उत्तरकाशी (उत्तराखंड) Uttarkashi Silkyara Tunnel Collapse : 10 दिवसांनंतर आज (21 नोव्हेंबर) पहिल्यांदाच उत्तरकाशी सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या कामगारांचा व्हिडिओ देशासमोर आलाय. सोमवारी (20 नोव्हेंबर) रात्री उशिरा सिलक्यारा बोगद्यात अन्न, औषधं आणि ऑक्सिजनसाठी 6 इंच रुंद 57 मीटर लांबीचा पाईप टाकण्यात आला. त्याच पाईपमधून एन्डोस्कोपिक कॅमेराही आत पाठवण्यात आला होता, ज्यातून आज सकाळी बोगद्यातले पहिले फुटेज समोर आले आहे. सर्व 41 कामगारांची मोजणी करण्यात आली असून सर्व सुरक्षित आणि चांगल्या स्थितीत असल्याचं व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतय. ही छायाचित्रं आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर सर्वांनाच दिलासा मिळालाय. तसंच यावेळी वायफाय वॉकीटॉकीद्वारे कामगारांशी संपर्कही साधण्यात आला.
-
#WATCH | Uttarkashi (Uttarakhand) tunnel collapse: Rescue workers try to make contact with the trapped workers through walkie-talkie pic.twitter.com/mCr5VRfSi0
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) November 21, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | Uttarkashi (Uttarakhand) tunnel collapse: Rescue workers try to make contact with the trapped workers through walkie-talkie pic.twitter.com/mCr5VRfSi0
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) November 21, 2023#WATCH | Uttarkashi (Uttarakhand) tunnel collapse: Rescue workers try to make contact with the trapped workers through walkie-talkie pic.twitter.com/mCr5VRfSi0
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) November 21, 2023
काय म्हणाले कामगार : बोगद्यात अडकलेल्या कामगारांचे फोटो आणि व्हिडिओ आज पहिल्यांदाच समोर आले आहेत. यावेळी कामगारांशी बातचित देखील करण्यात आली. ज्यात कामगारांनी आम्हाला लवकर बोगद्यातून बाहेर काढण्यात यावं, अशी विनंती केली आहे. सोमवारी रात्री प्रथमच या पाईपद्वारे कामगारांना गरम खिचडी 24 बाटल्यांमध्ये पॅक करून पाठवण्यात आली. त्यासोबत त्यांना सफरचंद, संत्री आणि लिंबाचा रसही पाठवण्यात आलाय.
ओडिशातून आणलं व्हर्टिकल ड्रिलिंग मशीन : सिलक्यारा येथील बोगद्याच्या वर खोदण्याची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. ओडिशातून लष्कराच्या हेलिकॉप्टरनं सिलक्यारा बोगद्यापर्यंत जाड पाईप आणण्यात आलेत. यासोबतच कोटियाला ते सिलक्यारा बोगद्यापर्यंत ड्रिलिंगसाठी मोठे व्हर्टिकल मशीनही आणण्यात आले आहेत. आता हे जाड पाईप्स आणि उभ्या मशीन्स बोगद्याच्या वरच्या टेकडीवर नेऊन ड्रिलिंग केले जाणार आहे. ऑस्ट्रेलियाचे आंतरराष्ट्रीय टनेलिंग एक्सपर्ट अर्नोल्ड डिक्स या बचाव मोहिमेचं नेतृत्व करताय.
हेही वाचा-
- Uttarkashi Tunnel Accident Rescue : उत्तरकाशी बोगद्यातून 40 कामगारांची सुटका करण्याकरिता प्रशासनाकडून करण्यात येणार 'हा' उपाय
- Uttarkashi Tunnel Collapsed : सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या मजुरांशी झाला संपर्क; ऑक्सिजन पुरविण्याची केली मागणी
- Uttarkashi Tunnel Collapsed: बोगद्यातं अडकलेल्या 40 मजुरांना बाहेर काढण्याचे 50 तासांपासून प्रयत्न सुरू, पाईपद्वारे अन्नाचा होतोय पुरवठा