नालंदा: बिहारमधील नालंदा येथे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला वाढदिवसाच्या अनोख्या पद्धतीने शुभेच्छा देण्यात आल्या. (Virat Kohli Birthday). यावेळी 'बिहारच्या विराट कोहली'ने (virat kohli of bihar) केक कापून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत! हा 'बिहारचा विराट कोहली' नालंदामध्ये राहतो. वास्तविक, तो भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली नसून बिहारमधील नालंदा मुख्यालय असलेल्या बिहार शरीफ येथे राहणारा मुशर्रफ आझम (Musharraf Azam) आहे. त्याचा चेहरा हुबेहूब विराट कोहलीसारखा आहे. त्याच्या उंची आणि दिसण्यामुळे लोक त्याला विराट कोहली म्हणतात.
बिहार शरीफमध्ये राहणारा विराटचा लूक: बिहार शरीफ (नालंदा) येथे राहणारा मुशर्रफ आझम याला याची माहिती तेव्हा मिळाली जेव्हा लोक त्याला विराट कोहली असे म्हणू लागले. कपड्यांचा व्यवसाय करणारा मुशर्रफ आझम सांगतो की, तो एकदा कोलकात्यात आयपीएल मॅच पाहायला गेला होता. यावेळी तो प्रेक्षक गॅलरीत होता. त्यानंतर लोक त्याला पाहून कोहली म्हणून ओरडू लागले आणि जवळ येऊन सेल्फीही घेऊ लागले. त्याला तेथून बाहेर पडणेही कठीण झाले होते. त्यानंतर त्याने विराट कोहलीप्रमाणे दाढी आणि केशरचना ठेवण्यास सुरुवात केली. यानंतर लोक त्याला विराट समजून भेटण्यासाठी स्पर्धा करू लागले.
कोहलीच समजून अनेक लोक ऑटोग्राफ आणि सेल्फी घेतात: खरे तर मुशर्रफ यालाही लहानपणापासूनच क्रिकेटची आवड आहे. त्याची उंची देखील विराट कोहली एवढीच आहे. तो जिथे जिथे मॅच खेळायला जातो तिथे लोक त्यांना दुसरा विराट कोहली म्हणतात. मुशर्रफ दिवंगत हाजी मोहम्मद असमत ह्यांचा मोठा मुलगा आहे. वडिलांच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी मुशर्रफ याच्यावर आली आहे. त्याला दोन बहिणी आणि दोन भाऊ आहेत. विराटच्या लूकमुळे मुशर्रफ सोशल मीडियावर लोकप्रिय होत आहे. मुशर्रफ म्हणतो की, त्याला विराट कोहलीला भेटायचे आहे.
सोशल मीडियावरही लोकप्रिय: लोक मुशर्रफ याला विराट कोहलीची कॉपी म्हणतात. त्याच्या उंचीपासून दाढी आणि केशरचनापर्यंत तो विराट कोहलीसारखाच आहे. विराटच्या लूक लाइकमुळे तो सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय होतो आहे. फेसबुकवर त्याला रोज अनेक कमेंट्स येत आहेत. मुशर्रफ म्हणतो की, जेव्हा तो फेसबुकवर फोटो आणि व्हिडिओ शेअर करायचा तेव्हा लोक त्याची तुलना विराट कोहलीसोबत करायचे. मुशर्रफ म्हणतो की तो विराट कोहलीची कॉपी करत नाहीत. पण तो त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा चाहता आहे.
मुशर्रफलाही क्रिकेटची आवड: मुशर्रफचा चेहरा विराटशी कितपत साम्य आहे यावरून त्याला देखील चांगला खेळाडू बनण्याची इच्छा आहे याचा अंदाज लावता येतो. मुशर्रफ याने विराट कोहलीला भेटून स्वत: एक चांगला खेळाडू बनून केवळ आपल्या जिल्ह्याचेच नव्हे तर देशाचे नाव कमावण्याची इच्छा बाळगली आहे. मुशर्रफ याची आई बिल्किस बानो यांना देखील क्रिकेटची आवड आहे. त्यांनाही आपल्या मुलाने विराटसारखा चांगला खेळाडू बनून आपल्या कुटुंबाचे नाव रोशन करावे अशी इच्छा आहे.
विराट कोहलीमुळे खूप काही मिळते: वडिलांच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंबाचा भार मुशर्रफ वर आला आहे. त्याला दोन बहिणी आणि दोन भाऊ आहेत. एक छोटेसे रेडिमेड दुकान चालवून आई स्वतःचा व कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवते. या कथेचा एक पैलू असाही आहे की, विराटचे वडीलही आता या जगात नाहीत आणि मुशर्रफ याच्या वडिलांनीही जगाचा निरोप घेतला आहे.
"आज विराट कोहलीचा वाढदिवस आहे. मला मात्र आज माझा वाढदिवस असल्यासारखे वाटत आहे. आज आम्ही विराट कोहलीला केक कापून वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ. त्याच्या वाढदिवसानिमित्त आम्ही वेगळा कार्यक्रम करत आहोत. मला सांगायचे आहे की विराटने शतक ठोकले तर ती संपूर्ण देशासाठी आनंदाची बाब असेल” - मुशर्रफ आझम