गुवाहाटी - गुवाहाटीमध्ये आमच्याकडे 200 हॉटेल्स आहेत. सर्व हॉटेलमध्ये पाहुणे आहेत. पूरस्थितीचे कारण सांगून पाहुण्यांना आम्ही काढून टाकू का?, असा सवाल मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी केला आहे. महाराष्ट्रात भाजप (बंडखोर शिवसेना आमदारांना) पाठिंबा देत आहेत. मी यात सहभागी होणार नाही असे सरमा यांनी स्पष्ट केले. ते एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत हेते.
बाहेरून आलेल्या प्रत्येकाला सुरक्षितता, आरामदायी मुक्काम देणे हे आमचे काम आहे. उद्या काँग्रेसचे लोक जरी आली तरी त्यांचे स्वागत करेन. मी कृतज्ञ आहे की शिवसेनेचे नेते आल. त्यांचीही स्वागतच आहे. त्यांनी पुराचे कारण सांगणे योग्य नाही असेही सरमा म्हणाले.
दुसरीकडे इथे बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या हालचालींना वेग आला आहे. त्यांच्या गटाचे नाव ठरले आहे. शिवसेना बाळासाहेब ठाकरे गट असे नाव ठेवले आहे. राज्यातील घडामोडी आता वाढणार आहेत. शिवसेनेकडून बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर आक्षेप घेण्याची शक्यता आहेत. शिवसेना राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक देखील सुरू होते या बैठकीत एकनाथ शिंदे यांच्या बाबत काय निर्णय होतो हे देखील पहावे लागेल.
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्या नंतर शिंदे गटाने आपली शिवसेनाहीच खरी शिवसेना आहे असा दावा केला. यासंदर्भात एकनाथ शिंदे विधानसभा उपाध्यक्ष यांना पत्र पाठवून आपला गट खरी शिवसेना असल्याची मान्यता मिळावी असा दावा करणार असल्याचे माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र शिंदे यांना निवडणूक चिन्ह धनुष्यबाण मिळणार का आणि शिवसेना पक्षाचे नाव मिळणार का याबाबत वेगवेगळ्या शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. या संदर्भात आता काय होणार हा औत्सुक्याचा विषय राहणार आहे .