ETV Bharat / bharat

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या, कसा असेल हा आठवडा - राशीभविष्य

जुलैचा चौथा आठवडा सुरू झाला आहे. मेष राशीशी विद्यार्थ्यांना खूप मेहनत करावी लागेल, अन्यथा त्रास होऊ शकतो. ह्या आठवड्यात आपल्या प्रकृतीत सुधारणा होईल. वृषभ राशीशी संबंधित लोकांसाठी हा आठवडा चांगला राहील. प्रेम जीवनात चढ-उतार येतील.

Weekly Horoscope
साप्ताहिक राशीभविष्य
author img

By

Published : Jul 22, 2023, 11:21 PM IST

Updated : Jul 23, 2023, 6:17 AM IST

  • मेष : हा आठवडा आपल्यासाठी साधारण फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस धन प्राप्ती चांगली झाल्याने आपल्या आनंदात भर पडेल. आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. आव्हानांचा सामना करून आपण वाटचाल कराल. आठवड्याच्या मध्यास आपल्या ऊर्जेत वाढ झाल्याने आपण आपली सर्व कामे वेळेवर पूर्ण करू शकाल. त्यामुळे आपली आर्थिक स्थिती प्रबळ होण्यास पाठबळ मिळेल. आठवड्याच्या अखेरच्या दिवसात आपण आपले काम व कुटुंब ह्या दरम्यान समतोल साधण्याचा प्रयत्न कराल. कुटुंबात काही समस्या निर्माण होतील, व त्या आपण हस्तक्षेप केल्याने कमी होऊ लागतील. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या मेहनतीचे अपेक्षित फळ न मिळाल्याने ते काहीसे नाराज होण्याची संभावना आहे. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी सामान्य आहे. दुर्गम ठिकाणांहून काम मिळविण्यात ते यशस्वी होतील. आपण धार्मिक कार्य कराल. मानसिक तणाव वाढण्याची शक्यता आहे. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात तणाव वाढण्याची शक्यता असल्याने त्यांनी काळजी घ्यावी. प्रेमीजनांसाठी हा आठवडा सामान्य आहे. आठवड्याचे मधले दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
  • वृषभ : हा आठवडा आपल्यासाठी खूप चांगला आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण बुद्धीच्या जोरावर अनेक कार्ये यशस्वीपणे कराल व त्यामुळे आपला आत्मविश्वास द्विगुणित होऊन मनोबल उंचावेल. आपल्या प्राप्तीत सुद्धा वृद्धी होईल. लहान - सहान खर्च तर होतच राहतील. परंतु आपणास ठोस प्राप्तीचा स्रोत मिळाल्याने कौटुंबिक जीवन सुखद होईल. आपल्या कुटुंबात एखादे शुभ कार्य होण्याची संभावना आहे. आठवड्याच्या अखेरच्या दिवसात आपण एखादा प्रवास करू शकाल. ह्या आठवड्यात विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. एकमेकांप्रती प्रेम भावना राहील. प्रेमीजनांना त्यांच्या जीवनातील सत्य स्वीकारावे लागेल. संबंधांची वास्तविकता समजून घेऊन त्यानुसार वागावे. नोकरी करणाऱ्या व्यक्ती कामाचा आनंद घेऊ शकतील. वरिष्ठ आपल्या कामगिरीने खुश होतील. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी सामान्य आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात काही समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
  • मिथुन : हा आठवडा आपल्यासाठी साधारण फलदायी आहे. आपणास काही मानसिक चिंता असतील, ज्या हळू हळू दूर होऊ लागतील. आठवड्याच्या सुरवातीस आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. आपण आजारी पडण्याची संभावना आहे. अंगदुखी, तीव्र डोकेदुखी किंवा ताप इत्यादी समस्या संभवतात. आपली प्राप्ती चांगली झाल्याने कोणतीही आर्थिक समस्या आपल्या समोर राहणार नाही. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या चांगल्या कामगिरीचे बक्षीस मिळेल. व्यापारी आपल्या कामाचा आनंद घेऊ शकतील. विवाहितांचे वैवाहिक जीवन अत्यंत सुखद होईल. आपण एकमेकांचा आदर कराल, व त्यामुळे प्रेम व आकर्षणात वाढ होईल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा चांगला आहे. आपण आपले संबंध पुढे नेऊ शकाल. विद्यार्थ्यांना अभ्यासात एखादी नवीन पद्धत शिकण्याची संधी मिळेल. आठवड्याचे सुरवातीचे दोन दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
