ETV Bharat / bharat

West Bengal Election Results: ममतांनी सत्ता राखली; भाजपा आणि डाव्यांचा उडवला धुव्वा

West Bengal Assembly Election LIVE Updates
LIVE Updates : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक; निकालाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर..
author img

By

Published : May 2, 2021, 6:31 AM IST

Updated : May 3, 2021, 6:26 AM IST

06:22 May 03

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना सत्ता राखण्यात यश मिळालं आहे. २००हून अधिक जागा मिळवण्याचा दावा करणाऱ्या भाजपाला केवळ ७५ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. अजूनही भाजपा दोन ठिकाणी आघाडीवर आहे. दरम्यान, डाव्यांसाठी हा मोठा पराभव आहे. डाव्या पक्षांचा गड समजला जाणाऱ्या पश्चिम बंगालमध्ये डाव्यांना केवळ एका जागेवर समाधान मानावं लागलं आहे.

22:26 May 02

तृणमूल २१३ जागांवर विजयी, भाजप ७५ जागांवर विजयी

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस २१३ जागांवर विजयी तर एका जागेवर आघाडीवर. भाजप ७५ जागांवर विजयी तर २ जागांवर आघाडीवर आहे. डावे एका जागी तर अन्य एका जागेवर विजयी.

19:46 May 02

बंगालच्या विजयाबद्दल मोदींकडून ममता बॅनर्जींचं अभिनंदन

नवी दिल्ली - पश्चिम बंगालमधील विजयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन केलं आहे. पश्चिम बंगालमधील लोकांच्या सर्व आकांक्षा पूर्ण करण्यासाठी तसेच कोरोना संकटाशी लढण्यासाठी केंद्राकडून शक्य ती सर्व मदत केली जाईल, असे आश्वासन मोदींनी दिले आहे. 

19:33 May 02

सुवेंदु अधिकारींकडून ममता बॅनर्जी १७३६ मतांनी पराभूत

नंदीग्राम मतदारसंघातून सुवेंदु अधिकारींचा १ हजार ७३६ मतांनी विजय. ममता बॅनर्जी पराभूत

18:25 May 02

नंदीग्राम मतदारसंघातून ममता बॅनर्जी यांचा धक्कादायक पराभव, सुवेंदु अधिकारी विजयी

नंदीग्राम मतदारसंघातून ममता बॅनर्जी यांना विजयी घोषित करण्यात आले होते. मात्र पुर्नमतमोजणीत त्यांचा निसटता पराभव झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे.  

17:30 May 02

ममता जिंकल्या! आता कोरोनाकडे लक्ष देऊया - उद्धव ठाकरे

मुंबई - ममता बॅनर्जी या 'बंगाली' जनतेच्या स्वाभिमानाचा लढा एकाकी लढत होत्या. त्यांच्या हिमतीला दाद द्यावीच लागेल. अखेर त्यांचा विजय झालाच आहे. या विजयाचे संपूर्ण श्रेय बंगालच्या या 'वाघिणी'लाच द्यावे लागेल. पंतप्रधानांपासून गृहमंत्र्यांपर्यंत संपूर्ण केंद्र सरकार, राज्यांची सरकारे ममता दीदींच्या पराभवासाठी प. बंगालच्या भूमीवर एकवटली. त्या सर्व शक्तींची धूळदाण उडवत ममता दीदींनी विजय मिळविला. मी त्यांचे व हिंमतबाज प. बंगाली जनतेचे मनापासून अभिनंदन करतो. आता राजकारण संपले असेल तर सगळ्यांनी मिळून कोरोनाविरुद्धच्या लढाईकडे लक्ष देऊया. असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. 

16:26 May 02

नंदीग्राम मतदारसंघातून ममता बॅनर्जी १२०० मतांनी विजयी

नंदीग्राम मतदारसंघातून ममता बॅनर्जी १२०० मतांनी विजयी. भाजपचे उमेदवार सुवेंदु अधिकारी पराभूत.

