हुघळी (पश्चिम बंगाल) : पश्चिम बंगालच्या हुघळीत भाजपच्या शोभा यात्रेदरम्यान प्रचंड गोंधळ आणि दगडफेक झाली. या मिरवणुकीत भाजप नेते दिलीप घोषही सहभागी झाले होते. मिरवणुकीदरम्यान दोन्ही पक्षांमध्ये जोरदार हाणामारी झाली. त्यानंतर दगडफेक आणि जाळपोळ झाली.
-
#WATCH | West Bengal: Ruckus and stone pelting erupt during the BJP Shobha yatra in Hooghly pic.twitter.com/fbRdsGRkNT
— ANI (@ANI) April 2, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | West Bengal: Ruckus and stone pelting erupt during the BJP Shobha yatra in Hooghly pic.twitter.com/fbRdsGRkNT
— ANI (@ANI) April 2, 2023#WATCH | West Bengal: Ruckus and stone pelting erupt during the BJP Shobha yatra in Hooghly pic.twitter.com/fbRdsGRkNT
— ANI (@ANI) April 2, 2023
वाहनांची तोडफोड : एएनआय या वृत्तसंस्थेने हुगळीत भाजपने आयोजित केलेल्या शोभा यात्रेदरम्यान झालेल्या गोंधळ आणि दगडफेकीचा व्हिडिओही शेअर केला आहे. शोभा यात्रेत महिला आणि लहान मुलांना लक्ष्य करून दगडफेक करण्यात आल्याचा आरोप भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप घोष यांनी केला. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील टीएमसी सरकारवर निशाणा साधत घोष म्हणाले, हावडा हिंसाचारानंतरही राज्य सरकार कोणतीही कारवाई करत नाही. दगडफेक आणि वाहनांची तोडफोड केली जात आहे.
हावडामध्ये परिस्थिती सामान्य होत आहे : यापूर्वी रामनवमी मिरवणुकीदरम्यान गुरुवारी हावडा जिल्ह्यात हिंसाचार झाला होता. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, हावडामधील शिबपूर आणि काजीपारा भागात जीवन पूर्वपदावर येत आहे जेथे राम नवमीच्या मिरवणुकीत संघर्ष झाला होता. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, प्रतिबंधात्मक आदेश असूनही रविवारी बाजारपेठ खुली राहिली आणि वाहने रस्त्यावर धावत राहिली.
-
West Bengal | State govt suspends internet services in Hooghly district after the clashes during BJP Shobha yatra pic.twitter.com/K3G05HCOFm
— ANI (@ANI) April 2, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">West Bengal | State govt suspends internet services in Hooghly district after the clashes during BJP Shobha yatra pic.twitter.com/K3G05HCOFm
— ANI (@ANI) April 2, 2023West Bengal | State govt suspends internet services in Hooghly district after the clashes during BJP Shobha yatra pic.twitter.com/K3G05HCOFm
— ANI (@ANI) April 2, 2023
सध्या पोलिसांचा बंदोबस्त कायम : परिस्थितीची पाहणी केल्यानंतर परिसरातील इंटरनेट सेवांचे निलंबन मागे घेण्याचा निर्णय घेतला जाईल. परिस्थिती सामान्य असून गेल्या २४ तासांत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही. तथापि, आम्ही प्रतिबंधात्मक आदेश चालू ठेवू आणि इंटरनेट सेवेवरील निलंबन उठवण्याबाबत नंतर निर्णय घेतला जाईल असही ते म्हणाले आहेत. आयपीएस अधिकारी म्हणाले, की सध्या पोलिसांचा बंदोबस्त कायम राहणार आहे.
हिंसाचारामागे भाजप आणि इतर उजव्या संघटनांचा हात असल्याचा आरोप हिंसाचारात अनेक दुकानांची तोडफोड करण्यात आली. तर, काही पोलिसांच्या वाहनांसह अनेक गाड्या जाळण्यात आल्या आहेत. शुक्रवारी दुपारी या भागात तैनात असलेल्या पोलिसांवर दगडफेक करण्यात आली आहे. त्यानंतर परिसरात मनाई आदेश लागू करण्यात आले आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी रामनवमीच्या मिरवणुकीत हावडा येथील काजीपारा भागात झालेल्या हिंसाचारामागे भाजप आणि इतर उजव्या संघटनांचा हात असल्याचा आरोप केला आहे.
एनआयए चौकशी करण्याची मागणी : भाजपने बॅनर्जींचे आरोप फेटाळले आणि त्याऐवजी या प्रकरणाची एनआयए चौकशी करण्याची मागणी केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांच्याशी हावडा येथील रामनवमी मिरवणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचाराबद्दल बोलून परिस्थितीचा आढावा घेतला. यासंदर्भात शहा यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुकांत मुझुमदार यांच्याशीही चर्चा केली होती.
हेही वाचा : Arvind Kejriwal: भारतासारख्या महान देशाला सुशिक्षित पंतप्रधानाची गरज -केजरीवाल