  • कर्क : हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आठवड्याच्या सुरवाती पासूनच आपल्यात भरपूर ऊर्जा राहील. आपण प्रत्येक काम जलद गतीने कराल. तत्पूर्वी त्यांचा प्राधान्यक्रम नक्की कराल. आपल्या प्राप्तीत वाढ व खर्चात कपात होईल. आपण काही नवीन वस्तूंची खरेदी कराल. त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. समस्या आल्यास घाबरू नका. आपणास नशिबाची साथ मिळाल्याने कार्यात सहजपणे यशस्वी होऊ शकाल. व्यापारात प्रगती होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना आपली मेहनत वाढवावी लागेल. त्यासाठी त्यांना आपल्या कामावर अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात थोडा तणाव निर्माण होण्याची संभावना आहे. आपल्या दोघात मतभेद वाढण्याची शक्यता आहे. प्रेमीजनांसाठी हा आठवडा चांगला आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण आपल्या प्रेमिकेसह फिरावयास जाऊ शकाल. विद्यार्थ्यांना अभ्यासात खूप मोठा लाभ होईल. तांत्रिक विषय शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा अभ्यास खूप चांगला होईल. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
  • सिंह : हा आठवडा आपल्यासाठी साधारण फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण आपल्या कार्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करू शकाल व त्यामुळे आपणास कामाशी संबंधित चांगले परिणाम प्राप्त होतील. ह्या आठवड्याच्या मध्यास आपल्या प्राप्तीत खूप मोठी वाढ संभवते. आर्थिक स्थिती मजबूत होईल. आठवड्याच्या अखेरच्या दिवसात काही खर्च वाढू शकतात. खरेदी करण्यासाठी आपण सढळ हस्ते खर्च कराल. ह्या आठवड्यात आपणास परदेशी जाण्याची बातमी मिळण्याची संभावना असल्याने आपले प्रयत्न चालूच ठेवावेत. प्रकृती नरम - गरम राहील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या कामात खूप लाभ होईल. पदोन्नती सुद्धा संभवते. व्यापाऱ्यांना आपल्या व्यापार वृद्धीसाठी प्रवास करावा लागेल. आपण कायद्याच्या कचाट्यात सापडणार नाही याची काळजी घ्यावी. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा खूपच चांगला आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळतील. आपण आपला अभ्यास चालूच ठेवावा. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
  • कन्या : हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण प्रवास करू शकाल. आठवड्याच्या मध्यास आपण संपूर्ण लक्ष आपल्या कामावर केंद्रित करून जुनी कामे पूर्ण करण्यासाठी वेळ काढाल. आठवड्याच्या अखेरच्या दिवसात आपण आपल्या प्राप्तीत वाढ होताना पाहू शकाल, व त्यामुळे आपले मन प्रसन्न होईल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात आनंद पसरेल. आपण आपल्या वैवाहिक जोडीदारासह सुखद भविष्याचे स्वप्न बघाल. प्रेमीजन आपल्या संबंधाच्या बाबतीत खूपच गंभीर होतील. आपली प्रेमिका व्यथित होईल असे कोणतेही कार्य करू नका. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडथळ्यांना सामोरे जावे लागू शकते. अभ्यासात मेहनत वाढवावी लागेल. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत. व्यावसायिकांसाठी हा आठवडा खूप उपयुक्त ठरेल. आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना सुद्धा ह्या आठवड्यात चांगले परिणाम मिळतील.