15:58 May 02

१६ व्या फेरीअखेर ममता ६ हजाराहून अधिक मतांनी आघाडीवर

नंदीग्राममधून ममता बॅनर्जी आघाडीवर. १६ व्या फेरीअखेर ममता ६ हजाराहून अधिक मतांनी आघाडीवर. सुवेंदु अधिकारी पिछाडीवर.

15:54 May 02

नंदीग्राम मतदारसंघातून ममता बॅनर्जी ४ हजार ९९ मतांनी आघाडीवर

नंदीग्राममधून ममता बॅनर्जी आघाडीवर. १५ व्या फेरीअखेर ममता ४ हजार ९९ मतांनी आघाडीवर. सुवेंदु अधिकारी पिछाडीवर.

15:25 May 02

नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी ३ हजार १०० मतांनी आघाडीवर

नंदीग्राममधून ममता बॅनर्जी पहिल्यादांच आघाडीवर. १४ व्या फेरीअखेर ममता ३ हजार १०० मतांनी आघाडीवर. सुवेंदु अधिकारी पिछाडीवर.

15:14 May 02

नंदीग्राममध्ये कांटे की टक्कर.. ममता बॅनर्जी पहिल्यांदाच आघाडीवर

नंदीग्राममधून ममता बॅनर्जी पहिल्यादांच आघाडीवर. १३ व्या फेरीअखेर ममता १ हजार ४५३ मतांनी आघाडीवर. सुवेंदु अधिकारी पिछाडीवर.

14:55 May 02

'दीदी ओ दीदी' या अपमानजनक टिप्पणीला जनतेने दिलेलं हे सडेतोड उत्तर - अखिलेष यादव

सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन करताना एक ट्वीट केलं आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, "पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या द्वेषाच्या राजकारणाला पराभूत करणारी जागरुक जनता, लढाऊ ममता बॅनर्जी आणि टीएमसीच्या समर्पित नेते आणि कार्यकर्त्यांचं हार्दिक अभिनंदन. भाजपने एका महिलेवर केलेल्या 'दीदी ओ दीदी' या अपमानजनक टिप्पणीला जनतेने दिलेलं हे सडेतोड उत्तर आहे."

14:45 May 02

तृणमूलच्या कार्यकर्त्यांना विजयी जल्लोष न करण्याच्या सूचना

तृणमूल युवा काँग्रेसचे राज्य सचिव सत्यदेव चॅटर्जी यांनी सांगितले, की आम्हाला विजयी जल्लोष करायचा नाही, मात्र विरोधकांकडून तृणमूलविरोधात मोहीम राबविली जात आहे. त्यामुळे आमचे कार्यकर्ते तणावात आहेत. आम्ही पक्ष कार्यकर्त्यांना सूचना केल्या आहेत की कोविड परिस्थितीमुळे जल्लोष करू नका. 

14:24 May 02

  • तृणमूल उमेदवार अब्दुल गनी यांचा सुजापूर मतदारसंघात विजय झाला आहे.
  • उदयनारायणपूरमधून तृणमूल उमेदवार समीर कुमार पंजा यांचा विजय झाला आहे.
  • नैहातीमधून पर्थ भौमिक या तृणमूल उमेदवाराचा विजय झाला आहे.
  • भाजपा उमेदवार अजय कुमार पोद्दार यांचा विजय झाला आहे.
  • सिलीगुरीमधून भाजपा उमेदवार शंकर घोष यांचा विजय झाला आहे.

14:20 May 02

तृणमूल-भाजपाने खातं उघडलं..

तृणमूलने आतापर्यंत सहा जागांवर विजय मिळवला असून, भाजपाने दोन जागा जिंकल्या आहेत. सध्या तृणमूल १९६ जागांवर पुढे असून, भाजपा ८४ जागांवर पुढे आहे. तसेच, डावे आणि इतर प्रत्येकी दोन ठिकाणी आघाडीवर आहेत.

13:30 May 02

शरद पवारांनी केले ममतांचे अभिनंदन..

