ETV Bharat / bharat

Ayodhya Ramlala Abhishek : रामलल्लाच्या अभिषेकासाठी 156 देशांतील नद्यांचे पाणी अयोध्येत पोहोचले - संघाचे प्रचारक इंद्रेश कुमार

23 एप्रिल रोजी अयोध्येतील रामजन्मभूमी संकुलात रामलल्लाचा अभिषेक होणार आहे. यासाठी 156 देशांतील नद्यांचे पवित्र जल अयोध्येत पोहोचले आहे. या कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित राहणार आहेत.

Ayodhya Ramlala Abhishek
156 देशांतील नद्यांचे पाणी अयोध्येत पोहोचले
author img

By

Published : Apr 22, 2023, 4:09 PM IST

156 देशांतील नद्यांचे पाणी अयोध्येत पोहोचले

अयोध्या (उत्तर प्रदेश) : अयोध्येच्या रामजन्मभूमी संकुलात रामलल्लाच्या जलाभिषेकासाठी 156 देशांतील नद्यांमधून आणलेले पवित्र पाणी शनिवारी अयोध्येत पोहोचले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक इंद्रेश कुमार यांच्या नेतृत्वाखालील पथक शनिवारी हे पाणी घेऊन कॅंट रेल्वे स्थानकावर पोहोचले. यावेळी पथकाचा ढोल - ताशांच्या गजरात सत्कार करण्यात आला. तसेच जय श्री रामच्या घोषणा देखील दिल्या गेल्या. रामलल्लाचा उद्या या पवित्र जलाने अभिषेक होणार आहे. या कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित राहणार आहेत. तसेच या कार्यक्रमाला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील उपस्थित राहू शकतात.

Ayodhya Ramlala Abhishek
संघाचे प्रचारक इंद्रेश कुमार यांच्या नेतृत्वाखालील पथक

156 देशांतील नद्यातून पाणी आणले : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ प्रचारक इंद्रेश कुमार यांनी सांगितले की, 156 देशांसह सात महाद्वीपातील नद्यांचे पवित्र पाणी अयोध्येत आणण्यात आले आहे. सुमारे सहा महिने विविध देशांतील नद्यांचे पाणी घेण्याचे काम सुरू होते. दिल्ली स्टडी ग्रुप या कार्यक्रमाचे आयोजन करत आहे. हिंदू देश असो, मुस्लिम देश असो की ख्रिश्चन देश, सर्व देशांतील नद्यांचे पाणी अयोध्येत आणले आहे. अगदी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या नद्यांच्या पाण्याचाही यात समावेश आहे. पाणी आणणाऱ्या टीममध्ये सुमारे 50 सदस्यांचा समावेश होता.

Ayodhya Ramlala Abhishek
पथकाचा ढोल - ताशांच्या गजरात सत्कार

उद्या होणार जलाभिषेक : विविध देशांतून आणलेल्या या पाण्याने रामलल्लाचा जलाभिषेक केला जाणार असल्याचे इंद्रेश कुमार यांनी सांगितले. रामलल्लाचा जलाभिषेक उद्या 23 एप्रिलला या पवित्र जलाने केला जाणार आहे. नवीन मंदिरात रामलल्लाची प्रतिष्ठापना करण्यापूर्वी अभिषेक कार्यक्रम करावा लागतो. यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हजेरी लावणार आहेत. याशिवाय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील सहभागी होऊ शकतात.

चार धाम यात्रेला सुरुवात : आज अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर उत्तराखंडमधील चार धाम यात्रेला सुरुवात झाली आहे. यमुनोत्री आणि गंगोत्रीच्या मंदिरांचे दरवाजे उघडल्यानंतर ही यात्रा सुरु होणार आहे. आज आधी गंगोत्री धामचे दरवाजे उघडले जातील, त्यानंतर यमुनोत्री धामचे दरवाजे उघडले जाणार आहेत.

हे ही वाचा : Chardham Yatra 2023: चारधाम यात्रा सुरू; अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर गंगोत्री आणि यमुनोत्री धामचे दरवाजे उघडणार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.