ETV Bharat / bharat

Women Reservation Bill : महिला आरक्षण विधेयक संसदेत सादर, जाणून घ्या राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया - संसद महिला विधेयक न्यूज

मोदी सरकारनं महिला आरक्षण विधेयक आज संसदेत सादर केलं. या विधेयकाबाबत देशभरातील नेते आणि विविध राजकीय पक्षांनी प्रतिक्रिया दिलीय. तर काही सेलिब्रिटींनीदेखील विधेयकाबाबत समाधान व्यक्त केलंय.

Women Reservation Bill
महिला आरक्षण विधेयक
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 19, 2023, 4:09 PM IST

Updated : Sep 19, 2023, 4:23 PM IST

नवी दिल्ली: देशात 27 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महिला आरक्षण विधेयकाला सोमवारी संध्याकाळी मोदी मंत्रिमंडळाकडून मंजुरी मिळाली. त्यानंतर हे विधेयक आज संसदेत मांडण्यात आलं. हे विधेयक संसदेच्या विशेष अधिवेशनात मंजूर होऊ शकते. महिला आरक्षण विधेयकावर, बीआरएस एमएलसी के कविता म्हणाल्या, मला आनंद आहे की, हे आरक्षण विधेयक मांडण्यात आलय. उद्या लोकसभेत महिला आरक्षणाला मंजुरी मिळेल, अशी आहे. काल मी विधेयकाबाबत चिंता व्यक्त केली होती. ती खरी ठरलीय. कारण राज्यसभेत विविध पक्षांच्या सहमतीने विधेयक मांडणं आणि सत्ताधारी सरकारनं विरोधकांचा मैत्रीचा हात पुढे करणे आवश्यक आहे. सरकार त्यासाठी पुढे येईल अशी आशा असून महिला आरक्षणाबाबत आनंद आहे.

महिला आरक्षण विधेयकावर, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी महिला आरक्षण विधेयकाचं स्वागत केलयं. ओमर अब्दुल्ला म्हणाले की, आम्ही 5 ऑगस्ट 2019 पूर्वीच पंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला आरक्षण लागू केलय. देशाच्या निर्णय प्रक्रियेत महिलांना योग्य स्थान मिळण्याकरिता आजवर आम्ही आरक्षणाच्या प्रक्रियेला कधीही विरोध केला नाही.

  • #WATCH | Hyderabad: On Women Reservation Bill tabled in Parliament, BRS MLC K Kavitha says, "I am happy it is tabled. It is in Lok Sabha already... We are really hoping that it will pass in the Lok Sabha tomorrow and go to Rajya Sabha as soon as possible and then get passed in… pic.twitter.com/zdBBu2rp40

    — ANI (@ANI) September 19, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

2029 पर्यंत हे आरक्षण लागू होणार नाही- ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या की, 30 वर्षांपासून महिला आरक्षणाकरिता संघर्ष सुरू आहे. राज्यघटनेनं समानतेचं वचन दिलं आहे. हे विधेयक गरजेचं होतं. विविध राजकीय पक्षांनी साडेनऊ वर्षांपूर्वी प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यानुसार भाजपाला त्यांच्या आश्वासनाची आठवण करून दिलीय. विधेयकातील माहितीनुसार सीमांकन लागू झाल्यानंतरच अंमलबजावणी म्हणजे 2029 पर्यंत हे आरक्षण लागू होणार नाही, असे खासदार चतुर्वेदी यांनी म्हटले.

  • #WATCH | Delhi: On Women's Reservation Bill, AIMIM Chief Asaduddin Owaisi says, "...Who are you giving representation to? Those who don't have representation should be given representation. The major flaw in this bill is that there is no quota for Muslim women and so we are… pic.twitter.com/LIrU5RJiaQ

  • महिला आरक्षण विधेयकाला एआयएमआयएमचे प्रमुख तथा खासदार असदुद्दीन ओवैसी म्हणाले, तुम्ही कोणाला प्रतिनिधित्व देणार आहात? ज्यांना प्रतिनिधित्व मिळत नाही, त्यांना प्रतिनिधित्व दिले पाहिजे. या विधेयकातील प्रमुख त्रुटी म्हणजे मुस्लिमांसाठी आरक्षण नाही. त्यामुळे आम्ही महिला आरक्षण विरोधात आहोत.
  • #WATCH | On the Women's Reservation bill, Lok Janshakti Party chief Chirag Paswan says, "First of all I would like to congratulate all the women of the country. For a long time, we have been waiting for the rights of women to be passed in this Parliament. It took a long time but… pic.twitter.com/O0ENRlAyPL

  • महिला आरक्षण विधेयकावर लोक जनशक्ती पक्षाचे प्रमुख चिराग पासवान यांनीदेखील प्रतिक्रिया दिलीय. पासवान म्हणाले की , सर्वप्रथम देशातील सर्व महिलांचे अभिनंदन करू इच्छितो. अनेक दिवसांपासून आम्ही या विधेयकाची वाट पाहत आहोत. आम्हाला आमच्या पंतप्रधानांवर हा विश्वास आहे.
  • महिला आरक्षण विधेयकावर अभिनेत्री ईशा गुप्ता म्हणाली, महिला आरक्षण ही पंतप्रधान मोदींनी केलेली ही एक सुंदर गोष्ट आहे. हे आरक्षण विधेयक महिलांना समान अधिकार देणार असल्यानं आमच्यासाठी हे एक मोठे पाऊल आहे. पंतप्रधान मोदींनी दिलेलं वचन पूर्ण केले. अभिनेत्री कंगना रणौत म्हणाली, महिला आरक्षण ही एक अद्भुत कल्पना आहे.
  • #WATCH | On Women's Reservation Bill, actor Kangana Ranaut says, " This is a wonderful idea, this is all because of our honourable PM Modi and this govt and his (PM Modi) thoughtfulness towards the upliftment of women" pic.twitter.com/xrtFZBZkNW

हेही वाचा-

  1. Parliament Special Session : नव्या संसदेत पोहोचताच पंतप्रधान मोदींनी केली महिला आरक्षणाची घोषणा, मंजुरीची औपचारिकता बाकी
  2. Parliament Special Session : आजपासून नव्या संसद भवनात कामकाजाचा 'श्रीगणेशा', जाणून घ्या संपूर्ण तपशील

Last Updated : Sep 19, 2023, 4:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.