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ममता बॅनर्जींचे अभिनंदन केले आहे. पश्चिम बंगालमध्ये सध्या तृणमूल काँग्रेस २०१ जागांवर आघाडीवर आहे.

12:54 May 02

दुपारी एक वाजेपर्यंतचे कल समोर..

दुपारी एक वाजेपर्यंतचे कल समोर आले आहेत. तृणमूल सध्या २०४ मतदारसंघांमध्ये आघाडीवर आहे. भाजपा ८२ जागांवर पुढे आहे, तर डावे आणि इतर प्रत्येकी तीन जागांवर पुढे आहेत.

12:52 May 02

तृणमूलच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष; निवडणूक आयोगाने दिले कारवाईचे निर्देश..

तृणमूल २०० हून अधिक ठिकाणी आघाडीवर आहे. त्यामुळे राज्यात ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने अशा प्रकारच्या जल्लोषावर बंदी घातली आहे. त्यामुळे आयोगाने आता अशा प्रकारे एकत्र येत जल्लोष करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला दिले आहेत.

12:09 May 02

सुवेंदू अधिकारी पुन्हा पुढे..

  • नंदीग्राममधील मतमोजणीच्या सातव्या फेरीनंतर भाजपाचे सुवेंदू अधिकारी ममतांपेक्षा सात हजार मतांनी पुढे असल्याचे समजत आहे.
  • दरम्यान, टॉलीगंजमध्ये भाजपाचे बाबुल सुप्रियो हे तब्बल २० हजार मतांनी पिछाडीवर आहेत.

11:50 May 02

ममता-सुवेंदुमधील फरक कमी; मात्र ममता अद्यापही पिछाडीवर..

ममता बॅनर्जी आणि सुवेंदु अधिकारी यांच्यामधील फरक आता कमी झाला आहे. मात्र, तरीही ममता बॅनर्जी तीन हजारांहून अधिक मतांनी मागे आहेत.

11:49 May 02

तृणमूल २००च्या पुढे..

आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार, तृणमूल काँग्रेस २०६ मतदारसंघांमध्ये आघाडीवर आहे. तर, भाजपा ८३ आणि इतर तीन जागांवर पुढे आहे.

11:30 May 02

सर्व जागांवरचे कल समोर; भाजपा अजूनही दुहेरी आकड्यांमध्ये..

पश्चिम बंगालमधील सर्व जागांचे कल समोर आले आहेत. तृणमूल सध्या १९४ जागांवर पुढे आहे. तर त्यापाठोपाठ भाजपा ९४, डावे एक, तर इतर तीन जागांवर पुढे आहेत.

11:20 May 02

सिलिगुरी मतदारसंघातून भाजपा उमेदवार आघाडीवर..

  • सिलिगुरी मतदारसंघातून भाजपा उमेदवार शंकर घोष हे ११ हजार मतांनी आघाडीवर आहेत.
  • उत्तर कांथी मतदारसंघातून भाजपा उमेदवार सुनिता सिन्हा या २,२७१ मतांनी आघाडीवर आहेत.
  • हल्दिया मतदारसंघातून भाजपा उमेदवार तापसी मंडल या १,९९४ मतांनी आघाडीवर आहेत.

11:12 May 02

सकाळी अकरा वाजेपर्यंत तृणमूलकडे मोठी आघाडी..

सकाळी अकरा वाजेपर्यंत समोर आलेल्या कलांनुसार, तृणमूल काँग्रेसकडे मोठी आघाडी असल्याचे दिसत आहे. सध्या तृणमूल १९१ जागांवर पुढे आहे. तर भाजपा ९४, डावे एका आणि इतर तीन जागांवर पुढे आहे.

10:30 May 02

तृणमूल नेते बऱ्याच ठिकाणी आघाडीवर..

  • तृणमूलचे मदन मित्रा हे कमरहाटी मतदारसंघातून आघाडीवर आहेत.
  • तृणमूलचे अरुप बिस्वास हे टॉलीगंजमधून आठ हजार मतांनी आघाडीवर आहेत. याठिकाणी भाजपाचे बाबुल सुप्रियो पिछाडीवर आहेत.
  • कोलकाता पोर्टमधून तृणमूलचे फिरहाद हाकीम आघाडीवर आहेत.

