ETV Bharat / bharat

कोरोना माता मंदिर पाडले...!!! मास्क लावून झाली स्थापना, दररोज केली जात होती पूजा

प्रतापगढच्या जुही शुक्लपूरमध्ये कोरोनामुळे तीन लोकांचा मृत्यू झाल्याने, गावात कोरोना मातेचे मंदिर बांधले आहे. या मंदिरात कोरोना मातेचा मास्क लावून मूर्तीची स्थापना करत आहेत. असे केल्यास, त्यांच्या गावात कोरोना पसरणार नाही, अशी त्यांची श्रध्दा आहे.

CORONA MATA
कोरोना मातेचे मंदिर
author img

By

Published : Jun 12, 2021, 2:18 PM IST

Updated : Jun 12, 2021, 6:54 PM IST

प्रतापगढ - कोरोना संकटकाळापासून वाचण्यासाठी लोक आता औषधे आणि भक्तीच्या मार्गाचा अवलंब करायला लागले आहेत. प्रतापगढच्या सांगीपूरमध्ये जुही शुक्लपूर गावात कोरोनाला हरवण्यासाठी गावकऱ्यांनी कोरोना मातेचे मंदिर बांधले आहे. या मंदिरात कोरोना मातेचा मास्क लावून मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. सर्व गावकरी कोरोना मातेची विधीवत पूजाअर्चा करत आहेत. असे केल्यास, त्यांच्या गावात कोरोना पसरणार नाही, अशी त्यांची श्रध्दा आहे. दरम्यान, आता स्थानिक प्रशासनाने कोरोना मातेचे हे मंदिर पाडले आहे. जागेचा वाद झाल्याने प्रशासनाने या मंदिरावर कारवाई केली असल्याची माहिती आहे.

VILLAGER WORSHIPPING CORONA MATA
कोरोना मातेचे मंदिर

कोरोनामुळे तीन मृत्यू झाल्याने मूर्तीची स्थापना

सांगीपूरच्या जुही शुक्लपूर गावात कोरोनामुळे तीन लोकांचा मृत्यू झाल्याने गावकरी अतिशय घाबरले. यानंतर गावातील लोकेश श्रीवास्तवने सांगितल्यानुसार त्यांनी पैसे गोळा करून ७ जूनला कोरोना मातेची मूर्ती स्थापना केली. खास लोकाग्रहास्तव तयार केलेल्या कोरोना माताची मूर्ती लिंबाच्या झाडाखाली त्याची स्थापना केली. त्याला कोरोना मातेचे नाव दिले. गावातील पूर्वजांनी कांजिण्यांना शीतळा देवीचे रुप मानले होते. आणि कोरोनाही त्याचे देवीचे रुप आहे, अशी त्यांची श्रध्दा आहे.

गावकऱ्यांनी उभारले कोरोना मातेचे मंदिर

दूरवरून कोरोना माताच्या दर्शनासाठी गर्दी

गावकऱ्यांनी कोरोनापासून वाचण्यासाठी कोरोना माताच्या मूर्तीची स्थापना केली आहे. या कोरोना मातेच्या दर्शनासाठी दूरवरून लोक येत आहेत. तसेच या देवीची भक्तीभावाने पूजा करतानाही दिसत आहेत. गावकरी अगरबत्ती लावून तसेच प्रसाद अर्पण करत कोरोना मातेची पूजा करत आहे.

गावकऱ्यांची श्रध्दा

अनेक लोक याला अंधश्रध्दा मानत असल्याचे गावकऱ्याचे म्हणणे आहे. मात्र, मास्क तसेच हात धुताना देवीची प्रतिमेमुळे भक्तांमध्ये कोरोनाविषयक जनजागृती होत असल्याचेही ते मानतात.

मंदिर बनले चर्चेचा विषय

प्रतापगढच्या जुही शुक्लपूर गावात कोरोनामुळे पसरलेला अंधविश्वास सर्वांच्याच चर्चेचा विषय बनला आहे. मात्र, याविरोधात पोलीस आणि स्थानिक प्रशासनही ठोस पावले घेताना दिसत नाही.

हेही वाचा - मुकुल रॉय यांची घरवापसी, मोदींना "तलाक" तर ममतांपुढे "नतमस्तक"

Last Updated : Jun 12, 2021, 6:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.