रुद्रपूर: येथे एका व्यक्तीवर स्वत:च्या पत्नीचाच गळा दाबून खून केल्याचा आरोप आहे. या व्यक्तीने त्यावेळी आईचाही गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे. या घटनेच्या दरम्यान गोंधळाचा आवाज आल्यामुळे शेजारी धावत तेथे पोचले. शेजाऱ्यांनी राकेश नावाच्या सैतानी कृत्य करणाऱ्या व्यक्तीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. राकेशचे त्याच्या मेहुणीसोबत अनैतिक संबंध ( with sister in laws illegal relationship) होते आणि या संबंधात अडसर ठरत असल्यामुळे त्याने बायकोचा खून (Wife strangled to death for interfering) करत आईलाही संपवण्याचा प्रयत्न ( mother also attacked ) केल्याचे सांगण्यात येत आहे.
घरातील कलहातून पत्नीचा गळा दाबून खून केल्याचा आरोप राकेश नावाच्या व्यक्तीवर आहे. यादरम्यान त्याने आईलाही मारण्याचा प्रयत्न केला. जखमी आईवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपींना आसपासच्या लोकांनी घरात मोठा वाद आणि गोंधळा सोबत भयानक प्रकार सुरु आहे हे पाहुन त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले त्यामुळे अनर्थ टळला नाही तर त्याने आईचाही खून केला असता असेही सांगितल्या जात आहे. पोलिसांनी त्याच्या पत्नीचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.
रुद्रपूर ट्रान्झिट कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीतील राजा कॉलनीत राहणाऱ्या राकेश याने पत्नी मीरा देवीची गळा आवळून हत्या केली. आरोपीचे काही महिन्यांपूर्वी लग्न झाल्याचे सांगण्यात येत आहे. मृताच्या माहेरच्या लोकांनी आरोपीवर मेहुणीशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला आहे. आरोपी पत्नीची हत्या करत होता, त्याच दरम्यान त्याने आई सुदामाचाही गळा दाबण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आवाज ऐकून आजूबाजूचे लोक जमा झाले असता आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला.
आजुबाजूच्या लोकांनी आरोपीला पकडून पोलिसांना माहिती दिली. माहिती होताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर नायब तहसीलदारांसमोर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. सध्या जखमी मातेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एसपी सिटी मनोज कात्याल यांनी सांगितले की, सकाळी मिळालेल्या माहितीच्या आधारे राजा कॉलनीत राहणाऱ्या राकेशला पत्नीचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. मात्र, अद्यापपर्यंत कुटुंबीयांकडून पोलिसांकडे तक्रार करण्यात आलेली नाही. पोलिसांकडून अद्याप पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.