मुंबई/नवी दिल्ली : उत्तर भारतातील अनेक भागात मुसळधार पावसाने हाहाकार उडाला आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या डोंगराळ राज्यांसह अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. विविध घटनात 18 जणांचा मृत्यू झाला. दुसरीकडे महाराष्ट्रात सरासरीहून कमी पावसाची नोंद झाल्याचे दिसत आहे. दिल्लीतील यमुनेसह देशाच्या उत्तरेकडील अनेक नद्यांना पूर येण्याची स्थिती आहे. त्यामुळे दिल्लीवर पुराचे संकट घोंगावत आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक शहरांमध्ये जनजीवन विस्कळित झाले आहे. अनेक शहरातील वाहतूक विस्कळित झाली आहे.
हवामान विभागाने कोकण विभागाला अलर्ट दिला आहे. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात आज मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. पालघर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. बीड, लातूर, औरंगाबादसह अनेक जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतिक्षा आहे. पाऊस चांगल्या प्रमाणात न झाल्याने अनेक ठिकाणी पेरणी खोळंबल्या आहेत.
-
#WATCH दिल्ली: राष्ट्रीय राजधानी में भारी बारिश और जलभराव के कारण जाम लगा। वीडियो ITO से है। pic.twitter.com/xXEOneZ0wk
— ANI_HindiNews (@AHindinews) July 9, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH दिल्ली: राष्ट्रीय राजधानी में भारी बारिश और जलभराव के कारण जाम लगा। वीडियो ITO से है। pic.twitter.com/xXEOneZ0wk
— ANI_HindiNews (@AHindinews) July 9, 2023#WATCH दिल्ली: राष्ट्रीय राजधानी में भारी बारिश और जलभराव के कारण जाम लगा। वीडियो ITO से है। pic.twitter.com/xXEOneZ0wk
— ANI_HindiNews (@AHindinews) July 9, 2023
अनेक राज्यांमध्ये पावसाचा रेड अलर्ट : दिल्लीसह देशातील अनेक राज्यांमध्ये हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. दिल्ली प्रादेशिक हवामान केंद्र प्रमुख चरण सिंह यांनी सांगितले की, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पुढील 2 दिवस अतिवृष्टी पावसाची शक्यता आहे. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि पूर्व राजस्थानमध्ये येत्या दोन दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरसाठी रेड अलर्ट आहे. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि पूर्व राजस्थानसाठी ऑरेंज अलर्ट आहे. दिल्लीत पुढील २४ तासांसाठी यलो अलर्ट आहे.
-
#WATCH हिमाचल प्रदेश: राज्य में लगातार हो रही भारी बारिश के कारण ब्यास नदी का जलस्तर बढ़ने से नगवाईं में फंसे 6 लोगों को बचाने का अभियान चलाया जा रहा है।
— ANI_HindiNews (@AHindinews) July 9, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
(सोर्स: ADM मंडी) pic.twitter.com/jQ4Pi0aCDU
">#WATCH हिमाचल प्रदेश: राज्य में लगातार हो रही भारी बारिश के कारण ब्यास नदी का जलस्तर बढ़ने से नगवाईं में फंसे 6 लोगों को बचाने का अभियान चलाया जा रहा है।
— ANI_HindiNews (@AHindinews) July 9, 2023
(सोर्स: ADM मंडी) pic.twitter.com/jQ4Pi0aCDU#WATCH हिमाचल प्रदेश: राज्य में लगातार हो रही भारी बारिश के कारण ब्यास नदी का जलस्तर बढ़ने से नगवाईं में फंसे 6 लोगों को बचाने का अभियान चलाया जा रहा है।
— ANI_HindiNews (@AHindinews) July 9, 2023
(सोर्स: ADM मंडी) pic.twitter.com/jQ4Pi0aCDU
