पुणे: महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन ( MCA ) तर्फे ज्या एकोणीस वर्षाखालील महिलांच्या संघाकरिता खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. त्या खेळाडूंच्या निवडीमध्ये मोठा गोंधळा झाल्याचा आरोप केले जात आहेत. ज्या खेळाडूंनी या सिलेक्शन वेळी चांगला परफॉर्मन्स केला अशा खेळाडूंना डावलण्यात आल्याचा, आरोप वॉरियर्स क्रिकेट अकॅडमीचे ( Warriors Cricket Academy ) स्वप्नील मोडक यांनी पत्रकार परिषदेत केला ( Swapnil Modak accuses MCC ) आहे.
जेव्हा 19 वर्षाखालील संघाच्या सिलेशनसाठी ज्या मॅचेस झाल्या, त्यात जो स्कोर कार्ड बनवला जातो. तो स्कोर कार्ड देखील कोणाच्याही नजरेस पडला नाही. त्यामुळे कुठल्या खेळाडूचा परफॉर्मन्स कसा होता हे देखील साशंकच आहे. त्यासोबतच या खेळाडूंचं सिलेक्शन करताना भारतीय संविधानाच्या समानतेचा हक्क समितीने भंग केल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. तसेच जे खेळाडू कुठल्याही जिल्हा किंवा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या ( Maharashtra Cricket Association ) वतीने कुठलीही मॅच खेळली नाही, अशा देखील खेळाडूंना सिलेक्शन ट्रॅव्हलच्या कॅम्पसाठी संधी देण्यात आल्याचे देखील म्हंटले आहे. असे वॉरियर्स क्रिकेट अकॅडमीचे स्वप्नील मोडक यांनी सांगितले.
महिलांची 19 वर्षाखालील टीम निवडताना निवड समितीने चांगल्या खेळाडूंवर अन्याय केल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. आता या सगळ्यानंतर निवड समितीवर मोठे प्रश्न निर्माण होत आहेत. यात मुख्य म्हणजे एमसीएने ( MCAs team selection questioned ) खेळाडू नेमके कोणत्या निकषावर बोलावले गेले, हे स्पष्ट केले गेले पाहिजे. त्यासोबतच जे खेळाडू बोलवले गेले. त्यांना समान संधी का देण्यात आली नाही? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे निवड समितीने दिले पाहिजेत, असे यावेळी मोडक म्हणाले.
हेही वाचा - IND vs SA T20 Series : दुखापतग्रस्त बुमराहच्या जागी मोहम्मद सिराज भारतीय संघात दाखल