हरिद्वार (उत्तराखंड): ड्रामा क्वीन राखी सावंतने तिचा प्रियकर आदिलसोबत निकाह करण्यासाठी इस्लामचा स्वीकार केला आहे. यावरूनच आता श्री अखंड परशुराम आखाड्याने राखी सावंतला गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला आहे. आखाड्याचे अध्यक्ष पंडित अधीर कौशिक यांनी म्हणाले की, काही लोकांनी हिंदू धर्माविरोधात अजेंडा चालवला आहे, जो कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाऊ शकत नाही.
राखी झाली फातिमा: राखी सावंतने तिच्या प्रियकरासोबत गुपचूप लग्न केले आहे. यानंतर राखी सावंतने आदिल आणि तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर अपलोड केले. मागच्या वर्षी 29 मे 2022 रोजी राखीने आदिलसोबत गुपचूप लग्न केले. मात्र आता त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. खरंतर राखी सावंतने निकाह नामाचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात मॅरेज सर्टिफिकेटमध्ये तिच्या नावासोबत फातिमा लिहिले आहे. आता तिला राखी सावंत फातिमा म्हणण्यात येत आहे.
हिंदू धर्माच्या विरोधात अजेंडा: पंडित अधीर कौशिक यांनी राखी सावंतला इशारा दिला की, एकीकडे आम्ही लव्ह जिहादच्या विरोधात प्रचार करत आहोत आणि आमच्या मुलींना वाचवत आहोत. त्याचवेळी फिल्मिस्तानच्या काही लोकांनी हिंदू धर्माविरोधात अजेंडा चालवला आहे, जो आता खपवून घेतला जाणार नाही. राखी सावंत हिंदू धर्मात परतली नाही, तर परिणाम भोगायला तयार राहा, असा इशारा पंडित अधीर कौशिक यांनी दिला.
राखी सावंतचे पहिलेच लग्न: अभिनेत्री राखी सावंतने लग्न करण्याची ही पहिलीच आहे. राखी याआधी रितेश राजसोबत संबंधात होती. राखीने तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते मात्र तिने रितेशचा चेहरा दाखवला नव्हता. राखीने तिचा बॉयफ्रेंड रितेश देखील सलमान खानच्या रिअॅलिटी शो बिग बॉस सीझन 15 मध्ये होता. राखीने रितेशसोबतचे सर्व संबंध तोडले. रितेशनंतर राखी सावंत आदिलला डेट करत होती व तिने आता निकाह केला आहे.
राखी म्हणतेय मी खूप आनंदी: लग्नानंतर राखी सावंत सोशल मीडियावर आली आणि तिने तिचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले. यावर आता चित्रपट आणि टीव्ही जगतातील स्टार्स राखीला लग्नासाठी शुभेच्छा देत आहेत. सोशल मीडियावर आदिलसोबतचा व्हिडिओ शेअर करत राखीने लिहिले की, 'मी माझ्या वैवाहिक जीवनात आनंदी आहे आणि आदिलवर माझा पती या नात्याने खूप प्रेम आहे'. या व्हिडिओमध्ये राखी सावंत गुलाबी रंगाच्या सुंदर ड्रेसमध्ये तर आदिलने काळ्या रंगाचा सूट घातलेला दिसत आहे.
हेही वाचा : आदिल खानसोबत निकाह केल्यानंतर राखी सावंतने स्वीकारला इस्लाम नावातही केला बदल