  • तूळ : हा आठवडा आपल्यासाठी साधारण फलदायी आहे. आपल्या प्राप्तीत थोडी कपात झाली तरी आपला खोळंबा होणार नाही. येणाऱ्या काळात आपली आर्थिक स्थिती चांगली होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होताना दिसून येईल. त्यांचा आत्मविश्वास सुद्धा वृद्धिंगत होईल. कौटुंबिक जीवनात काळजीचे वातावरण राहील. त्याचे कारण समजून घेऊन ते दूर करण्याचा प्रयत्न करावा. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात थोडा तणाव राहील. तेव्हा आपल्या वैवाहिक जोडीदाराशी प्रेमाने बोलून त्यांच्या कोणत्याही समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न करावा. प्रेमीजनांसाठी हा आठवडा सामान्य आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात त्यांच्या मेहनतीचे यथोचित फळ मिळेल. आठवड्याचा पहिला व अखेरचा दिवस वगळून इतर सर्व दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
  • वृश्चिक : हा आठवडा आपल्यासाठी खूप चांगली बातमी घेऊन येणार आहे. आपण आपले वैवाहिक जीवन सुखद करण्यासाठी प्रयत्न करून त्यात यशस्वी सुद्धा व्हाल. त्यामुळे आपल्या जीवनात नावीन्य येऊन आपण वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगू शकाल. प्रेमीजनांना त्यांच्या संबंधात थोडी नीरसता जाणवेल. जगात काहीच शिल्लक नसल्याचे त्यांना वाटू लागेल. परंतु अचानकपणे त्यांच्या हृदयात प्रेम वाढू लागल्याने ते आपल्या प्रणयी जीवनाचा पूर्ण आनंद घेऊ शकतील. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी चांगला आहे. आठवड्याच्या सुरवातीस ते एखादा मोठा सौदा करू शकतील. त्यामुळे त्यांच्या सर्व समस्या दूर होतील. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. आपली पगारवाढ संभवते. तसेच एखाद्या चांगल्या ठिकाणी बदली होण्याची सुद्धा शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. आपण अभ्यासात रुची घ्याल व प्रगती करण्याच्या प्रयत्नात यश प्राप्त कराल. आठवड्याचा पहिला व अखेरचा दिवस प्रवासास अनुकूल आहे.
  • धनु : हा आठवडा आपल्यासाठी साधारण फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण आपल्या विरोधकांमुळे चिंतीत होण्याची शक्यता असून त्यांच्यावर मात करण्याची योजना तयार कराल. आठवड्याच्या मध्यास आपण कुटुंबाच्या समस्यांवर लक्ष केंद्रित कराल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. आपल्या वैवाहिक जोडीदाराच्या समस्या कमीच असल्याने आपली त्यांच्याशी जवळीक वाढेल. संबंधात आत्मीयता व रोमांस वाढेल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी सामान्य आहे. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी चांगला असला तरी त्यांना आठवड्याच्या अखेरच्या दिवसात बेकायदेशीर प्रवृत्तीं पासून दूर राहावे लागेल, अन्यथा नुकसान सोसावे लागेल. व्यापारी आपल्या व्यवसायात काही नवीन योजना समाविष्ट करू शकतील. तसेच काही नवीन ऑफर्स देऊन आपल्या व्यापारात प्रगती साधण्यात यशस्वी होऊ शकतील. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा सामान्य आहे. आपणास खूपच मेहनत करावी लागेल. असे केल्यानेच आपण चक्रव्यूहातून बाहेर पडू शकाल. विद्यार्थ्यांना ह्या आठवड्यात सर्व आव्हानांना सामोरे जाऊन अभ्यास करावा लागेल. आठवड्याचे अखेरचे दोन दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
