ETV Bharat / bharat

कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंट प्रसारवरून राहुल गांधींचे केंद्राला तीन प्रश्न

डेल्टा प्लस विषाणूच्या प्रसारावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केंद्राला प्रश्न विचारले आहेत. कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा प्रसार रोखण्यासाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणात चाचण्या का केल्या जात नाहीत, असा सवाल राहुल गांधी यांनी शुक्रवारी केंद्राला केला.

राहुल गांधी
राहुल गांधी
author img

By

Published : Jun 25, 2021, 2:19 PM IST

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर आहे. संसर्गाची दुसरी लाट नियंत्रणात येत असतानाच कोरोनाच्या डेल्टा प्लस या व्हेरिएंटचे रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. डेल्टा प्लस विषाणूच्या प्रसारावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केंद्राला प्रश्न विचारले आहेत. कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा प्रसार रोखण्यासाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणात चाचण्या का केल्या जात नाहीत, असा सवाल राहुल गांधी यांनी शुक्रवारी केंद्राला केला.

डेल्टा प्लस या व्हेरिएंटचा प्रसार रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर चाचण्या का घेतल्या जात नाहीत. डेल्टा प्लस व्हेरिएंटविरूद्ध लस किती प्रभावी आहेत आणि यासंदर्भातील संपूर्ण माहिती कधी उपलब्ध होईल? विषाणूच्या तिसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारची काय योजना आहे, असे प्रश्न राहुल गांधींनी केंद्राला केले आहेत.

यापूर्वी काँग्रेसकडून काँग्रेसकडून कोरोनावर श्वेतपत्रिका जारी करण्यात आली होती. तिसऱ्या लाट देशात पसरण्यापूर्वी तयारी करण्याचे आवाहन सरकारला केले होते. कोरोनाच्या श्वेतपत्रिकेमागे सरकारवर बोट दाखविण्याचा उद्देश नाही. तर सरकारला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संसर्ग थोपविण्याकरिता देशाला मदत करण्याचा उद्देश आहे. संपूर्ण देशाला माहित आहे, कोरोनाची तिसरी लाट धडकणार आहे. त्यापूर्वी तयारी केली तर असंख्य लोकांचे प्राण वाचू शकतील, असे राहुल गांधी म्हणाले होते.

आयसीएमआर, एनआयव्हीकडून अभ्यास सुरू -

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना आता महाराष्ट्र, केरळ आणि मध्यप्रदेश राज्यात कोरोनाचा नवा व्हेरिएंट डेल्टा प्लसचे काही रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर संशोधनही करण्यात येत आहे. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात आयसीएमआर आणि पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्था अर्थात एनआयव्हीने आता या डेल्टा व्हेरिएंटवर सध्या भारतात देण्यात येत असलेल्या लस किती प्रभावी आहेत, याचा अभ्यास करण्यास सुरुवात केली आहे.

काय आहे 'डेल्टा' आणि 'डेल्टा प्लस' व्हेरिएंट?

देशात अनेक ठिकाणी सध्या 'डेल्टा प्लस' विषाणूचे बदललेले रूप समोर आले आहे. या डेल्टा प्लस विषाणूमुळे तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोणताही विषाणू आपले रूप बदलत असतो. त्या बदलत्या रुपाला संशोधक नाव देतात. कोरोना विषाणूच्या बदलत्या रुपाला डेल्टा आणि डेल्टा प्लस असे नाव देण्यात आले आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये प्रथम नोंदवलेला डेल्टा प्रकार हा पूर्वीपेक्षा अपेक्षेपेक्षा अधिक वेगवान होता आणि एम्समध्ये नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार, 2021 मध्ये हाच व्हेरियंट देशातील दुसर्‍या लाटेचे कारण ठरला होता. आता तिसरी लाट 'डेल्टा प्लस' व्हेरिएंटमुळे पसरणार असल्याचे बोलले जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.