ETV Bharat / bharat

Kanpur Dehat Incident : महिनाभरापूर्वीच कुटुंबियांनी केली होती डीएमकडे तक्रार, अधिकाऱ्यांची विनवणी करतानाचा व्हिडिओ आला समोर - कानपूर देहात येथे कुटुंबाला जाळले

कानपूर देहात घटनेच्या महिनाभरापूर्वीच दीक्षित कुटुंब तक्रार घेऊन जिल्हा दंडाधिकारी कार्यालयात पोहोचले होते. या वेळी पीडित प्रमिला दीक्षित यांचा रडत अधिकाऱ्यांची विनवणी करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.

Kanpur Dehat Incident
कानपूर देहात
author img

By

Published : Feb 17, 2023, 1:53 PM IST

महिलेचा अधिकाऱ्यांची विनवणी करतानाचा व्हिडिओ

कानपूर देहात (उ. प्रदेश) : कानपूर देहात येथील गरीब कुटुंबाला जाळण्याच्या घटनेने संपूर्ण देश हादरला असून आता या घटनेत जिल्हा प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा नवा प्रकार समोर आला आहे. या घटनेत आपल्या मुलीसह जिवंत जाळण्यात आलेल्या प्रमिला दीक्षित ह्या घटनेपूर्वी तक्रार घेऊन डीएमकडे पोहोचल्या होत्या, मात्र तेथे त्यांचे कोणीही ऐकले नाही.

14 जानेवारीलाच डीएमकडे तक्रार : प्रमिला दीक्षित आपल्या कुटुंबासह 14 जानेवारी रोजी जिल्हा दंडाधिकारी कार्यालयात तक्रार घेऊन पोहोचल्या होत्या. कानपूर प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांच्या घरावर बुलडोझर फिरवल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या दरम्यान अधिकाऱ्यांनी उलट दीक्षित कुटुंबीयांवरच गुन्हा दाखल केला. दीक्षित कुटुंब जिल्हा दंडाधिकारी कार्यालयातून निराश होऊन परत आले आणि त्याच ठिकाणी झोपडीत राहू लागले. अधिकाऱ्यांची कारवाई इथेच थांबली नाही. महिनाभरानंतर 13 फेब्रुवारीला पुन्हा एकदा जिल्हा प्रशासनाचे अधिकारी बुलडोझरसह मडौली गावात पोहोचले. यानंतर झोपडीला आग लागल्याने आई व मुलगी जिवंत जळाली.

पूर्वसूचना न देता बुलडोझर फिरवला : 14 जानेवारी रोजी प्रमिला दीक्षित यांनी जिल्हा दंडाधिकारी कार्यालयात प्रसारमाध्यमांना सांगितले होते की, त्यांनी कर्ज घेऊन घर बांधले आहे. त्यांच्या कुटुंबासोबतच त्यांच्या अनेक शेळ्याही तिथे राहत होत्या. जिल्हा प्रशासनाने कोणतीही सूचना न देता त्यांच्या घरावर बुलडोझर फिरवला. या वेळी प्रमिला यांनी प्रशासनावर आरोप करत 'आमची तक्रार ऐकण्यासाठी इथे कोणी नाही', असे म्हटले होते.

दीक्षित कुटुंबाविरुद्धच गुन्हा दाखल : कुटुंबासह तक्रार घेऊन रात्री उशिरा जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचलेल्या प्रमिला दीक्षित आल्याची माहिती अधिकार्‍यांना समजताच त्यांनी दीक्षित कुटुंबाविरुद्धच गुन्हा दाखल केला. हताश होऊन दीक्षित कुटुंबाला परतावे लागले आणि ते त्याच जमिनीवर झोपडी बांधून राहू लागले. 13 फेब्रुवारी रोजी प्रमिला दीक्षित देखील मैथा एसडीएमसमोर तिच्या झोपडीवर बुलडोझर न वापरण्याची विनंती करताना दिसल्या. मात्र अधिकाऱ्यांनी त्यांचे ऐकले नाही. व्हिडिओमध्ये प्रमिला अधिकाऱ्यांना 'साहेब, माझी झोपडी पाडू नका, आम्ही कुठे राहणार?', अशी विनंती करताना दिसत आहेत.

काय आहे प्रकरण? : हे प्रकरण उत्तर प्रदेशच्या कानपूर जिल्ह्यातील आहे. कानपूर तहसील आणि जिल्हा प्रशासनाची टीम अतिक्रमणाखाली असलेले मंदिर पाडण्यासाठी गेली होती. यावरून पीडितेशी आणि तिच्या कुटुंबीयांशी त्यांची बाचाबाची झाली. या दरम्यान मंदिराजवळील झोपडीला आग लागून त्या आगीत मुलगी वा आईचा भाजून मृत्यू झाला. पीडितेचे वडीलही आगीत गंभीर जखमी झाले. प्रशासनाच्या पथकानेच घराला आग लावल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी केला आहे. घटनेचा व्हिडीओ मोठ्या व्हायरल झाला आहे.

हेही वाचा : Kanpur Dehat Fire Incident : आई व मुलीच्या भाजून मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल, पीडितेच्या कुटुंबियांची 5 कोटी नुकसान भरपाईची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.