जैसलमेर (राजस्थान) : राजस्थानच्या जैसलमेरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका महिलेचे काही गुंडांनी अपहरण केले आणि तिचे त्यांच्यापैकी एकाशी जबरदस्तीने लग्न लावून दिले. एका गुंडाने महिलेला बळजबरीने उचलून आगीभोवती प्रदक्षिणा घातल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दिल्ली महिला आयोगाच्या (DCW) अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी घटनेचा व्हिडिओ ट्विट करत आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
-
मीडिया द्वारा ये वीडियो जैसलमेर का बताया जा रहा है। रिपोर्ट्स के अनुसार एक लड़की को सरेआम किडनैप करके एक बंजर वीराने में आग जलाकर उसके साथ ज़बरदस्ती शादी कर ली। ये बेहद चौंकाने वाली और डराने वाली घटना है। @AshokGehlot51 जी मामले की जाँच कर कार्यवाही करें। pic.twitter.com/mZee4oJgSy
— Swati Maliwal (@SwatiJaiHind) June 6, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">मीडिया द्वारा ये वीडियो जैसलमेर का बताया जा रहा है। रिपोर्ट्स के अनुसार एक लड़की को सरेआम किडनैप करके एक बंजर वीराने में आग जलाकर उसके साथ ज़बरदस्ती शादी कर ली। ये बेहद चौंकाने वाली और डराने वाली घटना है। @AshokGehlot51 जी मामले की जाँच कर कार्यवाही करें। pic.twitter.com/mZee4oJgSy
— Swati Maliwal (@SwatiJaiHind) June 6, 2023मीडिया द्वारा ये वीडियो जैसलमेर का बताया जा रहा है। रिपोर्ट्स के अनुसार एक लड़की को सरेआम किडनैप करके एक बंजर वीराने में आग जलाकर उसके साथ ज़बरदस्ती शादी कर ली। ये बेहद चौंकाने वाली और डराने वाली घटना है। @AshokGehlot51 जी मामले की जाँच कर कार्यवाही करें। pic.twitter.com/mZee4oJgSy
— Swati Maliwal (@SwatiJaiHind) June 6, 2023
स्वाती मालीवाल यांचे ट्विट : 'हा व्हिडिओ जैसलमेरच्या मीडियात आला आहे. रिपोर्ट्सनुसार, एका मुलीचे सार्वजनिकरित्या अपहरण करण्यात आले आणि ओसाड वाळवंटात आग लावून तिला लग्न करण्यास भाग पाडण्यात आले. ही अत्यंत धक्कादायक आणि भयावह घटना आहे,' असे ट्विट स्वाती मालीवाल यांनी केले आहे. त्यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.
गुंडांनी लग्नाआधी केले अपहरण : व्हिडिओमध्ये, तो माणूस एका तरुणीला जबरदस्तीने उचलून तिच्यासह जळत्या गवताभोवती फेरे मारताना दिसत आहे. हिंदू धर्मात लग्न करताना अग्निची प्रदक्षिणा मारण्याची प्रथा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीचे 12 जून रोजी लग्न होणार होते. पण 1 जून रोजी 10 ते 12 गुंडांनी जैसलमेरच्या मोहनगढ भागातील तिच्या घरातून त्या मुलीचे अपहरण केले. त्यानंतर गुंडांनी तिला गावाबाहेर नेले आणि तेथे तिच्यासोबत जबरदस्तीने आगीभोवती सात फेरे मारले.
पोलिसांनी केली तडक कारवाई : वृत्तानुसार, गुंडाने पीडितेच्या कुटुंबाला तिचे लग्न दुसऱ्याशी न करण्याची धमकीही दिली होती. घटनेनंतर महिलेच्या कुटुंबीयांनी तातडीने स्थानिक पोलिसांना याची माहिती दिली. त्यांनी मुलीसह आरोपींना पकडले आणि मोहनगड येथे आणले. पीडितेचे जबाब नोंदवून तिला तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सोमवारी कुटुंबीयांनी जैसलमेरच्या जिल्हाधिकारी टीना दाबी यांना निवेदनही सादर केले ज्यांनी हे प्रकरण पोलिसांकडे सोपावले आहे.
हे ही वाचा :