सिधी(मध्य प्रदेश) - मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यातील उमरीहा या गावात एका महिलेने तिच्या घरात शिरलेल्या व्यक्तीचे गुप्तांग (खासगी भाग) कापून टाकला आहे. पीडित महिला घरात एकटी असताना तो व्यक्ती तिच्या घरात आला आणि तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. ही घटना गुरुवारी रात्रीची आहे.
हेही वाचा - 'खेळ संपला, आता फक्त विकास होणार'; दीदींच्या 'खेला होबे' घोषणेला मोदींचे प्रत्युत्तर
काय आहे प्रकरण -
सिधी जिल्ह्यातील खड्डी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक धर्मेंद्रसिंग राजपूत यांनी शनिवारी सांगितले की, गुरुवारी रात्री 11 वाजता रमेश साकेत (वय 45) याने पीडित महिलेच्या घरात घुसून तिच्यावर जबरदस्ती करण्यास सुरुवात केली, जेव्हा महिलेने विरोध केला तेव्हा तिच्यावर त्या व्यक्तीने हल्ला केला. तरीदेखील त्या व्यक्तीने पीडित महिलेला सोडले नाही. त्यावेळी महिलेच्या जवळ असलेल्या विळ्याने रमेशचे गुप्तांग कापण्यात आले. त्यानंतर महिलेने पोलीस स्टेशन गाठत घडलेल्या प्रकाराची माहिती दिली.
आरोपी रुग्णालयात दाखल -
दरम्यान, आरोपीला सुरुवातीला सेमरिया रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यानंतर जिल्हा रुग्णालयात त्याला हलवण्यात आले होते. प्रकृतीत सुधारणा न झाल्याने आरोपी रमेशला संजय गांधी मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात असल्याची माहिती पोलीस अधिकारी राजपूत यांनी दिली आहे.
हेही वाचा - मुंबईच्या तरुणीवर जयपूरमध्ये बलात्कार
महिलेच्या तक्रारीवरून आरोपीवर गुन्हा दखल करण्यात आला असून, आरोपीच्या तक्रारीवरून महिलेवरदेखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा सविस्तर तपास पोलीस करत आहेत.