ETV Bharat / bharat

Weekly Horoscope : 'या' राशींच्या व्यक्तींना हा आठवडा ठरेल भाग्यकारक, वाचा साप्ताहिक राशीभविष्य - Weekly Horoscope 6 August To 12 August

कसा असेल तुमचा आठवडा, अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल, वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का, मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावे, येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का, जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर वाचा, साप्ताहिक राशीभविष्य.

weekly horoscope
साप्ताहिक राशीभविष्य
author img

By

Published : Aug 5, 2023, 10:56 PM IST

  • मेष : हा आठवडा आपल्या खर्चात वाढ करणारा आहे. खर्च आवाक्या बाहेर गेल्याने आपणास त्रास होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. आपल्या काही गरजांवर लक्ष द्या व वायफळ खर्चां पासून दूर राहा. नोकरीशी संबंधित चांगले परिणाम मिळतील. आपण आपल्या पदावर अधिकाराने कामे कराल. व्यापाऱ्यांना परदेशी व्यक्तींच्या सहकार्याने काम केल्याचा फायदा होण्याची किंवा एखाद्या बहुराष्ट्रीय संस्थे बरोबर काम केल्यास अधिक फायदा होण्याची संभावना आहे. ह्या आठवड्यात सरकारी क्षेत्रा कडून एखादा मोठा फायदा आपणास होऊ शकतो. ह्या आधी आपण जर एखादे कर्ज घेतले असेल तर फेडण्यात यश प्राप्त होईल. कुटुंबात थोडा तणाव वाढू शकतो. वैवाहिक जीवनात स्थिती अनुकूल राहील. आपणास जोडीदाराचे सहकार्य मिळून ते आपणास नवीन काही करण्यासाठी प्रेरित करतील. प्रणयी जीवनात प्रणया व्यतिरिक्त खूप गप्पागोष्टी होतील. आपण बराच वेळ आपल्या प्रेमिकेशी फोनवर बोलत बसाल व तिला भेटण्याची एकही संधी वाया घालवणार नाही. त्यामुळे आपल्या प्रणयी जीवनातील स्थिती दृढ होईल. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे. त्यांची मेहनत यशस्वी होऊन त्यांना सुखद परिणाम मिळतील. आठवड्याचे मधले दिवस प्रवासास अनुकूल आहेत. आपणास आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. सर्दी, खोकला, ताप किंवा पोटाचे विकार त्रास देऊ शकतात.
  • वृषभ : हा आठवडा आपल्या प्राप्तीत वाढ घेऊन येणारा आहे. आपण काही नवीन योजनांवर कार्यरत व्हाल ज्या आपणास फायदा देतील. खर्च होतच राहिल्याने आपण चिंतीत सुद्धा व्हाल. आठवड्याच्या मध्यास आपण चिंतातुर असल्याचे दिसून येईल. मात्र, त्यातून आपणास बाहेर पडावे लागेल. अन्यथा त्याचा प्रतिकूल परिणाम नोकरीवर होऊ शकतो. आपल्या कामावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा. व्यापारासाठी आठवडा सामान्यच आहे. आपण आपले प्रयत्न चालूच ठेवावेत. दांपत्य जीवनात तणाव असून सुद्धा प्रेम टिकून राहील. एकमेकांना समजून घेण्यात यशस्वी झाल्याने नाते दृढ होईल. प्रणयी जीवनात चढ - उतार येतील. कदाचित आपणास आपल्या कुटुंबियांच्या विरोधास सामोरे जावे लागेल. आपले मित्र आपल्या मदतीस धावून येतील. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत. आठवड्याच्या मध्यास प्रकृतीची काळजी घ्यावी.
