मुंबई: टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली ( Star batsman Virat Kohli ) सध्या क्रिकेटमधून विश्रांतीचा आनंद घेत आहे. शनिवारी विराट कोहली मड आयलंडमध्ये ( Mud Island in Mumbai ) एका प्रोजेक्टच्या शूटिंगनंतर पत्नी अनुष्का शर्मासोबत स्कूटी चालवताना ( Virat kohli and Anushka sharma scooter video ) दिसला. विरुष्काने तिच्या प्रवासादरम्यान रस्ता सुरक्षा नियमांचे पालन केले आणि दोघेही हेल्मेट घातलेले दिसले. विराट कोहली आणि अनुष्का शर्माचा हा बाईक रायडींगचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ ( Virat kohli scooter ride video viral ) आणि फोटोंमध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्मा ( Actress Anushka Sharma ) यांनी काळे हेल्मेट घातले आहे. विराट कोहली स्कूटी चालवत असताना अनुष्का शर्मा त्याच्या मागे बसली आहे. अनुष्का पूर्णपणे ब्लॅक आउटफिटमध्ये दिसत आहे. दुसरीकडे, किंग कोहलीने पांढऱ्या स्नीकर्ससह हिरवा शर्ट आणि काळी जीन्स घातली होती.
विराट कोहली सध्या त्याच्या कारकिर्दीच्या वाईट टप्प्यातून जात ( Virat Kohli Out of Form ) असून त्याला शेवटचे शतक झळकावून ( virat kohli century drought ) एक हजार दिवस उलटले आहेत. विराट कोहलीचे शेवटचे ( Virat Kohli Last Century )आंतरराष्ट्रीय शतक 23 नोव्हेंबर 2019 रोजी आले होते. त्यानंतर बांगलादेशविरुद्धच्या कोलकाता कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी त्याने 136 धावा केल्या. आंतरराष्ट्रीय स्तरावर कोहलीचे हे 70 वे शतक होते.
-
#ViratKohli𓃵 #AnushkaSharma spotted in bike 💃📷🛵 @viralbhayani77 pic.twitter.com/kkKWs3ZB1e
— Viral Bhayani (@viralbhayani77) August 20, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#ViratKohli𓃵 #AnushkaSharma spotted in bike 💃📷🛵 @viralbhayani77 pic.twitter.com/kkKWs3ZB1e
— Viral Bhayani (@viralbhayani77) August 20, 2022#ViratKohli𓃵 #AnushkaSharma spotted in bike 💃📷🛵 @viralbhayani77 pic.twitter.com/kkKWs3ZB1e
— Viral Bhayani (@viralbhayani77) August 20, 2022
विराट कोहलीचा ( Virat Kohlis cover drive ) गेल्या 2-3 वर्षात बाद होण्याचा पॅटर्न अगदी सारखाच आहे. अनेक प्रसंगी कोहली ऑफ स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर बाद झाला आहे. विशेषत: कव्हर ड्राईव्ह खेळताना तो त्याला खुप भारी पडला आहे. विराट कोहलीने अशा फटक्यांवर खूप धावा केल्या आहेत, पण जेव्हा फॉर्म खराब असतो तेव्हा खेळाडू चुका करतो.
आशिया कपमध्ये कोहलीकडून खुप अपेक्षा -
वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी विराट कोहलीला विश्रांती ( Rest for Virat Kohli ) देण्यात आली होती. तसेच सध्याच्या झिम्बाब्वे दौऱ्यावरही तो संघाचा भाग नाही. आता कोहली थेट आशिया कपच्या ( Asia cup 2022 ) माध्यमातून संघात प्रवेश करेल. आशिया चषक या महिन्याच्या 27 तारखेपासून सुरू होत असून 11 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. त्या स्पर्धेत भारताला पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळायचा आहे.