कोलकाता (पश्चिम बंगाल) : अक्षर पटेलच्या जागी 37 वर्षीय अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनची विश्वचषक 2023साठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. आयसीसी विश्वचषक 2023 च्या संघात फिरकीपटू अक्षर पटेलच्या ऐवजी अश्विनची निवड झाल्यानं क्रिकेट प्रेमीनी सुटकेचा श्वास सोडलाय.
ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनची निवड : 5 सप्टेंबर रोजी जाहीर झालेल्या विश्वचषकासाठी सुरुवातीच्या संघात अष्टपैलू रवींद्र जडेजा नंतर दुसरा फिरकीपटू म्हणून अक्षर पटेल होता. परंतु अक्षर पटेलला दुखापत झाल्यामुळं त्याला बरे होण्यासाठी किमान चार ते पाच आठवडे लागण्याची शक्यता होती म्हणुन त्यांच्या जागेवर ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनची निवड करण्यात आली आहे. बीसीसीआयच्या एका उच्चपदस्थ सूत्रानं नाव न सांगण्याच्या अटीवर शुक्रवारी ईटीव्ही भारतला सांगितलं की, "खेळण्याचा प्रचंड अनुभव असलेल्या रविचंद्रन अश्विनवर विश्वास ठेवण्याशिवाय भारतीय टीमकडं कोणताच पर्याय नव्हता." ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या घरच्या मालिकेपूर्वी श्रीलंकेत नुकत्याच झालेल्या आशिया चषकाच्या समाप्तीपासून अश्विन फ्रेममध्ये असल्याचं समजतं.
चार वेगवान गोलंदाजांव्यतिरिक्त एक ऑफ-स्पिनर : "भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मानं अश्विनला भेटण्यासाठी बोलावलं होतं. परंतु अश्विननं सामन्यात फिट होण्यासाठी काही दिवसांचा अवधी मागितला. त्यानंतर अंतिम संघामध्ये 37 वर्षीय खेळाडूचा समावेश करण्याची संपूर्ण प्रक्रिया सुरू झाली. आता चार वेगवान गोलंदाजांव्यतिरिक्त एक ऑफ-स्पिनर आणि डावखुरा फिरकीपटूसह संघ परिपूर्ण दिसत आहे."
ऑक्टोबरपासून विश्वचषक मोहिमेला सुरुवात : अश्विनं 2011 मध्ये भारतात झालेल्या क्रिकेट विश्वचषकात विजेत्या संघाचा भाग होता. यंदाच्या विश्वचषकात विराट कोहली, अश्विन हे दोनच खेळाडू 2023 विश्वचषकात 2011 च्या विजेत्या संघाकडून खेळणार आहेत. भारत 8 ऑक्टोबरपासून विश्वचषक मोहिमेला सुरुवात करणार आहे. चेन्नईमध्ये टीम इंडिया पाच वेळच्या चॅम्पियन ऑस्ट्रेलियाविरुद्ध डबलहेडर खेळणार आहे. त्याआधी भारताचे सराव सामने होतील. टीम इंडिया 30 सप्टेंबरला इंग्लंड, त्यानंतर 3 ऑक्टोबरला नेदरलँडशी खेळणार आहे.
- अश्विनची वनडे कारकीर्द : अश्विननं भारतासाठी 115 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या 115 सामन्यांमध्ये अश्विननं 4.95 च्या, आणि 33.2 च्या सरासरीने 155 विकेट्स घेतल्या आहेत. 25 धावांत चार बळी, अशी अश्विनची वनडेतील सर्वोत्तम कामगिरी आहे.
- भारताचा संघ : रोहित शर्मा (सी), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (डब्ल्यूके), इशान किशन (डब्ल्यूके), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (वीसी), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर , मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह
हेही वाचा -