10:28 May 02

बंगालमध्ये ममताच येणार - संजय राऊत

शिवसेना नेते संजय राऊत यांनी पश्चिम बंगालमध्ये ममतांचेच सरकार येणार असल्याचे मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले, की सुरुवातीची आकडेवारी तेवढी महत्त्वाची नाही. ममता नक्कीच सत्तेत येतील.

10:18 May 02

तृणमूलचे जावेद खान २७ हजार मतांनी पुढे..

कसबा मतदारसंघातील तृणमूलचे उमेदवार जावेद अहमद खान हे तब्बल २७ हजार ३८० मतांनी आघाडीवर आहेत.

10:16 May 02

सुरुवातीच्या कलांमध्ये तृणमूलने गाठला बहुमताचा आकडा..

आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार तृणमूल काँग्रेस १५३ मतदारसंघांमध्ये आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ भाजपा ९५, डावे सात तर इतर दोन ठिकाणी आघाडीवर आहेत.

10:12 May 02

नंदीग्राम : तिसऱ्या फेरीनंतरही ममता पिछाडीवरच..

नंदीग्राममधील मतमोजणीच्या तिसऱ्या फेरीनंतर ममता बॅनर्जी तब्बल ८,२०६ मतांनी पिछाडीवर असल्याचे समजत आहे. याठिकाणी भाजपाचे सुवेंदु अधिकारी आघाडीवर आहे.

10:04 May 02

सकाळी दहा वाजेपर्यंतचे कल समोर..

सकाळी दहा वाजेपर्यंत समोर आलेल्या कलांनुसार, तृणमूल १४४ ठिकाणी आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ भाजपा ९३, डावे ७, तर इतर दोन ठिकाणी आघाडीवर आहेत.

09:47 May 02

नंदीग्राम : दुसऱ्या फेरीनंतरही सुवेंदुंचेच वर्चस्व..

नंदीग्राममधील मतमोजणीच्या दुसऱ्या फेरीनंतर तृणमूलच्या ममता बॅनर्जी तब्बल ३,४६० मतांनी पिछाडीवर असल्याचे समोर आले आहे.

09:44 May 02

२००+ जागांचा कल समोर; तृणमूल आघाडीवरच..

पश्चिम बंगालमधील २२१ जागांचा कल हाती आला आहे. यांपैकी १२० ठिकाणी तृणमूल आघाडीवर आहे. तर त्यापाठोपाठ ९२ ठिकाणी भाजपा, सात ठिकाणी डावे तर दोन ठिकाणी इतर पक्ष आघाडीवर आहेत.

09:26 May 02

तृणमूल आघाडीवर, मात्र ममता पिछाडीवर..

सुरुवातीच्या कलांमध्ये तृणमूल काँग्रेस आघाडीवर दिसून येत असली; तरी नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी पिछाडीवर आहेत. भाजपाचे सुवेंदु अधिकारी हे ममतांपेक्षा १,४९७ मतांनी आघाडीवर आहेत.

09:22 May 02

भाजपा तृणमूलपेक्षा बरीच मागे..

आतापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार; तृणमूल १०१, भाजपा ७०, डावे आठ तर इतर एका ठिकाणी आघाडीवर आहेत.

09:03 May 02

तृणमूल शंभरीच्या जवळ..

पश्चिम बंगालमधील १५४ जागांचे कल समोर आले असून; तृणमूल सध्या ९२ ठिकाणी आघाडीवर आहे. तसेच, भाजपा ५८ आणि डावे चार जागांवर पुढे आहेत.

09:01 May 02

पानिहातीमधील काँग्रेसच्या काऊंटिंग एजंटला रुग्णालयात नेले..

नॉर्थ परगणा जिल्ह्यातील पानिहाती येथे मतमोजणी केंद्रावर असणाऱ्या काँग्रेसच्या काऊंटिंग एजंटला अचानक चक्कर आली. गोपाल सोम असे या एजंटचे नाव आहे. त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले.

