मंकीपॉ़क्स पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. आता सध्या या सगळ्या रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

काय आहेत मंकीपॉक्सची लक्षणे - मंकीपॉक्स आजारात तुमच्या संपूर्ण शरिरावर बारीक पुळ्या येतात. हा दुर्मीळ आजार मानण्यात येतो. सुरुवातीला संक्रमित व्यक्तीला ताप आणि फ्ल्यूसारखी लक्षणे जाणवतात. कांजण्यांसारखी याची लक्षणे आहेत. सुरुवातीला ताप, पाठदुखी, सूज, डोकेदुखी सारखी लक्षणे जाणवू लागते. नंतर शरिरावर पुरळ उठू लागते. याचे विषाणू डोळे, नाक, श्वासांद्वारे इतरांमध्ये संक्रमित होण्याची शक्यता आहे. हा आजार बरा होणारा असला, तरी सगळ्यांनीच याची काळजी घेण्याची गरज असल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा - Sachin Ahir criticizes Devendra Fadnavis : तुम्ही 5 वर्ष मुख्यमंत्री होते, शिवसेना बेईमान कशी? सचिन अहिर यांचा देवेंद्र फडणवीसांना सवाल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.