नवी दिल्ली : ओटीटी प्लॅटफॉर्मवरील वाढत्या अश्लीलतेवर केंद्रीय माहिती प्रसारण आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, 'सरकार या विषयांवर खूप गंभीर आहे. आता सर्जनशीलतेच्या नावाखाली असभ्य भाषा खपवून घेतली जाणार नाही'.
-
क्रिएटिविटी के नाम पर गाली गलौज, असभ्यता बर्दाश्त नहीं की जा सकती।
— Anurag Thakur (@ianuragthakur) March 19, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
ओटीटी पर बढ़ते अश्लील कंटेंट की शिकायत पर सरकार गंभीर है।अगर इसको लेकर नियमों में कोई बदलाव करने की ज़रूरत पड़ी तो @MIB_India उस दिशा में भी पीछे नहीं हटेगा। अश्लीलता, गाली गलौज रोकने के लिए कड़ी कार्यवाई करेगा। pic.twitter.com/6pOL66s88L
">क्रिएटिविटी के नाम पर गाली गलौज, असभ्यता बर्दाश्त नहीं की जा सकती।
— Anurag Thakur (@ianuragthakur) March 19, 2023
ओटीटी पर बढ़ते अश्लील कंटेंट की शिकायत पर सरकार गंभीर है।अगर इसको लेकर नियमों में कोई बदलाव करने की ज़रूरत पड़ी तो @MIB_India उस दिशा में भी पीछे नहीं हटेगा। अश्लीलता, गाली गलौज रोकने के लिए कड़ी कार्यवाई करेगा। pic.twitter.com/6pOL66s88Lक्रिएटिविटी के नाम पर गाली गलौज, असभ्यता बर्दाश्त नहीं की जा सकती।
— Anurag Thakur (@ianuragthakur) March 19, 2023
ओटीटी पर बढ़ते अश्लील कंटेंट की शिकायत पर सरकार गंभीर है।अगर इसको लेकर नियमों में कोई बदलाव करने की ज़रूरत पड़ी तो @MIB_India उस दिशा में भी पीछे नहीं हटेगा। अश्लीलता, गाली गलौज रोकने के लिए कड़ी कार्यवाई करेगा। pic.twitter.com/6pOL66s88L
गरज भासल्यास आवश्यक बदल करणार : ते पुढे म्हणाले की, ओटीटी प्लॅटफॉर्मवर अपमानास्पद आणि अश्लील मजकूर वाढत असल्याच्या तक्रारींबाबतही सरकार गंभीर आहे. यासंदर्भात नियमांमध्ये काही बदल करण्याची गरज भासल्यास त्यावर विचार करण्याची मंत्रालयाची तयारी आहे. या व्यासपीठांना अश्लीलतेचे नव्हे तर सर्जनशीलतेचे स्वातंत्र्य दिले गेले. यावर आवश्यक ती कार्यवाही करण्याची गरज भासली तरी सरकार मागे हटणार नाही'.
'बहुतेक तक्रारी निर्मात्यांकडूनच सोडवल्या जातात' : अनुराग ठाकूर पुढे म्हणाले की, 'आत्तापर्यंतची प्रक्रिया अशी आहे की, निर्मात्याला प्रथम त्यांच्या स्तरावर आलेल्या तक्रारींचे निराकरण करावे लागते. 90 ते 92 टक्के तक्रारी त्यांच्याकडूनच आवश्यक बदल करून सोडवल्या जातात. तक्रार निवारणाची पुढील पातळी त्यांच्याकडून प्राप्त समर्थनावर अवलंबून असते. तेथे बहुतेक तक्रारींचे निराकरण केले जाते. शेवटच्या स्तरावर, प्रशासनाची आवश्यकता भासते. येथे विभागीय समिती स्तरावर नियमांनुसार कारवाई केली जाते. मात्र गेल्या काही दिवसांपासून कुठेतरी तक्रारी वाढू लागल्या असून विभागाकडून त्याची गंभीर दखल घेतली जात आहे. बदलाची गरज भासल्यास त्याचा गांभीर्याने विचार करण्याची आमची तयारी आहे'.
'बॉयकॉट ट्रेंड'चा निषेध : गेल्या महिन्यात अनुराग ठाकूर यांनी चित्रपटांना लक्ष्य करणाऱ्या 'बॉयकॉट ट्रेंड'चा निषेध केला होता. ते म्हणाले होते की, भारत 'सॉफ्ट पॉवर' म्हणून आपला प्रभाव वाढवण्यास उत्सुक आहे, मात्र अशा घटनांमुळे वातावरण बिघडते. ते म्हणाले की, जर कोणाला चित्रपटाबाबत काही समस्या असेल तर त्याची संबंधित सरकारी विभागाशी चर्चा करण्यात यावी. भारतीय चित्रपटांचा प्रभाव जगभरात आहे, याचा 'बॉयकॉट ट्रेंड' वाल्यांनी विचार करावा'.