बाराबंकी : यूपीच्या बाराबंकी जिल्ह्यातून सामूहिक बलात्काराची खळबळजनक ( gang rape cases in barabanki ) घटना समोर आली आहे. येथील एका महिलेला तिच्या गावातील एका व्यक्तीने आमिष दाखवून मोबाईल फोन घेऊन दिला त्यानंतर तिच्याशी बोलणे सुरू केले. एके दिवशी तीला गावाबाहेर नेण्यात आले. जिथे त्याने त्याच्या इतर चार साथीदारांसह महिलेला जबरदस्ती दारू पाजून, तिच्यावर बलात्कार ( 5 people gang-raped the woman ) केला. महिला बेशुद्ध पडल्यावर आरोपी तिला सोडून पळून गेले. बदनामीमुळे तीने कुठेही वाच्यता केली नाही. मात्र, नंतर तिने सर्व प्रकार आपल्या पतीला सांगून पोलिसांत तक्रार दाखल केली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून मुख्य आरोपीला अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
पाच जणांनी केला बलात्कार - बडोसराय पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील विवाहित महिलेने ५ जणांविरुद्ध सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल ( Gang Raped In Barabanki ) केला आहे. तहरीरच्या म्हणण्यानुसार, 17 सप्टेंबर रोजी गावातील एक तरुण महिलेच्या घरी आला होता. तिच्या पतीने तिला बोलावले आहे म्हणून तीला बाहेर घेऊन गेला. आरोपीने महिलेला एका निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर चार जणांनी बलत्कार केला. आरोपीने महिलेला आगोदर जबरदस्तीने दारू पाजली त्यानंतर पाच जणांनी तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडिता बेशुद्ध झाल्यावर पाच जण तिला सोडून पळून गेले. मात्र, गावातील बदनामीमुळे पीडितेने कुठेही वाच्यता केली नाही. पीडितेचा पती कामानिमित्त बाहेरगावी राहतो. पीडितेने हा संपूर्ण प्रकार तिच्या पतीला सांगितला, त्यानंतर तिने पतीसह पोलिस स्टेशन गाठले. या प्रकरणी २२ सप्टेंबर रोजी तक्रार देऊन पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
एकाला अटक - अतिरिक्त एसपी पुनेंदू सिंह यांनी सांगितले की, बडोसराय पोलीस ठाण्यांतर्गत एका महिलेने तक्रार दिली की, गावातील एका व्यक्तीने तिला फूस लावून मोबाईल फोन घेऊन दिला होता. त्यानंतर महिलेला त्यांने विश्वासात घेऊन तिच्याशी संवाद साधू लागला. पडितेला पुर्ण खात्री झाल्यानंतर आरोपीने तीला फुस लावून एकांतात बोलावून घेतले. निर्जन ठिकाणी आगोदरच आरोपीचे चार साथिदार उपस्थित होते. त्यांनी पिडितेला आगोदर दारू पाजून आळीपाळीने बलत्कार केला. पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 161,164 दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून बाकि अरोपींचा शोध सुरू असल्याची माहीती पोलिसांनी दिली आहे.