श्रीनगर - जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये हवामान खात्याने आणखी 4 दिवस पाऊस किंवा बर्फवृष्टीचा अंदाज वर्तविला होता. मात्र, येथे रविवारचे किमान तापमान अतिशीत बिंदूच्या वर राहिले.
हेही वाचा - महामारीत 'वंदे भारत मिशन'द्वारे 6.75 कोटी भारतीयांना आणले मायदेशी
हवामानामधील बदलाबाबत हवामान खात्याने दिलेल्या अॅडव्हायजरीमध्ये 'जम्मू-काश्मीर आणि त्याच्या आसपासच्या भागात मुख्यत: काश्मीर - गुलमर्ग, सोनमर्ग, बारामुल्ला, बांदीपोरा (गुरेझ) आणि तुलियाल खोरे) आणि कुपवाडा (कर्नाह) सेक्टर), शोपियां, काझीगुंड-बेनिहाल एक्सिस, जम्मू विभागातील पिरपंजाल रेंज, द्रास (गुमरी आणि मीनमार्ग) आणि लडाखच्या झांस्कर उपविभागाच्या वरच्या भागात मुसळधार पाऊस किंवा बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे,' असे म्हटले होते.
हा अंदाज वर्तवला गेला असताना श्रीनगर येथे रविवारी किमान तापमान 7.4 डिग्री सेल्सियस, पहलगाममध्ये 2.8 डिग्री आणि गुलमर्गमध्ये 2.0 अंश नोंदले गेले. लेह शहरात रात्रीचे किमान तापमान उणे 3.1, कारगिलमध्ये वजा 3.6 आणि द्रास येथे उणे 7.6 इतके होते. दुसरीकडे, जम्मू शहरात किमान तापमान 16.8, कटरामध्ये 16.4, बटोटे येथे 10.4, बनिहालमध्ये 7.2 आणि भादरवाहात 7.5 डिग्री होते.
हेही वाचा - ओडिसी नृत्यांगना लक्ष्मीप्रिया मोहापात्रा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन