ETV Bharat / bharat

abhinandan varthaman : विंग कमांडर अभिनंदन 'वीर चक्र'ने सन्मानित - Vir Chakra

पाकिस्तानचे एफ-१६ हे लढाऊ विमान उद्ध्वस्त करण्याचे शौर्य गाजवणारे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान (wing commander abhinandan varthaman) यांचा आज 'वीर चक्र'ने (Vir Chakra) सन्मान करण्यात आले. युद्धादरम्यान केलेल्या विशेष कामगिरीसाठी दिला जाणारा हा तिसरा सर्वोच्च सन्मान आहे.

wing commander abhinandan varthaman
विंग कमांडर अभिनंदन
author img

By

Published : Nov 22, 2021, 12:25 PM IST

Updated : Nov 22, 2021, 1:36 PM IST

नवी दिल्ली - राष्ट्रपती भवनात आयोजित दिमाखदार सोहळ्यात सैन्यातील विशेष कामगिरीबद्दल आज सैन्य अधिकाऱ्यांचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. याच सोहळ्यात पाकिस्तानचे एफ-१६ हे लढाऊ विमान उद्ध्वस्त करण्याचे शौर्य गाजवणारे विंग कमांडर अभिनंदन (wing commander abhinandan varthaman) यांचा आज 'वीर चक्र'ने (Vir Chakra) सन्मान करण्यात आला. युद्धादरम्यान केलेल्या विशेष कामगिरीसाठी दिला जाणारा हा तिसरा सर्वोच्च सन्मान आहे.

विंग कमांडर अभिनंदन यांना 'वीर चक्र'ने सन्मानित करताना

पाकिस्तानी लढाऊ विमान केले होते उद्ध्वस्त -

पाकिस्तानी F-16 हे लढाऊ विमान उद्ध्वस्त करणारे विंग कमांडर अभिनंदन यांना आज वीर चक्र या सन्मानाने सन्मानित करण्यात आले. 27 फेब्रुवारी 2019 मध्ये जम्मू-कश्मीरमधील राजौरी-मेंढर सेक्टरमधील लाइन ऑफ कंट्रोल (LOC) वर पाकिस्तानी लढाऊ विमान उद्ध्वस्त केले होते.

अभिनंदन सापडले होते पाकिस्तानच्या तावडीत -

त्यानंतर अभिनंदन यांच्या विमानाचा अपघात झाला आणि ते पाकिस्तानच्या तावडीत सापडले. तेथून त्यांना पाक सैनिकांनी पकडले. पाक सैनिकांकडून अभिनंदनचे मानसिकरीत्या खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झाला. पण त्यांला यश मिळू शकले नाही. अखेरीस 1 मार्च 2019 रोजी पाकिस्तानला अभिनंदनला अटारी-वाघा सीमेवरून भारतात पाठवावे लागले होते.

वीर चक्र हा सन्मान केव्हा देतात ?

युद्धादरम्यान केलेल्या विशेष कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो. वीर चक्र हा तिसरा सर्वोच्च सन्मान आहे.

हेही वाचा - IFFI 52 : महोत्सवात प्रादेशिक चित्रपटांना अधिक महत्व देणे गरजेचे - अनुराग ठाकूर

Last Updated : Nov 22, 2021, 1:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.