ETV Bharat / bharat

Siachen road news : सियाचीनची वाट सोपी नाही, थंड आणि बर्फाळ रस्ते ठरत आहेत धोकादायक

भारतीय लष्कराच्या जवानांना शुक्रवारी सियाचीन ( Siachen road news ) येथे नेणारी बस खाली ( Army vehicle accident ladakh ) रस्त्यावरून श्योक नदीत पडली. लडाखमधील ( Ladakh bus accident news ) टुरटुक भागात घडलेल्या या घटनेत भारतीय लष्कराच्या 7 जवानांना वीर मरण आले, तर काही जवान जखमी झाले. या अपघाताने ( Army solder died ladakh ) लडखमधील धोकादायक रस्त्यांचा ( Siachen road accident ) प्रश्न ऐरणीवर आणला आहे.

Army vehicle accident ladakh
लष्कर बस अपघात लडाख
author img

By

Published : May 28, 2022, 10:03 AM IST

Updated : May 28, 2022, 10:48 AM IST

नवी दिल्ली - भारतीय लष्कराच्या जवानांना शुक्रवारी सियाचीन ( Siachen road news ) येथे नेणारी बस खाली ( Army vehicle accident ladakh ) रस्त्यावरून श्योक नदीत पडली. लडाखमधील ( Ladakh bus accident news ) टुरटुक भागात घडलेल्या या घटनेत भारतीय लष्कराच्या 7 जवानांना वीर मरण आले, तर काही जवान जखमी झाले. या अपघाताने ( Army solder died ladakh ) लडाखमधील धोकादायक रस्त्यांचा ( Siachen road accident ) प्रश्न ऐरणीवर आणला आहे. या भागात खाली श्योक नदी, तर दुसऱ्या बाजूला दगडी भिंत असल्याने वाट अत्यंत अवघड आहे.

हेही वाचा - भारतात टेलस्ला प्लांट उभारण्याची कोणतीही योजना नाही - एलोन मस्क

सियाचीन हे केवळ अत्यंत थंडीचे ठिकाण नाही, तर असंतुलित उंची असलेले दुर्मिळ ठिकाण आहे. येथे ऑक्सिजनची कमतरता आहे. उंच खडकांच्या काठावर धोकादायक आणि वळणदार रस्ते आहेत, जिथे छोटीशी चूक मोठ्या आपत्तीचे कारण ठारते.

शुक्रवारी सकाळी लष्कराच्या 26 सैनिकांना घेऊन जाणारे वाहन रस्त्यावरून नदीत पडले. बसमधील सैनिक मराठा रेजिमेंटचे होते ज्यात चार ज्यूनियर कमिशन्ड अधिकारी आणि 22 जवान होते. त्यांना जगातील सर्वात उंच युद्धभूमी सियाचीन येथे नेण्यात येत होते. मात्र, वाटेतच बसचा अपघात झाला. या घटनेनंतर पुन्हा एकदा सियाचीन येथील धोकादायक रस्त्यांचा प्रश्न समोर आला.

या अपघातात सात जवान जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला, तर 19 जणांना चंडीमंदिर येथील बेस हॉस्पिटलमध्ये एअरलिफ्ट करून दाखल करण्यात आले. या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जवानांनी भरलेली बस परतापूर येथील आर्मी ट्रान्झिट कॅम्पपासून 12 हजार फूट अंतरावर असलेल्या सियाचीनमधील सब-सेक्टर हनिफ येथील फॉरवर्ड लोकेशनकडे निघाली होती. लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. हे वाहन थॉईस या लष्कराच्या चौकीपासून आणि हवाई क्षेत्रापसून सुमारे 25 किमी अंतरावर असताना सुमारे 50-60 फूट खाली श्योक नदीत पडले.

लेहपासून वर उत्तरेकडील सीमावर्ती भागापर्यंतच्या रस्त्यावर नियमितपणे जीवघेणे अपघात होतात. यातून भारतीय सैन्य किती धोकादायक परिस्थितींचा सामना करत आहे हे लक्षात येते, असे लष्करी सेवेत असलेल्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ईटीव्ही भारतला ही माहिती दिली. माती अस्थिर असल्याने बनवलेले रस्ते सुरक्षित नाही. इतरांनाही गंभीर दुखापत झाल्याचे लष्कराने एका निवेदनात म्हटले आहे. जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा पुरविल्या जाव्यात यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

हेही वाचा - नातीचा विनयभंगप्रकरणी उत्तराखंडच्या माजी मंत्र्याची आत्महत्या, सुनेवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल

Last Updated : May 28, 2022, 10:48 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.