ETV Bharat / bharat

National Cancer Awareness Day 2022 : 'राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस' का आणि केव्हा साजरा केला जातो, काय आहेत लक्षणे - का आणि केव्हा साजरा केला जातो

भारतात 7 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस साजरा (National Cancer Awareness Day is celebrated today) केला जातो. नोबेल पारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञ मादाम क्युरी यांच्या वाढदिवसानिमित्त हा दिवस साजरा केला जातो आणि या दिवशी कर्करोगासारख्या धोकादायक आजाराबद्दल जनजागृती केली जाते. वेळीच सावध होऊन योग्य ते उपचार केल्यास हा रोग बरा होऊ शकतो. (What are symptoms and causes)

National Cancer Awareness Day 2022
राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस
author img

By

Published : Nov 7, 2022, 1:04 PM IST

कर्करोग हा एक अतिशय धोकादायक आणि प्राणघातक आजार आहे आणि तो वेगाने पसरत आहे, म्हणून दरवर्षी 7 नोव्हेंबर हा दिवस भारतात 'राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस 2022' म्हणून (National Cancer Awareness Day is celebrated today) साजरा केला जातो. या दिवशी लोकांना कॅन्सरबद्दल जागरूक केले जाते. कर्करोगाच्या उपचाराशी संबंधित गोष्टींचा प्रचार - प्रसार केला जातो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या म्हणण्यानुसार, या वर्षी सुमारे 10 दशलक्ष लोकांचा मृत्यू केवळ कर्करोगामुळे झाला आहे आणि म्हणूनच कर्करोग हे मृत्यूचे प्रथम क्रमांकाचे कारण बनत आहे. स्तनाचा कर्करोग, प्रोस्टेट कर्करोग हे सर्वात सामान्य कर्करोगांपैकी एक आहेत. (What are symptoms and causes)

या दिनाचे काय आहे महत्व : 2014 मध्ये, आरोग्य आणि कल्याण मंत्रालयाचे मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सप्टेंबरमध्ये राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. या जीवघेण्या आजाराला वेळीच ओळखण्याची गरज ओळखून त्यांनी या दिवसाची सुरुवात केली. या दिवशी सरकारी रुग्णालये आणि महापालिकेच्या दवाखान्यात नागरीकांची मोफत कॅन्सर तपासणी केली जाते. नोबेल पारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञ मादाम क्युरी यांच्या वाढदिवसानिमित्त हा दिवस साजरा केला जातो, जेणेकरून त्यांनी कर्करोगाविरुद्धच्या लढण्याच्या विषयामध्ये केलेल्या संशोधनाबाबत आणि त्यांच्या योगदानाबाबत, आपण त्यांचे या दिवशी स्मरण करु.

नियमित तपासणी आवश्यक : कर्करोगावर अनेक भिन्न उपचार आहेत आणि कर्करोग व्यक्तीच्या शरीरात किती पसरला आहे आणि तो कोणत्या टप्प्यात आहे यावर सगळे उपचार अवलंबून असतात. कर्करोगाच्या उपचारात केमोथेरपी, हार्मोन थेरपी, इम्युनोथेरपी, रेडिएशन थेरपी इत्यादी उपचार पर्याय आहेत. कर्करोगाच्या उपचाराची पद्धत देखील रुग्णाच्या आरोग्यावर आणि त्याच्या कौटुंबिक इतिहासावर अवलंबून असते. जर कर्करोग सुरुवातीच्या टप्प्यात माहीती झाला, तर तो अगदी सहज बरा होऊ शकतो. नियमित आरोग्य तपासणी केल्यास, या आजाराला बळी पडण्यापासुन आपण स्वत:चा जीव वाचवु शकतो.

कर्करोगाची लक्षणे: कर्कराेगाच्या निदानावर अनेक संशोधन झालेले आहे. पण हा रोग अद्यापही आटोक्यात आलेला दिसत नाही. हा रोग झाल्या नंतर अशक्तपणा , खोकला दरम्यान रक्तस्त्राव, शरीराच्या कोणत्याही भागातून अचानक रक्तस्त्राव, स्तनात गाठ, रजोनिवृत्तीनंतर रक्तस्त्राव, भूक न लागणे, त्वचेत बदल झाल्याची भावना अशी लक्षने पहायला मिळतात.

पुरुष, स्त्रियांमधील लक्षणे : सततचा खोकल ही अशी स्थिती आहे जी फुफ्फुसाची जळजळ (न्यूमोनिया) आणि मानेच्या कर्करोगात पहायला मिळते. लाळेतील रक्त सहसा ब्रॉन्कायटिस किंवा सायनुसायटिसचे लक्षण, हे लक्षण फुफ्फुसाचा कर्करोग देखील सूचित करू शकते. तुमच्या लघवीच्या मार्गात बदल, वारंवार तुमच्या नियंत्रणाशिवाय लघवीची तीव्र इच्छा होणे किंवा लघवी थांबने, याची गंभीर कारणे असू शकतात, डाग, तीळ आणि त्वचेत बदल पुरुष आणि स्त्रिया दोघांनीही त्वचेवर अचानक दिसणारे तीळ किंवा डागांकडे लक्ष दिले पाहिजे.

त्वचेचा रंग, पोत बदलतो : कर्करोग झाल्यावर त्वचेचा रंग, पोत इत्यादी बदलणे हे त्वचेच्या कर्करोगाचे पहिले लक्षण आहे. थकवा आणि असह्य वेदना हे सखोल समस्यांचे सूचक आहेत. पोट आणि आतड्यांसंबंधी समस्या गिळण्यात अडचण या स्वरूपात प्रकट होतात. तोंडात पॅच किंवा चिडचिड देखील तपासण्यासारखे आहे. आहार किंवा जीवनशैलीत कोणताही बदल न करता अचानक वजन कमी होणे ही एक चिंताजनक घटना असू शकते. बर्याचदा, हे सूचित करते की, थायरॉईड प्रणालीमध्ये बदल झाले आहेत. परंतु पोट, कोलन किंवा स्वादुपिंडातील अप्रत्यक्ष वाढीसाठी देखील चाचणी करणे आवश्यक असू शकते.

हा कर्करोग सतत वाढत आहे : रक्त कर्करोग, तोंडाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग, गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग, कोलन कर्करोग, घश्याचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग, मेंदूचा कर्करोग. हा सध्या सतत वाढताना दिसत आहे. तंबाखू किंवा गुटख्याचा वापर, सिगारेट आणि पेय, किरणोत्सर्गाचा दीर्घकाळ संपर्क, अनुवांशिक दोष, शारीरिक निष्क्रियता, कुपोषण, लठ्ठपणा. यामुळे हे कर्करोग वाढत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.