  • मिथुन : हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आपण खूप जोशात येऊन प्रत्येक काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. प्रकृतीत सुद्धा थोडी सुधारणा झाल्याचे दिसून येईल. नशिबाच्या प्राबल्यामुळे कामे होतील. नोकरी असो किंवा व्यापार दोन्ही ठिकाणी आपला दबदबा राहिल्याने आपली स्थिती मजबूत होईल. हा आठवडा आर्थिक दृष्ट्या सुद्धा मजबुती देणारा आहे. आपले खर्च नगण्यच असतील, जी आपली जमेची बाजू असेल. एखादा छोटा प्रवास संभवतो. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवन सुखद होईल. प्रणयी जीवनात चढ - उतार येतील. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासात नियमितता राखण्याचा प्रयत्न करावा. आठवड्याचे पहिले तीन दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
  • कर्क : हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आपणास आनंद मिळून ताजेतवाने सुद्धा वाटू शकेल अशा एखाद्या दूरवरच्या प्रवासाची आखणी आपण करू शकाल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना आपल्या कामाच्या बाबतीत कुटुंबियांचे सहकार्य सुद्धा घ्यावे लागेल. व्यापाऱ्यांना आपल्या व्यापारातील काही पैसा आपल्या कुटुंबियांच्या गरजा भागविण्यासाठी सुद्धा खर्च करावा लागेल. तेव्हा आपणास कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. कुटुंबात काही मतभेद होण्याची संभावना आहे. आपल्या मनात सर्वांवर वर्चस्व गाजविण्याची इच्छा जागृत होईल. वैवाहिक जीवनासाठी असे वाटणे योग्य नाही. असे झाल्यास वैवाहिक जीवनातील तणाव वाढेल. आपणास तो टाळण्याचा सल्ला देण्यात येत आहे. प्रणयी जीवनासाठी आठवडा अनुकूल आहे. आपण आपल्या प्रेमिकेची योग्य तितकी काळजी घ्याल. तिच्यासाठी एखादी मोठी भेटवस्तू सुद्धा घ्याल. कौटुंबिक जीवनात काहीसा असंतोष जाणवेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळतील. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
  • सिंह : हा आठवडा आपल्या मनात काही नवीन उमेद घेऊन येणारा आहे. आपणास नशिबाची साथ मिळून काही कामे सुद्धा होतील. आपण एखादी तीर्थयात्रा सुद्धा कराल. कुटुंबियांना बरोबर घेऊन गेल्याने मन खूपच आनंदित होईल. आपल्यासाठी बाहेर फिरणे होईल व मानसिक शांतता प्राप्त करण्याची संधी सुद्धा. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना थोडी धावपळ केल्यानेच कामात मनोवांच्छित परिणाम प्राप्त होऊ शकतील. व्यापाऱ्यांना खूप परिश्रमपूर्वक विचार करावा लागेल. आपली काय परिस्थिती आहे ह्याचा अंदाज सुद्धा घ्यावा लागेल. हे बघूनच पुढे जाण्याचा प्रयत्न करावा. ह्या आठवड्यात कोणतीही गुंतवणूक करू नये. खर्च वाढतील. प्राप्ती सामान्यच राहील. वैवाहिक जीवनात परस्परातील सामंजस्याने नाते टिकून राहील. प्रणयी जीवनात स्थिती नियंत्रणात राहील. आपण एकमेकांच्या सहवासात वेळ घालवू शकाल. विद्यार्थ्यांसाठी आठवडा चांगला आहे. त्यांची अभ्यासातील स्थिती उत्तम राहील. आठवड्याचे मधले दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
  • कन्या : रोज थोडा वेळ आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, कारण उत्तम आरोग्या सारखी कोणतीच संपत्ती नाही. व्यायामाकडे थोडे लक्ष दिल्यास आरोग्याशी संबंधित त्रास साधारण ७०% कमी होऊ शकतो. ह्या आठवड्यात आपल्या खर्चात वाढ होईल. अर्थात त्यामुळे आपण चिंतीत होण्याची गरज नाही, कारण आपली प्राप्ती सुद्धा आपणास साथ देणारी आहे. असे असले तरी भविष्यात आपणास आर्थिक त्रास होऊ नये म्हणून आपल्या प्राप्तीतील काही भाग एखाद्या चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करून ठेवावी. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना ह्या आठवड्यात खूप मेहनत करावी लागेल. त्यासाठी कदाचित आपणास भरपूर प्रवास सुद्धा करावा लागू शकतो. जास्त श्रम केल्याने आपणास आजारपण येण्याची संभावना असल्याने आपण आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. व्यापारी आपल्या जुन्या मित्रांच्या सहकार्याने एखादी नवीन योजना आखू शकतील. विवाहितांच्या वैवाहिक जीवनातील तणाव कमी होऊन जोडीदाराशी संबंध सुधारतील. प्रणयी जीवनासाठी आठवडा काहीसा प्रतिकूल असल्याने नात्यात दुरावा निर्माण होईल असे कोणतेच कृत्य करू नये. आठवडा प्रेमाने घालवा. आठवड्याचा पहिला दिवस व अखेरचे दोन दिवस प्रवासास अनुकूल आहेत. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे. प्रयत्न व कष्ट त्यांना यश प्रदान करतील.
