ETV Bharat / bharat

Bilawad Women Police Officer Rape : राजस्थानातील महिला पोलीस अधिकाऱ्याचा भाजप नेत्यावर अत्याचाराचा आरोप - भंवर सिंग पलाडा बलात्काराचा आरोप

एका महिला पोलीस अधिकाऱ्याने भाजपचे ( Woman Police Officer Accuses BJP leader Bhanwar Singh Palada of Rape ) अजमेर जिल्हा प्रमुख सुशीला कंवर पलाडा यांचे पती भंवर सिंग पलाडा यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. या संदर्भात शहरातील प्रतापनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ( Woman Police Officer FIR against Bhanwar Singh Palada ) करण्यात आला आहे.

rajasthan
rajasthan
author img

By

Published : Jan 29, 2022, 9:05 PM IST

भिलवाडा - एका महिला पोलीस अधिकाऱ्याने भाजपचे ( Woman Police Officer Accuses BJP leader Bhanwar Singh Palada of Rape ) अजमेर जिल्हा प्रमुख सुशीला कंवर पलाडा यांचे पती भंवर सिंग पलाडा यांच्यावर अत्याचाराचा आरोप केला आहे. या संदर्भात शहरातील प्रतापनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ( Woman Police Officer FIR against Bhanwar Singh Palada ) करण्यात आला आहे. मात्र, या हायप्रोफाईल प्रकरणात भिलवाडा पोलिसांनी प्रतिक्रिया देणे टाळले आहे. भाजप नेत्याने अश्लील फोटोही काढल्याचा आरोपही महिला पोलीस अधिकाऱ्याने केला आहे. अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपीने तिच्यावर अनेकवेळा अत्याचार केल्याचेही या महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी भवर सिंग पलाडाचे चालक रवींद्र, किशनपुरी, करण, बजरंग, विजय, नागौरचे तत्कालीन अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय गुप्ता यांच्यासह 11 जणांना अटक केली आहे. भंवरसिंग पलाडा याला केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित महिलेले तक्रारीत काय म्हटले -

पीडित महिला नागौर जिल्ह्यात ड्युटीवर असताना अजमेर आयजी कार्यालयात बदली करण्याबाबत तिने तत्कालीन नागौरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय गुप्ता यांची भेट घेतली होती. त्यावेळी संजय गुप्ता यांनी अजमेर येथील रहिवासी भंवरसिंग पलाडा यांचा नंबर दिला. जर मी त्यांच्याशी संपर्क साधला तर तुमचं काम होऊ शकते, असे त्यांनी पीडित महिलेला सांगितले होते. त्यावेळी महिलेने नकार दिला. पण ती गावात असताना तिला भाजप नेते भंवर सिंग पलाडा यांचा फोन आला आणि भेटायला बोलावले. एकटी असल्याने ती त्याला भेटायला गेली नाही. त्यानंतर महिलेची बदली भिलवाडा जिल्ह्यात झाली. त्या काळात ती भिलवाडा पोलीस लाईनमध्ये राहायला होती. एके दिवशी भंवरसिंह पलाडा अजमेरहून भिलवाडा येथे येत होते. वाटेत त्याची गाडी बिघडली आणि त्याने तिला फोन केला आणि पोलीस लाईनमध्ये आला जिथे त्याने 13 डिसेंबर 2018 रोजी तिच्यावर अत्याचार केला. जबरदस्ती करताना आरोपी नेत्याने रिव्हॉल्व्हर दाखवून तिच्यावर बलात्कार केला. एवढेच नाही तर ती बेशुद्ध पडल्यावर भंवर सिंगने तिचे अश्लील फोटोही काढले. शुद्धीवर आल्यावर तिने माफी मागितली आणि लग्न करण्याबाबत बोलायला सुरुवात केली. काही दिवसांनी तिला अश्लिल फोटो दाखवून पुन्हा तिच्यावर अत्याचार केला, असे महिलेले तक्रारीत म्हटले आहे. आज याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या हायप्रोफाईल प्रकरणाबाबत भिलवाडा पोलीस आणि प्रशासन काहीही बोलायला तयार नाही.

हेही वाचा -BJP MLA Suspension Quashes : 'लक्षात घ्या, भाजप आमदारांना न्यायालयानं सुनावलं आहे' : नवाब मलिक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.