ETV Bharat / bharat

बिहार निवडणूक : सीमांचलची 'आवाम' ठरवणार बिहारचा 'निजाम' - सीमांचल की जंग

बिहार विधानसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यात सीमांचल भागातील चार जिल्ह्यात मतदान पार पडत आहे. सत्ता स्थापनेसाठी प्रत्येक पक्षासाठी सीमांचल भाग निर्णायक ठरणार आहे.

बिहार निवडणूक
बिहार निवडणूक
author img

By

Published : Nov 7, 2020, 7:38 AM IST

पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीतील अंतिम टप्प्यातील मतदान आज (शनिवार) होत आहे. या अखेरच्या टप्प्यात होणारे मतदान सर्वच पक्षासाठी निर्णायक ठरणार आहे. सीमांचल मधील चार जिल्ह्यात मतदान पार पडत आहे. यामध्ये कटिहार, किशनगंज, पूर्णिया आणि अररिया विधानसभा क्षेत्र महत्वाचे मानले जात आहे. मुस्लीम बहुल असलेल्या या भागात मुस्लीम मतदार 19 जागांवरील उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहे.

नितीश कुमार
नितीश कुमार

एनडीएमध्ये मतभेद

सीएए-एनआरसीवरून जनता दल युनायटेड आणि भाजपामध्ये मतभेद असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. जे घुसखोर आहेत त्यांना देशातून हाकलून देणार असे वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योदी आदित्यनाथ यांनी केले होते. तर त्या विरूद्ध वक्तव्य मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केले. कोणालाही बिहारमधुन बाहेर जावे लागणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

औवेसी भाजपाची 'बी' टीम - काँग्रेस

एमआयएमला काँग्रेसने भाजपाची बी टीम म्हटले आहे. जेव्हा नरेंद्र मोदींनी पराभवाची चिन्हे दिसतात तेव्हा ते हिंदू-मुस्ली वाद पेटवतात आणि औवेसींनी जातीय ध्रुवीकरणासाठी मैदानात उतरवतात, असा आरोप काँग्रेसने केला आहे. तसेच रणदीप सुरजेवालांनी म्हटले की, तेलंगाणात केवळ दोन जागांवर निवडणूक लढणारे औवेसी बिहारमध्ये 24 जागांवर उमेदवार लढवत आहे. सुरजेवालांनी औवेसींना भाजपाचा पोपट असल्याचं म्हटले आहे.

काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला
काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला

औवेसी ठरणार 'किंग मेकर'

सीमांचल भागात मुस्लीम मतदारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे असदुद्दीन औवेसींनी केलेला प्रचार याठिकाणी महत्त्वाचा ठरणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सीएए-एनआरसीचा विषय सभेत काढला. त्यावरून औवेंसींनी त्यांना धारेवर धरले. या मुद्दांवरून मुस्लीमांचे मतदान आपल्याकडे वळवण्याच्या प्रयत्नांना औवेसी आहे.

असदुद्दीन औवेंसी
असदुद्दीन औवेंसी

तेजस्वी यादव यांची भूमिका

सीमांचल भागात सीएए-एनआरसी विषयाला तेजस्वी यादव यांनी अप्रत्यक्षपणे हात घातला आहे. संपूर्ण प्रचारात तेजस्वीने नितीश कुमार आणि भाजपावर हल्ला चढविला आहे. नितीश कुमार आणि भाजपा आरएसएसच्या हातचे बाहूले असल्याची टीका तेजस्वी यादव यांनी किशनगंज प्रचार सभेत केली. सीएए-एनआरसीच्या माध्यमातून काही विशिष्ठ वर्गाला लक्ष्य केले जात असल्याचेही त्यांनी सुचित केले आहे.

तेजस्वी यादव

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.