गाजियाबाद: वसीम रिजवी (Wasim Rizvi) यांनी धर्म स्विकारल्या नंतर बोलताना सांगितलेकी, मला इस्लाम मधुन बाहेर काढले आहे, दर शुक्रवारी माझ्यावर इनाम वाढवले जात आहेत, आज मी सनातन धर्म स्विकारत आहे. जर मला इस्लाम मधुन काढून टाकले आहे, तर मी कोणत्या धर्मात जावे हा माझ्या इच्छेचा विषय आहे. सनातन धर्म हा दुनियेतील सगळ्यात प्राचीन धर्म आहे. यात माणुसकी पहायला मिळते. जी दुसऱ्या धर्मात पहायला मिळत नाही.
पार्थिव स्मशान घाटावर जाळावे
काही दिवसांपुर्वी वसीम रिजवी (Wasim Rizvi) यांनी आपले इच्छापत्र सार्वजनीक केले होते, त्यात त्यांनी घोषित केले होते की माझ्या मरना नंतर माझा अंत्यसंस्कार हिंदू पद्धती व परंपरे प्रमाणे करण्यात यावा. महंत नरसिंहानंद सरस्वती हे माझ्या चितेला अग्नि देतील. काही लोक मला मारायला टपले आहेत. आणि त्यांनी घोषना केली आहे की, माझ्या मृत्यू नंतर माझ्या पार्थिवाला कोणत्याही कब्रस्तानात जागा दिली जाणार नाही. त्यामुळे माझे पार्थीव स्मशान घाटावर जाळण्यात यावे.
कायम चर्चेत असलेले मंदिर
गाजियाबाद चे डसना देवी मंदिर अनेक कारणामुळे चर्चेत असते. मंदिराचे महंत आपल्या विधानांमुळे कायम वादात येतात. महंत नरसिंहानंद सरस्वती यांनी काही दिवसांपुर्वी आरोप केला होता कि त्यांच्या जीवाला धोका आहे. मंदिरात काही लोक पकडले गेले तेव्हा त्यांनी मंदिरात एखादा मोठा गुन्हा करण्यासाठी हे लोक आल्याचे स्पष्ट केले होते. महंताचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, त्यात त्यांनी अधिकाऱ्यां विरोधात अपशब्द वापरले होते. काही दिवसांपुर्वी मंदिरात एका साधुचा खून झाला होता ज्याचा आत्तापर्यंत शोध लागलेला नाही.
हेही वाचा - ED Stopped Jacqueline Fernandez - जॅकलिन फर्नांडीसला ईडीने मुंबई विमानतळावरच थांबवले