ETV Bharat / bharat

Demat Account : शेअर मार्केटसाठी डिमॅट अकाउंट वापरताय, मग तात्काळ 'हे' करा.. अन्यथा तुमचे डिमॅट अकाउंट होईल बंद - सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड

एक डिमॅट अकाउंट हे तुमच्या शेअर सर्टिफिकेट आणि इलेक्ट्रॉनिक फॉरमॅटमध्ये असलेल्या इतर प्रतिभूती ( Securities ) साठी एका बँक खात्याप्रमाणे आहे. त्यामाध्यमातून तुम्ही शेअर मार्केटमध्ये देवाण-घेवाण करता. मात्र लक्षात असू द्या की सर्व बँक अकाउंटप्रमाणे तुम्हाला तुमच्या डिमॅट अकाउंटमध्येही नॉमिनीचा उल्लेख करणे आवश्यक ( You Should Include Nominee In Demat Account ) आहे. ३१ मार्च पर्यंत जर असे केले नाही तर तुमचे डिमॅट खाते बंद पडू शकते.

डिमॅट नॉमिनी
डिमॅट नॉमिनी
author img

By

Published : Jan 28, 2022, 5:22 PM IST

Updated : Jan 28, 2022, 5:30 PM IST

हैदराबाद : शेअर बाजार दररोज नव्या उंचीवर जात आहे. त्यामुळे दररोज नवनवीन लोक गुंतवणूक करण्यासाठी येत आहेत. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी डिमॅट अकाउंट आवश्यक आहे. पूर्वी डिमॅट आणि ट्रेडिंग अकाऊंड उघडणे अवघड काम होते. मात्र आता तंत्रज्ञानामुळे चुटकीशीर अकाउंट उघडले जात आहेत. यामध्ये नॉमिनी ऍड करणे आता पूर्वीपेक्षाही सोपे झाले आहे. चला तर मग जाणून घेऊयात डिमॅट अकाउंटमध्ये नॉमिनी ऍड करणे अनिवार्य का आहे ( Why You Should Include Nominee In Demat Account ) ?

एक डिमॅट अकाउंट हे तुमच्या शेअर सर्टिफिकेट आणि इलेक्ट्रॉनिक फॉरमॅटमध्ये असलेल्या इतर प्रतिभूती ( Securities ) साठी एका बँक खात्याप्रमाणे आहे. कागदी कामकाज बंद करण्यासाठी १९९६ मध्ये त्याला NSE ट्रेडिंगमध्ये सादर करण्यात आले होते. आज डिमॅट अकाउंटसाठी कुठल्याही प्रकारची कागदी कार्यवाही करावी लागत नाही. त्यामुळे कागदी सर्टिफिकेटही आता देण्यात येत नाहीत.

  • डिमॅट नॉमिनी ( Demat Nominee ) : ज्यावेळेस तुम्ही बँक अकाउंट उघडता अथवा फिक्स्ड डिपॉझिट करता त्यावेळी तुम्हाला त्यात नॉमिनी कॉलममध्ये माहिती भरावी लागते. त्याचप्रमाणे म्युच्युअल फंडात गुंतवणूक आणि विमा पॉलिसी खरेदी करतानाही नॉमिनी टाकणे गरजेचे आहे. पुढील क्षणात काय होऊ शकते याची भविष्यवाणी कुणीही करू शकत नाही. त्यामुळे नॉमिनीचे नाव यात टाकणे गरजेचे आहे. यामुळेच बँका, गुंतवणूक संस्था आणि वित्तीय संस्थांमध्ये नॉमिनीचे नाव टाकणे अनिवार्य करण्यात आलेले आहे.

जर तुम्ही डिमॅट अकाउंट उघडताना तुमचे आई-वडील, मुलं किंवा भाऊ-बहिणींचे नाव नॉमिनी म्हणून टाकले नाहीत तर महत्वाच्या वेळेत त्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. ते तुमच्यानंतर पैशांवर दावा करू शकतात. पण जर नॉमिनी म्हणून त्यांचे नाव नसतील तर ती रक्कम त्यांना लवकर मिळू शकत नाही. त्यामुळेच प्रथमतः नॉमिनीचे नाव टाकण्याची आवश्यकता आहे.जर तुम्ही नॉमिनी म्हणून अनेकांचे नाव टाकले तर कुणाला किती रक्कम द्यावी हे पण त्यात स्पष्ट करणे आवश्यक आहे.

  • डिमॅट अकाउंटला नॉमिनी देणे हा अधिकारच ( Demat account nominee rights ) : जर तुमच्या खात्यामध्ये किंवा गुंतवणुकीत कुणी नॉमिनी नसेल तर तुमच्या वारसांना अनपेक्षित घटनेनंतर रकमेवर दावा करताना अवघड जाऊ शकते. त्यावेळी त्यांना नॉमिनी म्हणून सिद्ध करताना वारस अथवा वारस प्रमाणपत्रासारख्या कागदपत्रांची आवश्यकता भासते. त्यामुळे डिमॅट अकाउंट उघडताना नॉमिनीचे नाव टाकल्यास पुढील अडचणींपासून वाचता येऊ शकते. नियमानुसार तुम्ही एकापेक्षा जास्त नॉमिनी ऍड करू शकता.
  • सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड ( CDSL ) नॉमिनेशन ऑनलाईन : डिमॅट अकाउंट हे डिजिटल पद्धतीने उघडणे शक्य आहे. यामध्ये नॉमिनीसाठी एक स्वतंत्र अर्ज द्यावा लागतो. नुकतेच सेबीने या नियमांमध्ये बदल केला आहे. ज्यानुसार ई-सहीच्या माध्यमातून यामध्ये नॉमिनी जोडता येऊ शकतो. १ ऑक्टोबर २०२१ पासून डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी नॉमिनीचे नाव टाकणे अनिवार्य करण्यात आले आहे.

ज्या लोकांनी डिमॅट अकाउंट उघडले आहे ते त्यांच्या नॉमिनीचे नाव बदलू शकतात किनवट त्यांची संख्याही वाढवू शकतात. पण ज्यांनी जॉईंट अकाउंट उघडले आहे त्यांना नॉमिनीमध्ये बदल करण्यासाठी दोघांच्याही सहीची गरज लागते. डीपी ( Depository Participant ) जवळ नॉमिनीच्या नावाचा अर्ज भरून जमा करावा लागेल. त्यासाठी साक्षीदाराच्या सहीचीही आवश्यकता आहे.

सीडीएसएलचे प्रमुख रामकुमार यांच्या म्हणण्यानुसार डिमॅट ग्राहकांना ३१ मार्च २०२२ पर्यंत त्यांचे नॉमिनेशन जमा करणे आवश्यक आहे. अन्यथा तुमचे अकाउंट बंद केले जाऊ शकते. त्यामुळे जर तुमच्या अकाउंटला नॉमिनी नसेल तर त्याचा तात्काळ उल्लेख करा. लक्षात ठेवा नॉमिनीचे नाव कुठल्याही क्षणी बदलता येऊ शकते.

Last Updated : Jan 28, 2022, 5:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.