  • तूळ : हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. काही महत्वाच्या कामांसाठी आपणास आपल्या मित्रांची मदत घ्यावी लागेल. व्यापारात आपली स्थिती मजबूत राहील. आपण जर नोकरी करत असाल तर आपले समर्थक आपणास खूप मदत करतील. विशेष म्हणजे वरिष्ठांशी सुद्धा आपला समन्वय उत्तम असल्याचा आपणास फायदा होईल. प्रकृतीत सुधारणा होईल. विवाहित व्यक्ती आपल्या वैवाहिक जीवनात काहीतरी नवीन करतील. घरासाठी खरेदी करतील ज्यात नवीन काही सामानांची खरेदी केल्याने घरात खुशीचे वातावरण निर्माण होईल. कौटुंबिक जीवन सामान्यच राहील. प्रेमीजनांसाठी हा आठवडा आनंददायी असणार आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी एखाद्या चांगल्या मार्गदर्शकाची आवश्यकता भासेल. आठवड्याचा सुरवातीचा दिवस वगळून इतर सर्व दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
  • वृश्चिक : हा आठवडा आपणास अनुकूल आहे. संततीशी जवळीक वाढेल. वैवाहिक जोडीदाराशी नाते दृढ होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी आठवडा चांगला असला तरी जास्त बोलघेवडेपणा आपल्यासाठी अडचणी निर्माण करू शकतो, तेव्हा सावध राहावे व मन लावून आपली कामे करावीत. वरिष्ठांशी वाद संभवतात. व्यापाऱ्यांना काही नवीन लोकांना भेटण्याची संधी मिळेल. त्याचा आपल्या विचारांवर प्रभाव पडेल. आपण एखाद्या दुसऱ्या व्यापारावर सुद्धा लक्ष द्याल, म्हणजेच वर्तमान व्यापारा व्यतिरिक्त दुसरा एखादा व्यापार करून आपली प्राप्ती वाढविण्यावर भर द्याल. प्राप्ती चांगली झाली तरी खर्च सुद्धा तितकेच होतील. विवाहित व्यक्तींच्या वैवाहिक जीवनातील तणाव निवळू लागतील. प्रणयी जीवनासाठी आठवडा चांगला आहे. प्रेमीजनांच्या नात्यातील प्रेम वृद्धिंगत होईल. निष्कारण चिंता करू नका, त्याने काहीच साध्य होणार नाही. आठवड्याचा पहिला दिवस वगळता हा आठवडा प्रवासास प्रतिकूल आहे. विद्यार्थ्यांना खूप मेहनत करावी लागेल.
  • धनु : हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आपले व्यक्तिगत जीवन आनंदमय होईल. माता - पित्यांशी आपले संबंध अधिक दृढ होतील. आपण त्यांच्या प्रती भावुक व्हाल. कौटुंबिक संपत्ती प्राप्त होऊ शकते. नोकरीत बदली व कामात चांगली स्थिती निर्माण झाल्याने आपण खुश झाल्याचे दिसून येईल. व्यापाऱ्यांना त्यांच्या प्रयत्नांचा चांगला फायदा होईल. त्यांचा व्यवसाय प्रगती पथावर जाईल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. आपला वैवाहिक जोडीदार आपणास खुश करण्यास काही कमी पडू देणार नाही. प्रणयी जीवनात परिस्थिती आपणास अनुकूल राहील. आपण आपल्या प्रेमिकेच्या भावना ओळखू शकाल. तिच्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न सुद्धा कराल. आपल्या सभोवतालचे वातावरण सुखावह असेल. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्या उच्च शिक्षणावर लक्ष केंद्रित करावे.
