इंदूर - महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी सरकारकडून कायदे करण्यात येत असले, तरी त्यांना आळा बसलेला नाही. इंदूरमध्ये एका युवतीचे अपहरण करून बलात्कारानंतर तीला रेल्वे रुळावर फेकल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पीडित तरुणी बीकॉमचे शिक्षण घेत असून ती कोचिंग क्लासेसवरून घरी परतत होती. तेव्ही ही घटना घडली. आरोपींनी तीचे अपहरण केले आणि त्यानंतर आरोपींनी तीच्यावर बलात्कार केला. याचबरोबर त्यांनी या घटनेचा व्हिडिओही बनवला. बलात्कारानंतर त्यांनी तीला पोत्यात टाकले आणि ते पोते लक्ष्मी बाई रेल्वे रुळावर टाकून फरार झाले.
ठार मारण्याचा प्रयत्न -
पीडितेला ठार मारण्याच्या आरोपींच्या प्रयत्नांना यश आले नाही. तीन स्वतःची सुटका करुन घेतली आणि आपल्या कुटुबीयांना यासंदर्भात कळवले. संपूर्ण प्रकरणाची माहिती कुटुंबीयांनी पोलिसांनी दिली असून तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
यापूर्वीही काढली होती तरुणीची छेड -
पीडितेचे काही दिवसांपूर्वीच लग्न झाले होते. मात्र, शिक्षणासाठी ती आई-वडिलांकडे राहण्यासाठी आली होती. संबधित आरोपीने यापूर्वीही तीची छेड काढत तिला त्रास दिला होता. अक्षय गुप्ता असे एका आरोपीचे नाव आहे. बलात्कारनंतर त्यांनी तीच्यावर चाकू हल्ला केल्याचे पीडितेने सांगितले. पोलीस मेडिकल रिपोर्टची वाट पाहत असून त्यानंतर आरोपींवर कारवाई करण्यात येई.
हेही वाचा - दुःखद बातमी : टिकरी सीमेवरील आंदोलक शेतकऱ्याचा मृत्यू