नवी दिल्ली : टोयोटा किर्लोस्कर मोटरचे उपाध्यक्ष विक्रम एस. किर्लोस्कर यांचे ( Vikram S Kirloskar passes away ) मंगळवारी वयाच्या ६४ व्या वर्षी निधन झाले. 29 नोव्हेंबर 2022 रोजी टोयोटा किर्लोस्कर मोटरचे उपाध्यक्ष विक्रम एस. किर्लोस्कर यांचे अकाली निधन झाल्याची माहिती कंपनीद्वारे देण्यात आली आहे.
टोयोटो कंपनीने निवदेनात म्हटले की, या दु:खाच्या वेळी, सर्वांनी त्यांच्या आत्म्याला शांती लाभो ही प्रार्थना करावी अशी आम्ही विनंती करतो. आम्ही त्यांच्या कुटुंबियांना आणि मित्रांना आमच्या मनापासून सहानुभूती देतो. 30 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी 1 वाजता हेब्बल स्मशानभूमी, बंगळुरू येथे अंतिम श्रद्धांजली अर्पण केली जाऊ शकते. विक्रम एस. किर्लोस्कर हे १८८८ मध्ये सुरू झालेल्या किर्लोस्कर समूहाचे चौथ्या पिढीतील सदस्य होते. किर्लोस्कर समूह पंप, इंजिन आणि कंप्रेसर आणि इतर संबंधित उत्पादने तयार करतो. 2019-20 मध्ये ते भारतीय उद्योग महासंघाचे अध्यक्ष होते.
टोयोटा कार भारतात केली लोकप्रिय विक्रम किर्लोस्कर यांना ( Vikram S Kirloskar bio ) हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. त्यांच्या पश्चात पत्नी गीतांजली किर्लोस्कर आणि मुलगी मानसी किर्लोस्कर असा परिवार आहे. टोयोटा कार भारतात लोकप्रिय करण्याचे श्रेय त्यांनाच जाते. आपल्या कार्यकुशल ( who was Vikram S Kirloskar ) नेतृत्वाने त्यांनी टोयोटाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. विक्रम किर्लोस्कर यांनी 'एमआयटी'मधून मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतली होती. त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले. विक्रम किर्लोस्कर हे किर्लोस्कर समूहाच्या चौथ्या पिढीचे प्रमुख होते. ते किर्लोस्कर सिस्टम्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकही होते. तसेच टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रायव्हेट लिमिटेडचे ते उपाध्यक्ष होते