  • मकर : हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आठवड्याच्या सुरवातीसच एखाद्या ठिकाणी फिरावयास जाण्याचा बेत ठरू शकतो. मित्रांच्या सहकार्याने कामात यशस्वी होता येईल. व्यापारात त्यांच्या पाठिंब्याने एखादे मोठे काम हाती घेऊ शकता. नोकरीच्या ठिकाणी परिस्थिती अनुकूल असली तरी काही विरोधक सक्रिय होऊन आपल्या विरुद्ध षडयंत्र रचण्याची संभावना असल्याने सावध राहावे. आर्थिक बाबतीत आठवडा प्रतिकूल आहे. धनहानी संभवते. गुप्त खर्च होतील. वैवाहिक जीवन तणावग्रस्त राहील. त्यातून बाहेर पडण्यासाठी आपणास आपल्या एखाद्या व्यक्तीच्या मदतीची गरज भासेल. प्रणयी जीवनासाठी आठवडा खूपच चांगला आहे. नात्यात रोमांस तर राहीलच, शिवाय एकमेकांना प्राप्त करण्याची इच्छा सुद्धा राहील. आठवड्याच्या सुरवाती पासून ते मध्या पर्यंतचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा काहीसा प्रतिकूल आहे. मेहनत वाढवून आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. संगतीवर लक्ष दिल्यास अनुकूल परिणाम प्राप्त होऊ शकतील.
  • कुंभ : हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. कौटुंबिक गरजांवर लक्ष द्याल. कुटुंबात पाहुण्यांची ये - जा राहील. विवाहित व्यक्ती आपल्या वैवाहिक जीवनाचा आनंद घेतील व आपल्या जोडीदारा प्रती आकर्षित होतील. नात्यात एक नवीन तजेला जाणवेल. प्रणयी जीवनासाठी आठवडा चांगला असला तरी आपल्या प्रेमिकेची मनःस्थिती बघून तिच्याशी संवाद साधावा. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी आठवडा अनुकूल आहे. आपण यशस्वी व्हाल. व्यापाऱ्यांसाठी सुद्धा हा आठवडा अनुकूल आहे. आपण जितके प्रयत्न कराल तितके जास्त यश प्राप्त होईल. अशा प्रकारे हा आठवडा त्यांना यश प्रदान करेल. काही नवीन ओळखी होतील. नातेवाईकांना भेटून सुद्धा आपण खुश व्हाल. आठवड्याच्या मध्यास मित्रांच्या सहवासात मौजमजा करण्याची संधी मिळेल. आठवड्याच्या सुरवाती पासून ते मध्या पर्यंतचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अनुकूल असला तरी कौटुंबिक जीवनाचा प्रतिकूल प्रभाव आपल्या अभ्यासावर होऊ देऊ नका.
  • मीन : हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आठवड्याच्या सुरवाती पासूनच आपली आर्थिक बाजू मजबूत होऊ लागेल. किरकोळ खर्च झाले तरी काळजीचे कारण नाही. प्रकृतीत बिघाड झाला तरी ती सुधारण्यात आपण यशस्वी व्हाल. वेळोवेळी प्राणायाम करून स्वतःला तंदुरुस्त ठेवण्याचा प्रयत्न करा. नोकरी करणाऱ्या व्यक्तीने आपली कामे पूजा समजून केल्यास ते यशस्वी होतील. मेहनत करून आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करा. आपण जर व्यापार करत असाल तर आपला व्यापार खोऱ्याने पैसा खेचून आपणास मोठा फायदा मिळवून देईल. व्यावसायिक भागीदार सुद्धा आपल्या आनंदास कारणीभूत होतील. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. जोडीदाराकडून आपणास एखादा मोठा फायदा होऊ शकतो. प्रेमीजनांना ह्या आठवड्यात प्रणयाचा आनंद लुटण्याची संधी मिळाल्याने त्यांच्या नात्यात सुधारणा होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश प्राप्त होईल. आपण विरोधकांवर मात कराल. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.