ETV Bharat / bharat

विजया नाईक यांच्यावर गुरुवारी होणार अंतिम संस्कार

author img

By

Published : Jan 13, 2021, 5:17 PM IST

आयुष आणि संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या पत्नी विजया यांचा सोमवारी अपघाती मृत्यू झाला. यांच्या पार्थिवावर गुरुवार (दि. 14 जानेवारी) आडपई (ता. फोंडा) येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.

Vijaya Naik will be cremated on Thursday

पणजी - आयुष आणि संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या पत्नी विजया यांचा सोमवारी अपघाती मृत्यू झाला. यांच्या पार्थिवावर गुरुवार (दि. 14 जानेवारी) आडपई (ता. फोंडा) येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.

सोमवारी गोकर्ण नजीक हिल्लूर-होसकांबी गावात झालेल्या भीषण अपघातात विजया यांचा मृत्यू झाला. त्यांच्या सोबत असलेले आयुष श्रीपाद नाईक जखमी झाले. त्यांच्यावर गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात (गोमेकॉ) उपचार सुरू आहेत.

गुरुवारी सकाळी 8 ते 9 या दरम्यान अंतिम दर्शनासाठी विजया नाईक यांचे पार्थिव त्यांच्या सापेंद्र-रायबंदर येथील निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी, आडपई येथे नेण्यात येईल. सकाळी 9.30 ते 12 पर्यंत लोकांना अंतिम दर्शन घेता येईल. त्यानंतर दुपारी 1 वाजता तेथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येतील.

त्यांच्या पश्चात पती आयुषमंत्री नाईक, मुलगे सिद्धेश, साईश व योगेश, सूना अनुक्रमे स्वनुपा, प्रतीक्षा व ॲड. अदिती आणि नातवंडे अयंश, आयूष व पार्थवी असा परिवार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.