घराच्या सुख-समृद्धीसाठी वास्तूची विशेष काळजी घेतली पाहिजे. वास्तुशास्त्रानुसार देवी लक्ष्मीला प्रसन्न (Mata Lakshmi Blessing) करण्यासाठी विविध प्रकारची पूजा-पाठ केले जातात. छोटे-छोटे वास्तु उपाय पाळल्यास घरामध्ये ऐश्वर्य, शांती आणि समृद्धी (there will be no poverty in house) येते. यासोबतच घरामध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो आणि घरातून नकारात्मक ऊर्जाही बाहेर निघुन जाते. चला तर मग जाणून घेऊया, वास्तूनुसार (Vastu Tips) झोपण्यापूर्वी कोणते (work before going to sleep) काम करावे. Vastu Tips
- घरातील जागा मिठाने स्वच्छ करा : घरातील स्टाईल किंवा जागा पाण्यात मिठ घालुन स्वच्छ करा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा निघुन जाते. तसेच, घरात किटक व मुंग्या देखील कमी प्रमाणात होतात.
2. मंदिरात दिवा लावा : रात्री झोपण्यापूर्वी मंदिरात तुपाचा दिवा अवश्य लावा. असे मानले जाते की, रोज तुपाचा दिवा लावल्याने लक्ष्मीची कृपा सदैव राहते, त्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होते. मंदिरात कधीही अंधार ठेवू नये.
3. कापूर जाळणे : वास्तुशास्त्रानुसार झोपण्यापूर्वी थोडा कापूर जाळून त्याचा धूर बेडरूममध्ये तसेच संपूर्ण घरात पसरवा. असे मानले जाते की, असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होते.
4. मोहरीच्या तेलाचा दिवा : रात्री झोपण्यापूर्वी मोहरीच्या तेलाचा दिवा दक्षिण दिशेला लावावा. कारण या दिशेला पितरांचा वास असतो. दिवा लावल्याने ते प्रसन्न होतात आणि सुख-समृद्धीचा आशीर्वाद देतात. रात्रभर दिवा लावणे शक्य नसेल तर, संध्याकाळी दिवा लावा आणि मग या दिशेला छोटा बल्ब लावा.
5. मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवा : रात्री झोपण्यापूर्वी घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ करावा. घराच्या मुख्य दरवाजासमोर शूज आणि चप्पल काढू नये. कारण देवी लक्ष्मी मुख्य दरवाजातूनच घरात प्रवेश करते.
6. घराचे कोपरे स्वच्छ करा : वास्तूनुसार घराचा प्रत्येक कोपरा खूप महत्त्वाचा मानला जातो. असे मानले जाते की, घराच्या ईशान्य आणि उत्तर दिशा स्वच्छ करून रात्री झोपावे. कारण या कोपऱ्यात देवता कुबेरचा वास असतो. Vastu Tips