पुढील 24 तासांमध्ये कसे राहिल - पुढील 24 तासांमध्ये जम्मू-काश्मीर, कोकण आणि गोव्याच्या काही भागांत मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तर निकोबार बेटे, सिक्कीम, आसाम आणि अरुणाचल प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, विदर्भ, किनारी कर्नाटक, केरळ, अंदमान येथे हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र, तेलंगणाचा काही भाग, ईशान्य भारत, पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, लडाख आणि लक्षद्वीपमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.आंध्र प्रदेश, अंतर्गत कर्नाटक आणि तामिळनाडूच्या समुद्रकिनारी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
-
#WATCH राजस्थान: अजमेर में बारिश के चलते कई इलाकों में जलभराव हुआ। pic.twitter.com/U1obF2AdQh
— ANI_HindiNews (@AHindinews) July 9, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH राजस्थान: अजमेर में बारिश के चलते कई इलाकों में जलभराव हुआ। pic.twitter.com/U1obF2AdQh
— ANI_HindiNews (@AHindinews) July 9, 2023#WATCH राजस्थान: अजमेर में बारिश के चलते कई इलाकों में जलभराव हुआ। pic.twitter.com/U1obF2AdQh
— ANI_HindiNews (@AHindinews) July 9, 2023
दिल्लीसह हिमाचलमध्ये विक्रमी पावसाची नोंद- दिल्लीत 1982 पासूनचा पावसाचा विक्रम मोडला आहे. रविवारी सकाळी 8:30 वाजेपर्यंत दिल्लीत 24 तासांत 153 मिमी पाऊस एवढ्या पाऊसाची नोंद झाली आहे.हिमाचल प्रदेशमध्येदेखील 50 वर्षांतील पावसाचा विक्रम मोडला आहे. हवामान विभाग कार्यालय, शिमला, सोलनमधील आकडेवारीनुसार रविवारी 135 मिमी पावसाची नोंद झाली. यापूर्वी 1971 मध्ये एकाच दिवसात 105 मिमी पावसाचा 50 वर्षांची नोंद झाली होती. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पावसाचे वाढलेले प्रमाण पाहता सोमवारी सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
-
#WATCH उत्तर प्रदेश: भारी बारिश के बाद ढेला नदी का जलस्तर बढ़ने से मुरादाबाद के कई गांवों में बाढ़ जैसी स्थिति पैदा हो गई है जिसकी वजह से लोगों को दिक्कतों का सामना करना पड़ रहा है। (09.07) pic.twitter.com/fYHtbWG8ce
— ANI_HindiNews (@AHindinews) July 10, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH उत्तर प्रदेश: भारी बारिश के बाद ढेला नदी का जलस्तर बढ़ने से मुरादाबाद के कई गांवों में बाढ़ जैसी स्थिति पैदा हो गई है जिसकी वजह से लोगों को दिक्कतों का सामना करना पड़ रहा है। (09.07) pic.twitter.com/fYHtbWG8ce
— ANI_HindiNews (@AHindinews) July 10, 2023#WATCH उत्तर प्रदेश: भारी बारिश के बाद ढेला नदी का जलस्तर बढ़ने से मुरादाबाद के कई गांवों में बाढ़ जैसी स्थिति पैदा हो गई है जिसकी वजह से लोगों को दिक्कतों का सामना करना पड़ रहा है। (09.07) pic.twitter.com/fYHtbWG8ce
— ANI_HindiNews (@AHindinews) July 10, 2023
उत्तराखंडमध्ये जम्मूमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार: ऋषिकेश-बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावरील गुलरजवळ उत्तराखंडमध्ये दरड कोसळल्याने एक जीप नदीत पडली. या अपघात तीन भाविक गंगेत बुडाले. बचाव पथकाकडून पाच जणांची सुटका करण्यात आली आहे. तर बुडालेल्या तिघांचा शोध सुरू आहे. तीन जणांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. केंद्रशासित प्रदेशातील पुंछ जिल्ह्यातील डोग्रा नाला ओलांडताना अचानक आलेल्या पुरात वाहून गेलेल्या दोन जवानांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. नद्यांनी धोक्याची पातडी ओलांडल्याने जम्मू-काश्मीरमधील कठुआ आणि सांबा जिल्ह्यांसाठी तसेच खालच्या पाणलोट क्षेत्रासाठी 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे.
हेही वाचा-