ETV Bharat / bharat

...अजब तुझे सरकार; अभिनेत्यावर कारवाई, नेत्याला सूट? - MLA Ravi Rana driving without helmet

सध्या सोशल मीडियावर दोन व्हिडिओ व्हायरल होत आहेत. एक अभिनेता विवेक ओबेरॉय आणि त्याच्या पत्नीचा व दुसरा आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांचा. दोन्ही दाम्पत्य दुचाकीवरून फेरफटका मारताना दिसत आहेत.

Rana And Oberoi Couple
राणा आणि ओबेरॉय दाम्पत्य
author img

By

Published : Feb 20, 2021, 1:06 PM IST

Updated : Feb 20, 2021, 6:50 PM IST

मुंबई - मुंबई वाहतूक पोलिसांनी बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयविरुद्ध कारवाई केली आहे. हेल्मेट न घालता दुचाकी चालविल्याबद्दल विवेक ऑबेरॉयला दंड ठोठावण्यात आला आहे. विवेक प्रमाणेच आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा आपल्या गाडीवरून फिरत होते. त्यांनी देखील हेल्मेट घातलेले नव्हते. मात्र, त्यांच्यावर अद्याप कुठलीही कारवाई झाली नाही. त्यामुळे या प्रकरणात एकाला वेगळा न्याय आणि दुसऱ्याला वेगळा न्याय, अशी चर्चा होताना दिसत आहे.

नियम मोडत राणा दाम्पत्याचा फेरफटका -

अमरावती जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रत्येकाला मास्क वापरणे गरजेचे आहे. पोलिसांनी प्रत्येक दुचाकी स्वाराला मास्क आणि हेल्मेट वापरणे बंधनकारक केले आहे. मात्र, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी मात्र कोरोनाचे नियम पायदळी तुडवल्याचे चित्र समोर आले आहे. राणा दामपत्याने विना मास्क व विना हेल्मेट अमरावतीत बुलटेवरून फेरफटका मारल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मास्क न वापरणाऱ्या वाहन चालकांवर पोलीस कारवाई करत असताना आता पोलीस राणा दाम्पत्यावर कारवाई करणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

गाडीवर फिरताना राणा आणि ओबेरॉय दाम्पत्य

विवेकवर झाली कारवाई -

अशाच प्रकारे अभिनेता विवेक ओबेरॉयने १४ फेब्रुवारी रोजी स्वत: च्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला होता. यात तो हेल्मेट आणि मास्कशिवाय दुचाकी चालवत होता. यावरून विवेकविरुध्द कलम १८८, २६९ मोटार वाहन कायद्याच्या कलम १२९, १७७ आणि एपेडिक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी जुहू पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

विवेक ओबेरॉयने मानले पोलिसांचे आभार

दरम्यान विवेक ओबेरॉय याने हेल्मेट न घालता दुचाकीवरून प्रवास केल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती. याबद्दल विवेक ओबेरॉय याने पोलिसांचे आभार व्यक्त करणारे एक ट्विट केले आहे. त्यामध्ये विवेकने म्हटले आहे की, मी मुंबईमध्ये माझ्या दुचाकीवरून हेल्मेट न घालता प्रवास करत होतो, त्यामुळे मुंबई पोलिसांनी मला दंड केला. मी मुंबई पोलिसांचे आभार मानतो की, त्यांनी मला माझ्या सुरक्षेची जाणीव करून दिली. धन्यवाद मुंबई पोलीस, असे ट्विट त्याने केले आहे.

  • Pyaar humein kis mod pe le aaya!Nikle they nayi bike par hum aur hamari jaan, bina helmet ke kat gaya chalaan!Riding without a helmet?Mumbai police will do a checkmate!Thank u @mumbaipolice for making me realise that safety is always most important. Be safe,Wear a helmet & a mask

    — Vivek Anand Oberoi (@vivekoberoi) February 20, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

Last Updated : Feb 20, 2021, 6:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.