ETV Bharat / bharat

शेतकरी आंदोलनाचे सहा महिने; आज शेतकऱ्यांचा 'ब्लॅक डे'

गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. 26 मे रोजी म्हणजे आज या आंदोलनाला सहा महिने पूर्ण झाले आहेत. यानिमित्ताने संयुक्त किसान मोर्चाकडून आजचा दिवस 'ब्लॅक डे' म्हणून पाळण्यात येत आहे. शेतकऱ्यांशी चर्चेला सुरुवात करा अन्यथा आंदोलन तीव्र केलं जाईल, असा इशारा शेतकऱ्यांनी आज केंद्राला दिला आहे.

protests
शेतकरी आंदोलन
author img

By

Published : May 26, 2021, 5:28 PM IST

नवी दिल्ली - नवीन कृषी कायद्यांविरोधात गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. 26 मे रोजी म्हणजे आज या आंदोलनाला सहा महिने पूर्ण झाले आहेत. यानिमित्ताने संयुक्त किसान मोर्चाकडून आजचा दिवस 'ब्लॅक डे' म्हणून पाळण्यात येत आहे. आज भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी निषेध म्हणून काळा फेटा बांधला. त्यांच्यासह इतर शेतकऱ्यांनीही काळा फेटा बांधून निषेध व्यक्त केला.

ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीची शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्याशी चर्चा

शेतकरी आंदोलनाने देशभरातील शेतकरी संघटित झाले आहेत. जोपर्यंत केंद्र सरकार आमचे म्हणणे ऐकून घेत नाही. तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे. शेतकरी आंदोलनाला एक विलक्षण यश मिळाले आहे. कारण सर्व शेतकरी सरकारविरोधात एकत्र आले आहेत. केंद्राला कायदे रद्द करावेच लागतील. निषेध शांततेत करण्यात येत आहे. आम्ही कोरोना प्रोटोकॉलचे अनुसरण करत आहोत, असे टिकैत म्हणाले.

आम्ही तिरंगी रंगाचे झेंडे लावून निषेध करण्याची योजना आखली होती. , अधिकाऱ्यांचा आक्षेप होता. म्हणूनच आम्ही काळे झेंडे फडकवून हा निषेध नोंदवण्याचा निर्णय घेतला, असे टिकैत यांनी सांगितले.

आंदोलन सुरुच राहणार -

कृषी कायदे रद्द करावे आणि शेतकर्‍यांना आवश्यक असणारा एमएसपी मिळावा. जर केंद्राने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत. तर आम्ही निषेध नोंदवत राहू. आंदोलन किती काळ चालेल याचा निश्चित कालावधी नाही, असे टिकैत यांनी सांगितले.

काळे झेंडे फडकावून सरकारचा निषेध -

20 मे रोजी संयुक्त किसान मोर्चाने (एसकेएम) 26 मे ला 'ब्लॅक डे' म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार देशभरातील शेतकऱ्यांनी याला पाठिंबा दर्शवला. शेतकऱ्यांनी त्यांच्या घरी, त्यांच्या ट्रॅक्टरवर किंवा इतर वाहनांवर काळे झेंडे फडकावून सरकारचा निषेध नोंदवला. तसेच आंदोलनस्थळी सरकारचे प्रतिनिधित्व करणारे पुतळेही शेतकाऱ्यांनी जाळले. यावेळी शेतकरी व पोलीस यांच्यात संघर्ष झाला.

काय आहेत कृषी कायदे?

17 सप्टेंबर 2020 ला कृषी विधयेक पास झाली होती. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या स्वाक्षरीनंतर त्यांचे कायद्यात रुपांतर झाले. केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांपैकी पहिल्या कायद्यांनुसार शेतकऱ्याला देशात कोणत्याही ठिकाणी त्याचा कृषीमाल विकण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे. तर दुसऱ्या कायद्यानुसार शेतकऱ्याने व्यापाऱ्यासोबत केलेल्या कराराला कायदेशीर मान्यता मिळेल. तसेच तिसऱ्या कायद्यामुळे डाळी, तेल बियाणे यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्यावरील निर्बंध दूर झाले आहेत.

हेही वाचा - "...अरेस्ट तो उनका बाप भी नही कर सकता', बाबा रामदेव यांचा व्हिडिओ व्हायरल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.