ETV Bharat / bharat

Pegasus Snooping : काय आहे पेगासस स्पाइवेअर.. काँग्रेसकडून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी तर भाजपकडून सारवासारव - bjp snooping allegations of congress

संसदेच्या मान्सून अधिवेशनाची सुरूवात आज जोरदार गदारोळात झाली. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच पेगाससच्या माध्यमातून हेरगिरी करण्याचा मुद्दा समोर आल्याने भारताच्या राजकारणात खळबळ माजली आहे. या मुद्यावर विरोधकांनी चर्चा करण्याची मागणी केली आहे.

pegasus spyware
pegasus spyware
author img

By

Published : Jul 19, 2021, 8:35 PM IST

हैदराबाद - संसदेच्या मान्सून अधिवेशनाची सुरूवात आज जोरदार गदारोळात झाली. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच पेगाससच्या माध्यमातून हेरगिरी करण्याचा मुद्दा समोर आल्याने भारताच्या राजकारणात खळबळ माजली आहे. या मुद्यावर विरोधकांनी चर्चा करण्याची मागणी केली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी सरकारवर टीका करताना म्हटले आहे, की आम्हाला माहिती आहे, की भारतातील नेते, अधिकारी व पत्रकारांची हेरगिरी करण्यात येत आहे.

आंतरराष्ट्रीय मीडिया संगठना (international media organization) ने खुलासा केला आहे, की इजराइलचे साफ्टवेअर पेगाससच्या माध्यमातून भारताचे दोन केंद्रीय मंत्री, 40 हून अधिक पत्रकार, विरोधी पक्षातील तीन नेते व एक न्यायाधीशासह 300 लोकांची हेरगिरी केले गेली आहे. पेगासस स्पाइवेयर निर्माण करणारी कंपनी एनएसओ ( NSO) इजराइलची आहे. कंपनीचा दावा आहे की, केवळ सरकारलाच अधिकृत रूपाने या सॉफ्टवेअरची विक्री केली जाते. याचा उद्देश्य दहशतवाद व गुन्हे रोखणे आहे. प्रश्न असा आहे, की काय भारत सरकारने एनएसओ (NSO) कडून हे सॉफ्टवेयर खरीदी केले होते. दरम्यान गार्जियन वृत्तपत्राचे म्हणणे आहे, की एनएसओ (NSO) ने हे सॉफ्टवेअर अनेक देशांना विकले आहे. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून 50 हजाराहून अधिक लोकांची हेरगिरी केली जात आहे.

काँग्रेसकडून अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी -

काँग्रेसने सोमवारी दावा केला की, इस्त्राईली कंपनीचे स्पाइवेयर पेगासस (Israeli Spyware Pegasus) चा वापर करून काँग्रेस नेते राहुल गांधींसह अन्य विरोधी नेत्यांची तसेच माध्यम समुहांची हेरगिरी केली जात आहे. त्यामुळे या प्रकरणात गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा द्यावा नाहीतरी त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे.

काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले आहे, की या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून मोदींचीही चौकशी केली जावी.

काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले की, सरकारकडून राहुल गांधींची जासूसी केली गेली आहे. सरकारने आपल्या मंत्र्यांचीही चौकशी केली आहे. सुरक्षा एजेन्सीच्या प्रमुखांचीही हेरगिरी करण्यात येत आहे. माजी निवडणूक आयुक्त अशोक लवासा तसेच अनेक माध्यम समुहाची जासुसी केली गेली आहे. भाजपा आता 'भारतीय जासूस पार्टी' बनवी आहे.

काँग्रेसचे आरोप लाजीरवाणे, पावसाळी अधिवेशनच्या आधीच का आला रिपोर्ट ?

पेगासस हेरगिरी प्रकरणात रविशंकर प्रसाद यांनी सवाल उपस्थित केला आहे, की संसदेच्या मान्सून अधिवेशनाच्या आधीच हा रिपोर्ट कसा आला. त्यांनी म्हटले की एका न्यायाधीशाशी संबंधित एक कहानी बनवली गेली होती. यावर सुप्रीम कोर्टाने टिप्पणी केली होती. रविशंकर प्रसाद यांनी एमनेस्टीबद्दलही सवाल उपस्थित केले आहे. ते म्हणाले की, एमनेस्टीचा भारत विरोधी एजेंडा सार्वजनिक झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.