  • मकर : हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आठवड्याच्या सुरवातीसच आपली महत्वाची कामे पूर्ण केल्यास कोणतीही समस्या उदभवणार नाही. आपण नोकरीच्या कामात खूपच व्यस्त राहाल. आपण दुसरी नोकरी मिळविण्यासाठी प्रयत्नशील राहाल. आपल्या सध्याच्या नोकरीत आपण समाधानी असून सुद्धा आपली प्रगती व्हावी म्हणून अनेक ठिकाणी नोकरीसाठी अर्ज करू शकाल. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. आपणास शासनाकडून मोठा लाभ होण्याची किंवा निविदा मिळण्याची संभावना आहे. विवाहितांसाठी हा आठवडा खूपच चांगला आहे. आपला वैवाहिक जोडीदार अनेक बाबतीत बुद्धिपूर्वक काम करून आपणास लाभ मिळवून देईल, ज्याने आपण आनंदित व्हाल. कुटुंबात तणाव वाढेल. आपल्या आईची प्रकृती बिघडण्याची संभावना आहे. प्रेमीजनांसाठी हा आठवडा चांगला आहे. आपण संबंधांचा आनंद घेऊ शकाल. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळतील. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
  • कुंभ : हा आठवडा आपल्यासाठी साधारण फलदायी आहे. कुटुंबीयांप्रती आपली आसक्ती वाढेल. कौटुंबिक जीवन सुखद होईल. कामाशी संबंधित चांगले परिणाम आपणास मिळू शकतील. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपल्या कामावर अधिक लक्ष केंद्रित करतील. ते आपल्या व्यक्तिगत व व्यावसायिक जीवनाचा समतोल साधू शकतील. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी चांगला आहे. आपणास आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेचा लाभ होईल. आपल्या अनेक खोळंबलेल्या योजना कार्यान्वित होऊन आपणास चांगले परिणाम मिळवून देऊ शकतील. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात अनेक चढ - उतार येतील. आपण आपल्या वैवाहिक जोडीदारासाठी तसेच स्वतःसाठी काही खरेदी करण्याची संभावना आहे. त्यामुळे आपल्या खर्चात वाढ होईल. प्रेमीजन रोमांस करून आपल्या प्रेमिकेचे हृदय जिंकण्याचा प्रयत्न करून तिला खुश करतील. विद्यार्थ्यांना काही नवीन शिकण्याची संधी मिळेल. तसेच जुन्या विषयात ते नैपुण्य मिळवू शकतील. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
  • मीन : हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आपला आत्मविश्वास उंचावेल. आपण प्रत्येक काम उत्तम प्रकारे पूर्ण करू शकाल. मित्रांसह फिरावयास जाण्याची संधी मिळाल्याने आपण खुश व्हाल व आपल्या मनात नवीन आशा निर्माण होईल. कुटुंबात एखाद्या कारणाने वाद होण्याची संभावना असल्याने काळजी घ्यावी. ह्या आठवड्यात आपण एखादे नवीन वाहन खरेदी करू शकाल. कुटुंबातील लहान्यांपासून आपणास आनंद प्राप्त होईल. नोकरीच्या ठिकाणी आपली प्रशंसा केली जाईल. आपल्या कामात आपण नैपुण्यता मिळवाल. व्यापाऱ्यांना व्यापारात लाभ होईल. विवाहितांना आपल्या वैवाहिक जीवनात सुखद क्षणांचा उपभोग घेण्यास मिळेल. आपल्या वैवाहिक जोडीदारास एखादी सिद्धी प्राप्त होण्याची संभावना आहे. प्रेमीजन आपल्या प्रणयी जीवनात समाधानी राहतील. आपण आपल्या प्रेमिकेवर मनापासून प्रेम कराल. आपल्या मनात तिच्याप्रती आसक्ती वाढेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात सकारात्मक परिणाम मिळतील.

Last Updated : Jul 23, 2023, 6:17 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.