ETV Bharat / bharat

केवळ भारतातच का पसरतोय 'ब्लॅक फंगस'?

देशात कोरोनापाठोपाठ ब्लॅक फंगस मोठ्या प्रमाणात पसरत आहे. आतापर्यंत एकूण ११ हजारांहून अधिक लोकांना याची लागण झाल्याचे समोर आले आहे. मात्र, ज्याप्रमाणे भारतात हा आजार दिसून येत आहे, त्याप्रमाणे जगातील इतर कोणत्याही देशात ब्लॅक फंगसचा प्रसार झालेला पहायला मिळत नाहीये. यामागे काय कारण असू शकते, याचा आढावा घेण्याचा ईटीव्ही भारतने प्रयत्न केला आहे...

why-black-fungus-is-spreading-in-india-only-know-experts-view
केवळ भारतातच का पसरतोय 'ब्लॅक फंगस'?
author img

By

Published : May 28, 2021, 7:23 PM IST

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसोबतच म्युकरमायकोसिस म्हणजेच ब्लॅक फंगसचाही मोठ्या प्रमाणात प्रसार होताना दिसून येत आहे. रोगप्रतिकार शक्ती कमी होणे, आणि स्टेरॉईडचा वापर हे या आजाराची लागण होण्याचे कारण मानले जात आहे. डॉक्टर याबाबत विविध प्रकारच्या थिअरी मांडत आहेत. मात्र, ज्याप्रमाणे भारतात हा आजार दिसून येत आहे, त्याप्रमाणे जगातील इतर कोणत्याही देशात ब्लॅक फंगसचा प्रसार झालेला पहायला मिळत नाहीये. यामागे काय कारण असू शकते, याचा आढावा घेण्याचा ईटीव्ही भारतने प्रयत्न केला आहे.

देशात ब्लॅक फंगसचे जेवढे रुग्ण आढळून आले आहेत, त्यांच्यापैकी बहुतांश रुग्णांना कोरोना होऊन गेला होता, किंवा मधुमेहाची लागण झाली होती. तज्ज्ञांच्या मते, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वतः औषधे घेणेही ब्लॅक फंगस होण्याचे कारण ठरू शकते. तसेच, अस्वच्छ मास्कचा वारंवार केलेला वापर, औद्योगिक ऑक्सिजनचा वापर अशा कारणांमुळेही ब्लॅक आणि व्हाईट फंगसची लागण होत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

देशातील मधुमेहाची समस्या गंभीर..

शार्प आय साईट रुग्णालयाचे डीन आणि सहसंस्थापक डॉ. बी कमल कपूर यांनी सांगितले, की देशातील वृद्ध लोकसंख्येपैकी ७३ टक्के लोकांना मधुमेह आहे. तसेच, रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या स्टेरॉईडच्या वापरांनीही रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते, जे मधुमेहाच्या रुग्मांना घातक असते. अशा सर्व आजारांमुळे रुग्णांना बरे होण्यासाठी जास्त वेळ लागतो. त्यामुळे रुग्णांच्या शरिरात कित्येक प्रकारचे इन्फेक्शन होतात. जोधपूर एम्समधील ईएनटी प्रमुख आणि प्राध्यापक डॉ. अमित गोयल यांनी सांगितले, की देशातील कित्येक लोक रक्तातील साखर नियमित तपासत नाहीत. तसेच, एकदा औषधे घेण्यास सुरुवात केली की ती आयुष्यभर घ्यावी लागतील या भीतीने ते औषधेही घेण्याचे टाळतात. यामुळे अशा रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होतो.

वापरलेलाच मास्क पुन्हा वापरत आहेत लोक..

डॉ. अमित म्हणाले, की देशातील लोकांचे अस्वच्छ राहणेही म्युकरमायकोसिसला आमंत्रण देत आहे. लोक एकदा वापरलेले मास्क पुन्हा पुन्हा (न धुता) वापरत आहेत. त्यामुळे ब्लॅक फंगसची लागण होताना दिसून येत आहे.

यासोबतच, देशाची लोकसंख्या हेदेखील कारण असू शकते असे अमित म्हणाले. अमेरिका आणि भारताची तुलना केली तर लक्षात येईल, की दोन्ही देशांमधील लोकसंख्या हा महत्त्वाचा मुद्दा आहे. जर अमेरिकेत म्युकरमायकोसिसचे एक टक्का रुग्ण आढळले आहेत, आणि भारतातही एक टक्का रुग्ण आढळले आहेत; तर भारतातील रुग्णांची संख्या ही जास्तच दिसणार आहे. मात्र, ज्या वेगाने देशात हा आजार पसरत आहे ते नक्कीच चिंताजनक आहे.

ब्लॅक फंगसचे एक वैशिष्ट्य म्हणजे, कोरोनाप्रमाणे ते लपवता येऊ शकत नाही. कोरोनाची लागण झालेला व्यक्ती घरात इतरांपासून लपून राहू शकतो. मात्र, म्युकरमायकोसिस झालेल्या रुग्णाला रुग्णालयात जावेच लागते.

औषधांच्या वापरामध्ये निष्काळजीपणा..

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्लॅक फंगस हा नाकपुड्या, सायनस, रेटिना वाहिका आणि मेंदुवर परिणाम करतो. दिल्लीच्या एलएनजेपी रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागाच्या प्रमुख डॉ. ऋतू सक्सेना यांनी सांगितले, की आपल्याकडे कित्येक लोक अधिक प्रमाणात स्टेरॉईड घेतात. तसेच, कोरोना काळात लोकांची रोगप्रतिकारशक्तीही कमी झाली आहे. यासोबतच औद्योगिक ऑक्सिजन आणि झिंकचा अतिप्रमाणात केलेला वापर या सर्व कारणांमुळे ब्लॅक फंगसची लागण होत आहे. मात्र, ही केवळ थिअरी असून, हे सिद्ध झाले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ब्लॅक फंगस हे घरी स्वतःच औषध घेत असलेल्या, तसेच खासगी रुग्णालयांमधील रुग्णांना जास्त प्रमाणात दिसून आले आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये असे रुग्ण कमी आढळून आले आहेत.

दरम्यान, ब्लॅक फंगसवरील उपचारांसाठी देशात लिपोसोमल अँफोटेरेसिरीन नावाच्या इंजेक्शनचा वापर केला जात आहे. या औषधाच्या उत्पादनास चालना देण्यासाठी सरकारने पाच कंपन्यांना हे औषध बनवण्याची परवानगी दिली आहे. तसेच, इतर देशांमधून याची आयात करण्याचे निर्देशही मोदींनी दिल्याचे म्हटले जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.