ETV Bharat / bharat

येत्या दोन वर्षांचा आपला कार्यकाळ पूर्ण करणार - बी.एस.​येडियुरप्पा

उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्र्याच्या उचलबांगडीनंतर आता कर्नाटकातही मुख्यमंत्री बदलण्यात येणार अशी चर्चा सुरू होती. मात्र, यावर पडदा पडला आहे. आगामी दोन वर्षांचा आपला कार्यकाळ पूर्ण करणार असल्याचे कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.​येडियुरप्पा यांनी सांगितले.

येडियुरप्पा
येडियुरप्पा
author img

By

Published : Jun 11, 2021, 5:34 PM IST

बंगळुरू - मुख्यमंत्री बी.एस.​येडियुरप्पा कर्नाटकात मागील काही दिवसांपासून नेतृत्व बदलाची चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांना बदलले जाईल, अशाच चर्चांना उधाण होते. मात्र, यावर पडदा पडला आहे. आगामी दोन वर्षांचा आपला कार्यकाळ पूर्ण करणार असल्याचे कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.​येडियुरप्पा यांनी सांगितले. जिल्ह्यातील अधिकारी व लोकप्रतिनिधींशी झालेल्या आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. उर्वरित दोन वर्षांत आपण राज्याच्या विकासासाठी काम करू असे ते म्हणाले.

भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस व कर्नाटक प्रदेश भाजपाचे प्रभारी अरुण सिंह यांनी मुख्यमंत्री बदलाची चर्चा फेटाळून लावली होती. नेतृत्व बदलाचा प्रश्नच नाही. येडियुरप्पा पुढील दोन वर्षे मुख्यमंत्री राहतील आणि कार्यकाळ पूर्ण करतील, असे अरुण सिंह म्हणाले होते.

कर्नाटकात 2018 मध्ये विधानसभा निवडणुका घेण्यात आल्या होत्या. त्यावेळी काँग्रेस पक्षाने जेडीएसबरोबर सरकार स्थापन केले होते. मात्र, अनेक आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर सरकार कोसळले आणि कुमारस्वामी यांना राजीनामा द्यावा लागला. यानंतर भाजपाने सरकार स्थापन केले आणि बी.एस येडियुरप्पा मुख्यमंत्री झाले होते.

येडियुरप्पा यांच्या उचलबांगडीची चर्चा

येडियुरप्पासंदर्भात राज्यातील भाजपामध्ये नाराजीचे वातावरण होते. थेट मुख्यमंत्री बदलण्याची मागणी एका गटाने केली होती. आगामी विधानसभा निवडणूक बी.एस येडियुरप्पा यांच्या नेतृत्वात लढता येणार नाही. म्हणून मुख्यमंत्री 100 टक्के बदलला पाहिजे, अशी मागणी भाजपा आमदाराच्या एका गटाने केली होती. तेव्हापासून येडियुरप्पा यांची उचलबांगडी करण्यात येणार अशी चर्चा सुरू होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.