ETV Bharat / bharat

LIVE Updates : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांसाठी आज पाचव्या टप्प्यातील मतदान पडले पार

West Bengal Assembly Elections LIVE Updates of 5th Phase
LIVE Updates : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक; आज पाचव्या टप्प्यातील मतदान..
author img

By

Published : Apr 17, 2021, 6:51 AM IST

Updated : Apr 17, 2021, 6:47 PM IST

16:04 April 17

3 वाजेपर्यंत बंगालमध्ये 69.40 टक्के मतदानाची नोंद

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पार्थ प्रतिमा रे यांच्यातील फोन संभाषणाच्या रेकॉर्डिंगबाबत तृणमूल कॉंग्रेसने (टीएमसी) पश्चिम बंगालच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे.

14:53 April 17

दुपारी दीड वाजेपर्यंत बंगालमध्ये 54.67 टक्के मतदान

14:45 April 17

गंगारामपूर भागातील लोकांवर ममता दीदींनी अत्याचार केला - पंतप्रधान

गंगारामपूरला दोन पवित्र नावे आहेत, ती आपल्या संस्कृतीचे वर्णन करतात आणि दीदींनाही राम आणि गंगा नदी या दोघांची नावे आवडतात. मात्र, त्या गंगा नदीजवळील भागात राहणाऱ्या भारतीयांवर अत्याचार करत आहेत. त्यांनी त्यांच्या विश्वास, भोजन, भाषा आणि कपड्यांचा अपमान केला आहे, असे पंतप्रधान गंगारामपुरात सभेत म्हणाले.

13:23 April 17

कुरालगचामध्ये केंद्रीय सुरक्षा पथकाने केला हवेत गोळीबार; गर्दीवर नियंत्रणासाठी उचलले पाऊल

पश्चिम बंगालच्या कुरालगचामध्ये गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरक्षा दलांनी गोळीबार केल्याचे समोर आले आहे. नॉर्थ २४ परगणा जिल्ह्यात ही घटना घडली. यापूर्वी पोलिसांनी बॅटन चार्जचा वापर केला होता. मात्र, त्यानंतरही गर्दी कमी न झाल्याने हवेत गोळीबार करण्याच निर्णय घेण्यात आला.

11:41 April 17

साडेअकरा वाजेपर्यंत ३६.०२ टक्के मतदानाची नोंद..

सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत या टप्प्यात ३६.०२ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

11:38 April 17

बिधाननगरमध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचा आरोप..

बिधाननगरमध्ये मतदान केंद्र क्रमांक २६५ आणि २७२वर दगडफेक झाली. यामध्ये तृणमूलचे दोन कार्यकर्ते जखमी झाले. ही दगडफेक भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप तृणमूलचे उमेदवार सुजीत बोस यांनी केला आहे.

10:25 April 17

कमरहाटीमध्ये भाजपा पोलिंग एजंटचा मृत्यू..

कमरहाटीमध्ये भाजपा पोलिंग एजंटचा अचानक मृत्यू झाला. याप्रकरणी चौकशीचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. अभिजीत सामंत असे या एजंटचे नाव होते.

09:51 April 17

साडेनऊ वाजेपर्यंत १६.१५ टक्के मतदान..

सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत १६.१५ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे.

09:17 April 17

आम्हाला आता बदल हवा - मान घिसिंग

आम्हाला आता बदल हवा - मान घिसिंग

आमच्या प्रदेशातील समस्यांबाबत विचार केला असता, आम्हाला आता बदल हवाय. आम्हाला भाजपा सरकार हवं आहे, असे मत गोरखा नॅशनल लिबरेशन फ्रंटचे अध्यक्ष मान घिसिंग यांनी व्यक्त केले.

08:13 April 17

पंतप्रधान मोदींनी केले बंगालीत ट्विट; मतदान करण्याचे केले आवाहन..

West Bengal Assembly Elections LIVE Updates of 5th Phase
पंतप्रधान मोदींनी केले बंगालीत ट्विट; मतदान करण्याचे केले आवाहन..

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बंगालीमध्ये ट्विट करत नागरिकांना मतदान करण्याची विनंती केली.

07:03 April 17

मतदानाला सुरुवात..

निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी मतदानाला सुरुवात झाली आहे.

06:10 April 17

LIVE Updates : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांसाठी आज पाचव्या टप्प्यातील मतदान पडले पार

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांसाठी आज पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. या टप्प्यामध्ये ४५ मतदारसंघांमध्ये मतदान पार पडणार आहे. एकूण ३१९ उमेदवारांचे भविष्य आज मतपेट्यांमध्ये बंद होईल.

मागील चारही टप्प्यांमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटना पाहता, निवडणूक आयोगाने केंद्रीय सुरक्षा दलाच्या ८५३ तुकड्या मतदान पार पडणाऱ्या ठिकाणी तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत या निवडणूकीमधील हा सर्वाधिक सुरक्षा बंदोबस्त असणार आहे.

Last Updated : Apr 17, 2021, 6:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.