08:58 May 02

दोन ठिकाणी मतमोजणीला सुरुवात नाही..

बारासातमधील दोन केंद्रांवर अद्याप मतमोजणी सुरू झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

08:38 May 02

१०० जागांवरील कल हाती; तृणमूल ६६ ठिकाणी पुढे..

आतापर्यंत १०५ जागांवरील कल हाती आले असून; तृणमूल ६६ जागांवर, भाजपा ३८ जागांवर आणि डावे दोन जागांवर पुढे आहेत.

08:28 May 02

सकाळी साडेआठ वाजेपर्यंतचे कल..

सकाळी साडेआठ वाजेपर्यंतचे कल पाहता, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल ४३, भाजपा २८ आणि डावे दोन जागांवर पुढे आहेत.

08:23 May 02

पहिले कल हाती येण्यास सुरुवात; तृणमूल आघाडीवर..

पहिले कल हाती येण्यास सुरुवात झाली असून; पश्चिम बंगालमध्ये तृणमूल ३५ ठिकाणी, भाजपा १४ ठिकाणी डावे ३ ठिकाणी आघाडीवर दिसून येत आहेत.

08:09 May 02

१०८ केंद्रांवरुन सुरु आहे मतमोजणी..

राज्यात एकूण १०८ केंद्रांवर मतमोजणी सुरू आहे. यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी राज्यात सैन्याच्या २४२ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

08:00 May 02

मतमोजणीला सुरुवात..

पश्चिम बंगालसह चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीसाठी सुरुवात झाली आहे. काही वेळातच पहिले कल समोर येतील. सुरुवातीला बॅलेट पेपरवरील मतं मोजली जाणार आहेत.

07:20 May 02

सकाळी आठ वाजता सुरू होणार मतमोजणी..

सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

06:28 May 02

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक; निकालाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर..

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी आज मतमोजणी पार पडणार आहे. आठ टप्प्यांमध्ये ही निवडणूक पार पडली होती. ममता बॅनर्जींनी आपली सत्ता टिकवण्यासाठी, आणि मोदींनी सत्ता मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केलेले पहायला मिळाले. या आठही टप्प्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचारदेखील पहायला मिळाला. कोरोना काळातही मोदींच्या सभा, ममतांवर झालेला कथित हल्ला या सर्व गोष्टींमुळे संपूर्ण देशाचं लक्ष या निकालाकडे लागलं आहे.

'या' कारणामुळे पश्चिम बंगालमध्ये २९२ जागांवरच निवडणूक..

या विधानसभा निवडणुकांत सर्वात जास्त चर्चेत राहिले ते म्हणजे पश्चिम बंगाल राज्य. २९४ विधानसभेच्या जागा असलेल्या या राज्यात २९२ जागांवरच निवडणूक घेण्यात आली. २ जागांवरील उमेदवारांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने असे करण्यात आले. पश्चिम बंगालमध्ये सध्या मॅजिक फिगर १४८ आहे.

'ईटीव्ही भारत'च्या एक्जिट पोलनुसार कोणालाही नाही स्पष्ट बहुमत..

यंदाची निवडणूक ही कठीण असणार याची कल्पना ममता बॅनर्जींना होती. ममता यांना लढत देण्यासाठी आपल्याजवळ सक्षम व्यक्ती नाही, हे भाजपला देखील माहिती होते. निवडणूक जिकण्याची शक्यता कमी असल्याचे डावे आणि काँग्रेस यांच्या मित्रपक्षांनाही कल्पना होती. तरी त्यांनी निवडणुकीतून जुन्या उमेदवारांना डावलून नव तरुणांना संधी दिली. मात्र, ईटीव्ही भारतच्या पोस्ट पोल अंदाजानुसार यातील एकाही पक्षाला सत्ता स्थापनेसाठी लागणाऱ्या १४८चा जादूई आकडा गाठता येणार नाही.

Last Updated : May 3, 2021, 6:26 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.