नवी दिल्ली : स्वत:ला धार्मिक गुरू म्हणवणाऱ्या स्वामी नित्यानंद यांच्या शिष्या विजयप्रिया नित्यानंद सध्या चर्चेत आहेत. त्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले आहेत. यामध्ये ती जगातील इतर देशांच्या प्रतिनिधींसोबत दिसत आहे. शेवटी विजयप्रिया कोण आहे ? आणि तिचा नित्यानंदशी काय संबंध आहे ? आणि ती युनायटेड नेशन्समध्ये काय करत आहे ?, सर्व काही जाणून घेऊया पुढील माहितीच्या माध्यमातुन.
नित्यानंद तामिळनाडूचा रहिवासी : विजयप्रिया नित्यानंद स्वत: ला स्वामी नित्यानंद यांच्या शिष्य असल्याचे सांगतात. वास्तविक, स्वामी नित्यानंद यांनी काही वर्षांपूर्वी 'द युनायटेड नेशन कैलास' नावाने स्वतंत्र देश स्थापन करण्याचा दावा केला होता. त्यांनी कथितरित्या ते हिंदू राष्ट्र घोषित केले. कैलासा हे इक्वेडोर जवळ स्थित एक बेट आहे. नित्यानंद यांनी हे बेट विकत घेतल्याचा दावा केला आहे. ते हिंदूंचे रक्षण करतात असा त्यांचा दावा आहे. कैलासाविषयी सोशल मीडियावर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार तेथे तमिळ, इंग्रजी आणि संस्कृत भाषा बोलल्या जातात. त्यांनी राष्ट्रीय प्राणी नंदी, राष्ट्रीय फूल कमळ, राष्ट्रीय वृक्ष बनियान आणि राष्ट्रीय ध्वज ऋषभ ध्वज असे नाव दिले आहे. नित्यानंद हा तोच व्यक्ती आहे, ज्यावर बलात्काराचा आरोप होता. यानंतर 2019 मध्ये नित्यानंद भारतातून पळून गेला. तो मूळचा तामिळनाडूचा आहे.
विजयप्रिया कैलासाची प्रतिनिधी! : विजयप्रिया यांचा दावा आहे की, ती कैलासाची प्रतिनिधी म्हणून संयुक्त राष्ट्रात आहे. त्यांनी स्वतःला कैलासाचा स्थायी प्रतिनिधी म्हणून वर्णन केले आहे. त्या जिनिव्हा येथे एका बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आल्या होत्या. UN च्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हक्क समितीच्या बैठकीत त्यांनी भाग घेतला. यावेळी त्यांनी नित्यानंद यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही केला. विजयप्रिया या खरोखरच कैलासाच्या स्थायी प्रतिनिधी आहेत का, असा प्रश्न संयुक्त राष्ट्राला विचारण्यात आला असता, यूएनने ही बातमी चुकीची असल्याचे म्हटले आहे. यूएनच्या दस्तऐवजानुसार, विजयप्रिया एका एनजीओच्या प्रतिनिधी म्हणून बैठकीला हजर राहण्यासाठी आल्या होत्या. संयुक्त राष्ट्र संघानेही कैलासला देश म्हणून मान्यता दिली नसल्याचे स्पष्ट केले आहे.
उच्चशिक्षित विजयप्रिया : विजयप्रियाचे फोटो बघितले तर तिच्या हातावर टॅटू आहे. तो टॅटू नित्यानंदचा आहे. सोशल मीडियावर उपलब्ध असलेल्या प्रोफाइलनुसार, विजयप्रियाने अमेरिकेतील मॅनिटोबा विद्यापीठातून बीएससी केले आहे. विजयप्रिया यांना हिंदी, इंग्रजी, क्रेओल आणि पिडगिन भाषा अवगत असल्याचेही त्यात लिहिले आहे.
नित्यानंद यांच्यावर शोषणाचा आरोप : स्वामी नित्यानंद यांच्यावर अनेकदा गंभीर आरोप झाले आहेत. 2010 मध्ये नित्यानंद यांची एक व्हिडिओ टेप समोर आली होती. यामध्ये ते एका अभिनेत्रीसोबत दिसले होते. जेव्हा वाद वाढला तेव्हा नित्यानंदने सांगितले की, ते नपुंसक आहे आणि त्यावेळी ते अभिनेत्रीला योग शिकवत होते. या प्रकरणी हिमाचल प्रदेशातील सोलन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्यांना अटकही झाली, नंतर त्याला जामीन मिळाला. अमेरिकन वंशाच्या एका महिलेनेही नित्यानंद यांच्यावर शोषणाचा आरोप केला होता.
हेही वाचा : Nikki Haley Bashes Pakistan : अमेरिकेला 'जगाचे एटीएम' बनू देणार नाही - निक्की हॅली