डेहराडून: डेहराडूनच्या नेहरू कॉलनीतील दलनवाला येथील रहिवासी असलेल्या पुष्पा मुंजियाल यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना आपल्या मालमत्तेचा वारस बनवण्याची विनंती न्यायालयाला केली आहे. या महिलेने डेहराडून न्यायालयात मृत्यूपत्र सादर केले असून राहुल गांधींच्या विचारांचा तिच्यावर खूप प्रभाव असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणावर बोलताना काँग्रेसचे महानगर अध्यक्ष लालचंद शर्मा म्हणाले की, राहुल गांधी यांच्या नावावर असलेल्या त्यांच्या मालमत्तेचे मृत्युपत्र माजी प्रदेशाध्यक्ष प्रीतम सिंह यांना त्यांच्या यमुना कॉलनी येथील निवासस्थानी सुपूर्द करण्यात आले आहे.
पुष्पा मुंजियाल यांनी त्यांच्या मालमत्तेची संपूर्ण माहिती कोर्टाला दिली आहे आणि मृत्यूनंतर तिच्या संपूर्ण मालमत्तेची मालकी राहुल गांधी यांच्याकडे सोपवण्याची विनंती केली आहे. तिच्याकडे 50 लाख रुपयांची मुदत ठेव आणि 10 ग्रॅम सोन्याचा समावेश आहे. त्या म्हणाल्या की, राहुल गांधींच्या कुटुंबाने स्वातंत्र्य मिळाल्यापासून देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले आहे.
राहुलचे आजोबा, जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते तर त्यांची आजी इंदिरा गांधी देखील भारताच्या पंतप्रधान होत्या ज्यानंतर राहुलचे वडील राजीव गांधी भारताचे पंतप्रधान झाले. त्यांच्या आई सोनिया सध्या काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा आहेत आणि त्यांची बहीण प्रियंका उत्तर प्रदेशच्या प्रभारी काँग्रेस सरचिटणीस आहेत.
हेहीवाचा : मुंबईतील महिलेने जमीन विकण्याच्या नावाखाली देहरादून येथील व्यापाऱ्याची केली फसवणूक